शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

क्रोशा दागिने...सध्याचा अत्यंत लोकप्रिय मामला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 1:30 AM

लोकरीचे सुंदर कानातले मुली घालतील आणि क्रोशा ज्वेलरी नावाचा उद्योगच सुरू होईल असं वाटलं तरी होतं का आपल्याला?

 

क्रोशा ज्वेलरी.सध्याचा अत्यंत लोकप्रिय मामला. असंख्य रंगांच्या लोकरीच्या धाग्यातक्रोशा सुईवर विणून तयार केलेल्या या ज्वेलरीचा ट्रेण्ड भारतातच नाही तर जगभरात हिट झालाय. आता तर हिवाळा सुरू झालाय. त्यामुळे विंटर ज्वेलरी म्हणूनही तो जाम फेमस होतोय. मध्यंतरी धागा, लोकर यापासून तयार केलेल्या गोंडा ज्वेलरीचा टेÑण्ड होता.. आता त्याची जागा या क्रोशा ज्वेलरीने घेतलीय.कण्टेम्पररी, मॉडर्न, स्टेटमेण्ट ज्वेलरी ही या लोकरीच्या दागिन्यांची सध्याची ओळख. इको-फ्रेण्डली ज्वेलरी हा अजून एक किताब.या भन्नाट ट्रेण्डची ही एक झलक.

वजनाला हलकेक्रोशा ज्वेलरी लोकप्रिय होण्याचे प्रमुख कारण म्हणजे ही ज्वेलरी वजनाला हलकी-फुलकी. लोकर, धाग्यापासून विणलेल्या या दागिन्यांमुळे मॅचिंग उत्तम जमतं. वजन कमी. कान ओघळण्याची भीती नाही. त्वचेला कोणतीही अ‍ॅलर्जी होत नाही.

मामला मॅचिंग है!क्रोशा ज्वेलरी म्हणजे काहीतरी बोल्ड लूक असणारी ज्वेलरी असे प्रथमदर्शनी समज होण्याची शक्यता असते; परंतु क्रोशा ज्वेलरीत सिल्क साडी, डिझायनर साडी, जीन्स-कुर्ती, जीन्स-टॉप, स्कर्ट-टॉप, कॉर्पोरेट अटायर या सर्व पेहरावांवर शोभून दिसतील असे असंख्य प्रकार, डिझाइन्स आज उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रसंगाला साजेशी ज्वेलरीही यात सहज उपलब्ध झाली आहे. काहीतरी हटके मिरवत असल्याचाही फील यामुळे मिळतो. फुले-पाने-फळे या डिझाइन्सचा सुरेख मेळ या ज्वेलरीत साधलेला दिसतो. अन्य ज्वेलरीप्रमाणेच क्रोशा ज्वेलरी सेट्सही मिळू लागले आहेत. हव्या त्या रंगात हा मामला खुलतो.

झुमके-चोकर-ब्रेसलेटझुमके, चोकर नेकलेस, रेनड्रॉप नेकलेस, कफ ब्रेसलेट, डँगलर्स (इअररिंग), पायल, अंगठी असे सर्व पारंपरिक पण तरीही मॉडर्न टच लाभलेले डिझाइन्स क्र शा ज्वेलरीत मिळतात. लोकरीबरोबरच बीड्स, बटन्स यांचाही वापर केलेला आढळतो.

ऑनलाइन शॉप्स, पोर्टल्सभारतात दिल्ली, मुंबई, हैदराबाद, सुरत, वाराणसी या शहरांमध्ये क्रोशा ज्वेलरीचे स्वतंत्र ब्रॅण्ड्स उदयास आले आहेत. हे ब्रॅण्ड्स त्या त्या भागात स्वत:ची उत्पादने विक्री करतच आहेत शिवाय ऑनलाइनही विक्री ते करतात. जगभरात क्र ोशा ज्वेलरीचे असंख्य ऑनलाइन पोर्टल्स सुरू झाले आहेत. इतकेच नाही तर अमेरिका, जर्मनी, सौदी अरेबिया, इंग्लंड, फ्रान्स या देशांमध्येही भारतात तयार होत असलेली क्रोशा ज्वेलरी मोठ्या प्रमाणावर निर्यात होते.

ऑनलाइन क्लासेसक्रोशा ज्वेलरीची वाढती लोकप्रियता पाहून अनेक क्राफ्ट क्लासेस, तसेच हॉबी क्लासेसमध्ये यासंदर्भात विशेष कोर्सेस सुरू झाले आहेत. तसेच चेन्नई, बंगळुरू यासारख्या शहरांमध्ये तर अनेकींनी क्रोशा स्टुडिओज सुरू केले आहेत. तेथे बेसिक टू अ‍ॅडव्हान्स यापद्धतीने हे ज्वेलरी प्रशिक्षण दिले जाते. इंटरनेटवर क्रोशा ज्वेलरीचे ट्युटोरियल्स सहज उपलब्ध आहेत. मोफतच. यू ट्यूबवर क्रोशा ज्वेलरी म्हणून फक्त व्हिडीओ सर्च करून पाहा.

टॅग्स :jewelleryदागिने