कलीम अजीम
कोलंबियाची राजधानी बोगोटा शहर अक्षरशर् पेटून उठलं आहे. तिथं पोलिसांच्या मारहाणीत एका लॉ स्टुडंटचा मृत्यू झाला. त्याचे मित्र संतापले आणि म्हणता म्हणता तरुणांचे लोंढे रस्त्यावर उतरले. संतप्त झालेला जमाव व पोलीस यांच्यात अशी काही चकमक झाली की 10 जण मारले गेले. त्यानंतर पुढचे तीन दिवस तरुणांचे मोर्चे रस्त्यावर होते.बोगोटामध्ये भर रस्त्यात मद्य प्राशन करून गोंधळ घालणार्या ऑडरेनेझ नावाच्या एका विद्याथ्र्याला पोलिसांनी अटक केली होती. आरोपीला मारहाण करून स्टेशनकडे घेऊन जात असल्याचा एक व्हिडिओ वायरल झाला. ऑर्डाेनेझच्या सोबत असलेल्या मित्राने तो तयार केला होता. त्यात पोलीस ऑडरेनेझला बेदम मारहाण करत असल्याचे दिसतं. मला दम लागतोय, चालता येत नाही, असे ऑडरेनेझ म्हणतोय; पण पोलीस त्याला फरफटत घेऊन जाताना दिसतात. त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं; परंतु दुसर्या दिवशी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर तरुण संतापले आणि पोलीस अत्याचार थांबवा, या प्रकरणांवर कायमचे तोडगे काढा म्हणत त्यांनी आंदोलन केलं. त्याला पोलीस फारसा प्रतिसाद देत नसल्याचं लक्षात येताच जमावाने पोलिसांवर दगड आणि बाटल्या फेकल्या. स्टेशनच्या खिडक्यांवर हल्ला चढवला. स्प्रे मारले. हा वणवा पसरला आणि अन्य शहरांतही पोलिसांवर हल्ले सुरू झाले. तीन दिवसांर्पयत चाललेल्या या संघर्षात एकूण 10 जण मारले गेले. मीडिया रिपोर्ट सांगतात की, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आंदोलक मरण पावले आहेत.पोलिसांचं म्हणणं आहे की, आरोपींनी कोरोनाकाळात फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचं उल्लंघन केलं म्हणून कारवाई करावी लागली. मात्र या सार्याला कृष्णवर्णीयांवर होणारे हल्ले, भेदाभेद, पोलिसी अत्याचार यांचीही पाश्र्वभूमी आहे. एकीकडे कोरोनाचा कहर, हाताला नसलेलं काम, पोलिसी अत्याचार आणि त्यात पिचणारं तारुण्य, असा हा एक भयंकर चेहरा आहे.कोलंबियातला उद्रेक पुन्हा एकदा जगाला तरुणांचे रिकामे हात, आणि तरुण इच्छांची दडपशाही यासंदर्भात धोक्याचा इशारा देतो आहे.- मात्र ऐकतंय का कुणी?