शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

complex problem solving - पटापट प्रश्न सोडवून, दणादण काम करायचं "हे" स्किल आहे तुमच्याकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 7:55 AM

कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे ‘क्लिष्ट प्रश्न सोडवणं!’ या पुढच्या काळात सोपे प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्ता स्वतर्‍च सोडवेल! माणसाच्या नशिबी येतील ते गुंतागुंतीचे प्रश्नच!

ठळक मुद्देजॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे काही खास कौशल्यं हवीत? तेच  सांगणारा  ऑक्सिजनचा  विशेष  अंक 

अतुल कहाते, डॉ. यश वेलणकर

‘क्लिष्ट प्रश्न’ नेमकं म्हणायचं तरी कशाला? आपल्या दैनंदिन कामामध्ये सरळसोटपणे साध्य होईल,  ‘पाटय़ा टाकून’ प्रश्न सुटतील असं मानणं म्हणजे आपलं काम एकदम सोपं असेल असं गृहीत धरणं झालं. या उलट आपल्या कामामध्ये बहुपदरी प्रश्न असतील, अनेक अंगांनी त्यांचा विचार करावा लागेल, कुठल्याही निर्णयाचे परिणाम एकमेकांवर होऊ शकतील आणि त्यातून भलतंच काहीतरी घडू शकेल अशी ही कल्पना आहे. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात यासाठी ‘रिग्रेशन टेस्टिंग’ नावाची एक उत्तम कल्पना असते. तिचा सोपा अर्थ असा- कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी दोष शिल्लक राहिलेले असल्याचं लक्षात आल्यावर ते दोष काढून टाकण्यासाठी त्यात बदल केल्यावर आता सॉफ्टवेअर ठीकठाक सुरू आहे ना हे कसं तपासायचं? अर्थातच आधी आढळलेले दोष आता नाहीत ना हे बघायचं; पण तिथेच थांबायचं नाही. आधीचे दोष काढून टाकताना चुकून भलतेच नवे दोष तर आपल्या बदलांमुळे निर्माण झाले नाहीत ना, हेही बघायचं. म्हणजेच नजरेला जे प्रश्न दिसत होते ते तर सोडवायचेच; पण जे दिसत नाहीत तेही पडताळून बघायचे.अनेक अंगांनी विचार करून क्लिष्ट प्रश्नांची उत्तरं शोधायची सवय अंगात बाणवायची कशी? यासाठी व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या अभ्यासक्रमांमध्ये आणि खासकरून उत्तम संस्थांमध्ये अनेक ‘केस स्टडीज’ घेतल्या जातात. त्यात एखाद्या कूटप्रश्नाकडे अनेक अंगांनी बघण्याची सवय विद्याथ्र्याना लावली जाते. जे अशा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकत नसतील अशांनी पुस्तकं, मासिकं, इंटरनेट अशा माध्यमांमधून अशा ‘केस स्टडीज’चा जरूर अभ्यास करावा. आपल्या जवळपासचे लोक निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असतात. त्यांच्या कामादरम्यान त्यांना अशा कोणत्या क्लिष्ट प्रश्नांचा सामना करावा लागला आणि त्यातून शेवटी कसा मार्ग निघाला हे बरेचदा ऐकण्यासारखं असतं. त्यातून आपल्याला या मुद्दय़ासंबंधीची अगदी अनुभवलेली माहिती मिळू शकते. अगदी प्लंबर, इलेक्ट्रिशियन, स्वयंपाकी, घरकाम करणारे इथपासून ते मोठमोठय़ा कंपन्यांमधले अधिकारी या सगळ्यांना निरनिराळ्या प्रकारच्या क्लिष्ट प्रश्नांचा सामना करावा लागलेला असतो. त्या सगळ्यांचे अनुभव महत्त्वाचे असू शकतात. कठीण प्रसंगी मनाचा संयम ढळू न देणं, अनेक मुद्दय़ांचा विचार करून योग्य निर्णयार्पयत पोहोचण्याचा प्रय} करणं, अवघड निर्णय घेणं, काहीवेळा आपले निर्णय चुकतील हे गृहीत धरून थोडा धोका पत्करणं हे गुण ज्याच्याकडे असतील तो उद्याच्या जगातला यशस्वी माणूस ठरणार आहे. उद्याच्या जगात कदाचित सोपे सोपे निर्णय आपल्याला घ्यावेच लागणार नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि त्याच्याशी संबंधित असलेली इतर तंत्रज्ञानं असे निर्णय घेऊन टाकतील. विलक्षण वेगानं असे निर्णय ते आपल्यासमोर ठेवतीलही. त्या निर्णयांचं सुयोग्य मिश्रण करणं आणि त्यातून अंतिम निर्णय घेणं ही कदाचित माणसाची जबाबदारी असू शकेल. उद्याचे प्रश्न वेगळे असतील; त्यांची उत्तरंही वेगळ्या पद्धतीनं शोधावी लागतील. 

त्यासाठीची मानसिक कौशल्यं  कशी कमवायची?

1. एखाद्या समस्येच्या कल्पनेनंच बरीच माणसं गोंधळतात, अनेकदा नक्की काय करायचं हेच समजत नाही. अशावेळी मन अस्वस्थ होत असेल तर आपलं लक्ष शरीरावर नेऊन त्या अस्वस्थतेमुळे शरीरात काही बदल होत आहेत का हे जाणावे. त्यामुळे अस्वस्थता कमी होते आणि समस्येतील विविध घटकांचे विश्लेषण शक्य होते.2. त्यातील कोणते घटक आपण बदलू शकतो याचं भान आले की, उत्तर शोधणं सोपं जातं. आपण बदल करू शकत नाही अशा घटकांचा विचार करीत न राहता आपल्या प्रभाव क्षेत्नावर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं की, मनाची कुंठित अवस्था दूर होते. कोणत्या दिशेने प्रयत्न करायचं हे लक्षात येतं. त्या दिशेनं वाटचाल सुरू झाली की आपलं प्रभाव क्षेत्न वाढू लागतं.3. हे कौशल्य वापरताना चार पायर्‍या असतात. प्रथम आपल्याला नक्की काय साधायचं आहे, आपलं ध्येय काय आहे हे ठरवावं लागतं. त्यानंतर क्रि टिकल थिंकिंग करून हे ध्येय साध्य करण्याचे कोणकोणते पर्याय, विविध मार्ग असू शकतात याचा विचार आवश्यक असतो.4. प्रत्येक पर्यायाचे फायदे-तोटे लक्षात घेऊन त्यातील एक पर्याय निवडावा लागतो. हा झाला प्लॅन ए, तो निरूपयोगी ठरला, तर दुसरा पर्याय कधी वापरायचा म्हणजे प्लॅन बी याचेही नियोजन करावे लागते. ही झाली तिसरी पायरी !5. या सर्वाची प्रत्यक्ष कार्यवाही म्हणजे चौथी पायरी. असे केल्याने गुंतागुंतीच्या समस्या सोडवणे सोपे होते. मात्न अशा समस्या समजून घेऊन ध्येय निश्चित करणे ही पहिली पायरी खूप महत्त्वाची असते.6. क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या समस्यांपासून पळून न जाता त्यांना सामोरे जाण्याचे धैर्य माइण्डफुलनेसच्या नियमित सरावाने वाढते.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शन