शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

Critical Thinking - स्वत:चं डोकं वापरताच येत नाही, मग कसले तुम्ही गो गेटर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 7:50 AM

क्रिटिकल थिंकिंग म्हणजे सुयोग्य नेमके निर्णय घेणं! करू की नको, कसं करू, मला जमेल का, परिस्थितीच हातात नाही, असं न म्हणता नेमका निर्णय घेऊन जो कामाला लागेल, तोच गो गेटर सिकंदर ठरेल!

ठळक मुद्देजॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे काही खास कौशल्यं हवीत? तेच  सांगणारा  ऑक्सिजनचा  विशेष  अंक 

अतुल कहाते , डॉ. यश वेलणकर

‘सुयोग्य निर्णय घेणारा माणूस’ असं नेमकं कुणाला म्हणायचं? ज्या माणसाला स्वतंत्नपणे योग्य निर्णय घेता येतात आणि त्यासाठी त्याला सातत्यानं कुणाचा टेकू लागत नाही असा तो माणूस असतो. असा माणूस कुणाला हवाहवासा वाटणार नाही? या उलट प्रत्येक गोष्ट करू का नको असा विचार करणारा, यातून काय होईल आणि त्यातून काय घडेल अशी धाकधूक मनात बाळगणारा माणूस सतत कुणावर तरी अवलंबून राहील. ‘क्रिटिकल थिंकर’कडे मात्न कुठल्याही परिस्थितीमध्ये नेमकं  काय केलं पाहिजे याचं आकलन करून घेण्याची क्षमता असेल. त्यानुसार तो योग्य निर्णयार्पयत पोहोचेल आणि निर्णय अंमलात आणेलही. उपलब्ध असलेली माहिती, त्या संदर्भातल्या इतर गोष्टींची जाणीव आणि काहीवेळा मागे घडलेल्या घटनांचा अभ्यास हे सगळं त्याच्याकडे असेल.व्यवस्थापनाच्या भाषेत सांगायचं तर असा माणूस बहुतेकवेळा ‘गो गेटर’ असतो. म्हणजेच तो कुणावर विसंबून न राहाता किंवा परिस्थितीला दोष न देता नेटानं मार्ग काढत पुढे जातो. माहितीचे ढिगारे समोर असतील तर त्यामधलं नेमकं  काय उपयुक्त आहे आणि काय बाजूला सारण्यासारखं आहे हे ओळखण्याची कला त्यानं साधलेली असते. याची अनेक उदाहरणं दैनंदिन आयुष्यात बघायला मिळतात. एखाद्या इस्पितळात एकाच वेळी अनेक रु ग्ण दाखल झालेले असतील तर त्यांच्यापैकी नेमकं  कुणाकडे आधी लक्ष दिलं पाहिजे हे निष्णात नर्स पटकन ओळखते. उपलब्ध असलेल्या पुराव्यांनिशी एखाद्या दाव्यासंबंधीचा खटला लढायचा का न्यायालयाबाहेरच परस्पर संमतीनं प्रकरण मिटवून टाकायचं हे हुशार वकील जाणतो. ग्राहकांनी दिलेल्या अभिप्रायानुसार आपल्या कर्मचार्‍यांनी कामकाजात काय सुधारणा केल्या पाहिजेत हे ओळखून त्यानुसार त्यांना प्रशिक्षित करण्यासाठीचं धोरण यशस्वी व्यवस्थापक आखतो. ही सगळी ‘क्रिटिकल थिंकिंग’ची उदाहरणं झाली.‘क्रिटिकल थिंकर’ बनण्यासाठी अनेकदा आपल्यासमोरचा प्रश्न नीटपणे समजून घेण्यासाठी संबंधितांना प्रश्न विचारावे लागतात. उपलब्ध असलेल्या माहितीतून आपल्याला उपयोगी पडतील असे निष्कर्ष काढावे लागतात. निष्कर्षावर आंधळेपणानं विसंबून न राहाता त्यामधलं नेमकं काय घ्यायचं आणि काय बाजूला सोडायचं यासाठीची निर्णयक्षमता विकसित करावी लागते. या सगळ्या कामामध्ये अनेक लोकांशी संपर्क  होत असल्यामुळे आणि त्यांच्याबरोबर कामं करायची असल्यामुळे त्यासाठी आपली संवाद साधण्याची कला फुलवावी लागते.  नेमके प्रश्न विचारणं, कुणाशीही सहजपणे संभाषण करू शकणं, कमी शब्दांमध्ये काम साधणं हे सगळं जोपासावं लागतं. कित्येकदा नेहमीच्या पठडीमधला विचार करून चालत नसल्यामुळे ‘आउट ऑफ द बॉक्स’ प्रकारचा विचार करावा लागतो. कुतूहल, निरीक्षण अशा गोष्टी खूप उपयोगी पडतात. काय केल्यानं काय घडू शकेल याचे अंदाज बांधावे लागतात. खुल्या दिलानं सगळ्या शक्यतांचा विचार करावा लागतो आणि इतरांची मतं ऐकावी लागतात. हे सगळं बुद्धिमत्तेच्या जोरावर साधता येत नसल्यामुळे भावनिक कौशल्यंही महत्त्वाची ठरतात. म्हणजेच ‘इंटेलिजंट कोशंट (आयक्यू)’च्या जोडीला ‘इमोशनल कोशंट (इक्यू)’सुद्धा चांगला असावा लागतो.

त्यासाठीची मानसिक कौशल्यं कशी कमवायची?

1. आपल्या मनात विचार सतत येत असतात; पण जाणीवपूर्वक विचार आपण खूप थोडा वेळ करत असतो. असा मुद्दाम, ठरवून विचार करणे हे कौशल्य आहे.2. या विचार कौशल्यामध्ये स्मरणशक्ती फार महत्त्वाची नसते. मात्न कोणती माहिती आपल्याला आहे  आणि आणखी कोणती अजून मिळवायला हवी आहे याचं भान आवश्यक असतं.3. वेगवेगळ्या विषयातील जी माहिती आहे त्यांचा एकमेकांशी संबंध लावता येणं हे विचार कौशल्य आहे. यालाच कनेक्टिंग डॉट्स म्हणतात. विविध संकल्पना समजून घेऊन त्यामध्ये काय साम्य आहे आणि कोणते भेद आहेत हे ओळखता येणं आणि ते योग्य शब्दात व्यक्त करता येणं हे कौशल्य व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातदेखील आवश्यक असतं.4. हे कौशल्य सजगतेच्या सरावानं वाढतं. मनातील विचार आपण त्या प्रवाहातून अलग होऊन जाणू लागलो की त्यांचं खरं मूल्यमापन शक्य होतं. त्या विचारातील आणि संकल्पनेतील उणिवा लक्षात येऊ लागतात.5. असं केल्यानं दोन किंवा अधिक संकल्पनातील साम्य आणि भेद समजू लागतात.6. विचार करण्याचं कौशल्य कोणतीही समस्या सोडवण्यासाठी, सर्जनशीलता विकसित होण्यासाठी आणि निर्णय घेतानादेखील उपयोगी ठरते.7. एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी विविध पर्यायांचा विचार करणं अशा पद्धतीनं हे कौशल्य विकसित करता येतं. यासाठी वर्किग मेमरी चांगली असावी लागते. वर्किग मेमरी म्हणजे एका वेळी आपल्याला किती गोष्टी आठवतात ती क्षमता होय.8. माइण्डफूलनेसच्या नियमित सरावानं वर्किग मेमरी वाढते हे संशोधनात सिद्ध झालं आहे. त्यामुळे या सरावानं क्रि टिकल थिंकिंगचे कौशल्य विकसित होऊ लागते.9. असे विचार कौशल्य विकसित करण्यासाठी एक्सरजाइज, मेंदूचे व्यायामही करता येतात. 10. त्यासाठी विचारा स्वतर्‍ला, तुम्ही जे काही शिकता आहात, तेच का शिकत आहात? तुम्ही जे काम करीत आहात त्यामध्ये तुमची कोणती कौशल्ये वापरली जातात?समस्या सोडवण्यासाठी विचार करणं आणि कल्पना करणं यामध्ये कोणते साम्य आणि भेद आहेत?

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शन