- निकिता महाजन
थंडी आता जाणवायला लागली आहे. निदान सकाळी आणि रात्री तरी गारवा आहे. त्यातल्या त्यात आपल्या विण्टर फॅशनची हौस भागवून घ्यायला बरं निमित्त आहे. तर दरवर्षी चर्चा असते विण्टर कलरची. तिकडे विदेशी फॅशन जगतात तर विण्टर कलर म्हणून कुठल्यातरी एका खास रंगाची चर्चा होते. तो रंग लोक हौशीनं वापरतात. वॉर्म कलर म्हणून त्याचं कौतुकही होतं.आपल्याकडे मुळात थंडी जराशी बिचकत येते. आली आली म्हणेर्पयत जातेही! मात्र यंदा आपल्याकडच्या थंडीतही तीन रंग असे आहेत जे विण्टर कलर म्हणून चर्चेत आहेत. खरं तर थंडीत काळा रंग तसाही आपल्याकडे हिट असतो. म्हणून तर आपण संक्रांतीला आवजरून काळे कपडे घालतो. उबदारपणा अनुभवतो. तर तो रंग तर ऑलटाइम इन आहेच.मात्र यंदा जर विण्टर कलर म्हणून काही ट्रेण्डी ट्राय करण्याचा मानस असेल तर एक मस्त रंग आहे.मॅजेण्टाया रंगाची जादू सध्या फॅशनच्या दुनियेतही आहे. म्हटलं तर ब्राइट म्हटलं तर सॉफ्ट, फिकटसर अशा रेंजमध्ये हा रंग फिरतो. फार लाउड वाटत नाही. अगदी कॉलेज, ऑफिस, जमलंच तर थेट फॉर्मल कार्यक्रम या ठिकाणीही हा रंग सहज वापरता येऊ शकतो. थंडीच्या डल दिवसात छान प्रसन्न वाटायचं असेल तर यंदा मॅजेण्टा रंगाचे कपडे वापरा. पर्स, चप्पल, कानातले, ब्रेसलेट अगदीच काय तर साधा हेअर बो वापरला तरी चालेल. आपल्याला हा वॉर्म कलर फक्त अॅड करायचा आहे. तो केला तर एक छान ट्रेण्डी लूक येऊच शकतो.
यलोतसा पिवळा रंग आपण फार वापरत नाही. लगेच ते टॅक्सी आणि वरणभात व्हाट्सअॅप जोक आठवत राहातात. मात्र अनुष्का शर्माचा आत्मविश्वास पाहा. ती छान थंडीत मस्त विण्टर जॅकेट घालून फिरते आहे. तिचा तो लूक खर्या अर्थानं हॉट आहे. आपण हिंमत केली तर हा पिवळा रंग वापरू शकतो. छान झेंडू आणि हळदीच्या फुलांचा रंग. कपडे, जॅकेट, स्टोल, स्वेटर, हेअर पिन, चपला या सगळ्यात हा छान व्हायब्रण्ट कलर वापरता येईल!
ब्लॅक अॅण्ड व्हाइट चेक्स
काळा रंग तर आहेच, सध्या ब्लॅक अॅण्ड व्हाइट चेक्सची फॅशन आहे. या थंडीत तुम्ही काळ्या-पांढर्या चेक्सची अनेक डिझाइन, मिस मॅच, कॉण्ट्रा मॅच हे सगळं छान करू शकतो. आपण करू ती काळी-पांढरी फॅशनेबल जादू! तेव्हा बिंधास्त स्वतर्ला मोकळं सोडा, आणि थंडीत कलरफूल जगून घ्या!