ठळक मुद्दे त्यामुळे तुमचेही केस कुरळे असतील तर उगीच सरळ करण्याच्या भानगडीत पडू नकाच.
- सारिका पूरकर-गुजराथी
त्या दिवशी तिला वाढदिवसाच्या पार्टीला जायचं होतं. छान तयारही व्हायचं होतं; पण केसांचं काय करावं, हे काही तिला समजत नव्हतं. कारण केस कुरळे होते. शेवटी ती बाजारात गेली. बाजारातून हेअर स्ट्रेटनर आणलं आणि केसांवर वापरलं. मात्न व्हायचं तेच झालं. हेअर स्ट्रेटनरमुळे तिचे केस जळाले. चेन्नईच्या 34 वर्षीय दिव्या मदस्वामी हिची ही 2014 मधील गोष्ट होती. कुरळ्या केसांना वैतागलेल्या दिव्याचा इथून पुढचा प्रवास सुरू झाला. या प्रवासाला आज ‘कर्ली इज ब्यूटिफूल’ या इंटरनेटवरील ब्लॉग चळवळीचं रूप प्राप्त झालंय. कुरळे केस अनेकांना आवडतात. पण ज्यांचे केस कुरळे असतात त्यांना मात्र ते अजिबात आवडत नाहीत, असा एकूण मामला. केसांची ना चांगली स्टाइल करता येते, ना धड ते विंचरता येतात. शिवाय बॉलिवूड अभिनेत्रींसारखे स्ट्रेट अन् स्टायलिश केस हवेत असाही एक हट्ट असतो. म्हणूनच कुरळे केसं सरळ करून घेण्यासाठी तरुण मुली पार्लरच्या वार्या करू लागतात. हा अनुभव दिव्यादेखील घेत होतीच. त्यामुळे तर ती जाम वैतागली होती. पण केस सरळ करायच्या नादात जो घोळ झाला, त्यानंतर तिनं कुरळ्या केसांचा तिरस्कार करायचं कायमचं सोडून दिलं. कुरळे केस सरळ करण्याच्या भानगडीत न पडता, आहे त्याच कुरळ्या केसांची काळजी आणखी व्यवस्थित कशी घेता येईल यादृष्टीनं तिनं तिचा अभ्यास सुरू केला. केसांना काय लावलं म्हणजे त्यांना चमक येईल? ते कशानं धुतल्यानंतर स्वच्छ राहतील, यासारख्या प्रश्नांचा शोध घ्यायला तिनं सुरुवात केली. आपले केसं जसे आहेत तसेच पण सुंदर, सुदृढ ठेवण्यासाठी दिव्यानं प्रयत्न सुरू केले. दिव्याच्या या प्रयत्नांचा, त्या प्रयत्नांना आलेल्या यशाचा, या प्रवासातील रंजक गोष्टींचा तिनं चक्क ब्लॉग लिहायला घेतला. ‘कर्लेशिअस ब्लॉग’ या नावानं सुरू केलेल्या ब्लॉगला जवळपास चार र्वष झालीत. हजारो वाचक तिच्या या ब्लॉगला लाभले आहेत. कुरळ्या केसांची निगा, जगभरातील आणि भारतातील उत्पादनांची माहिती, ती वापरावी कशी याची माहिती, कुरळ्या केसांवर प्रेम करून केसात आमूलाग्र बदल केल्याचे फोटो यांचा खजिनाच या ब्लॉगवर सापडतो.
खरं तर 2001 मध्ये ‘कर्ली गर्ल’ या नावानं अशाच स्वरूपाच्या उपक्र माची सुरुवात लोरियान मॅसे हिनं न्यू यॉर्कमध्ये केली होती. इंग्लंडमध्ये लहानाची मोठी झालेल्या लोरियानला कुरळ्या केसांमुळे सतत अवहेलना सहन करावी लागली होती. कारण तेव्हा अमेरिका असू दे किंवा इंग्लंड महिलांसाठी सरळ केस हा प्रचलित ट्रेण्ड होता. मात्न कुरळे केस असल्यामुळे लोरियान या चौकटीत फिट बसत नव्हती. नंतर न्यू यॉर्कमध्ये आल्यानंतर आपल्यासारखेच अनेकांचे केस कुरळे आहेत आणि आपल्याला या केसांसाठी लाज वाटण्याचं कारण नाही, हे तिला समजलं. यानंतरच तिने कुरळ्या केसांची निगा, ते धुणं, कापणं आणि कुरळ्या केसांच्या स्टायलिंगवर अभ्यास करून पुस्तिका प्रकाशित केली. पुढे तिच्या या उपक्रमाची चळवळ झाली. या उपक्रमांतर्गत कुरळे केस असणार्यांनी सल्फेट, अल्कोहोल, सिलिकॉनविरहित श्ॉम्पू कसे वापरावेत, केसांची निगा कशी राखावी, यासंदर्भात ‘कर्ली गर्ल’ या छोटय़ा पुस्तिकेतून माहिती द्यायला सुरुवात केली. हळूहळू या उपक्रमानं जगभरात चळवळीचं रूप धारण केलं. ‘कर्ली गर्ल’ नावाची एक स्वतंत्न कम्युनिटीच बनून गेली. कुरळ्या केसांसाठीची विविध उत्पादनं, त्याचा होणारा लाभ इथपासून तर कुरळ्या केसांना आहे तसं स्वीकारल्यास होणारे बदल, वाढलेला आत्मविश्वास याचं शेअरिंग या इंटरनेटवरील कम्युनिटीद्वारे होत गेलं.
भारतात आता आता ही चळवळ जोर धरू लागली आहे. ‘कर्ली गर्ल’ दिव्या मदस्वामी ही युवती याच चळवळीचा नवा चेहरा ठरली आहे. दिव्या मदस्वामीसारखीच हरियाणाची आशा बराक हीदेखील ‘कर्ली इज ब्यूटिफूल’ची प्रतिनिधित्व करते आहे. 2015 मध्ये आशानं ‘इंडियन कर्ल प्राइड’ नावाचा फेसबुक ग्रुप तयार केला. या ग्रुपचे आज 20 हजारांहून अधिक सदस्य आहेत. या ग्रुपवर, ब्लॉगर्स त्यांचे अनुभव शेअर करतात. आधी व नंतर अशा स्वरूपातील फोटोज पोस्ट करतात. त्यांचे हे ट्रान्सफॉर्मेशन बघताना खूप आनंद होतो, असं आशा सांगते. एलिझाबेथ अॅलेक्स. तिचा अनुभव थोडा वेगळाच होता. ती म्हणते, ‘माझ्या कुरळ्या केसांचा मला नेहमीच खूप राग, संताप यायचा. कारण शाळेत असताना याच कुरळ्या केसांमुळे मला नाटकांमध्ये मुख्य भूमिका नाकारल्या गेल्या. माझे केस एकतर कुरळे होते, त्यात ते लांब नव्हते. म्हणून मग राजकुमारीचे केसं असे आखूड आणि कुरळे कसे दाखवायचे हा प्रश्न त्यांना पडलेला असायचा. वयाच्या 15 व्या वर्षानंतर मी केस वाढवले. मात्र तरीही लोकं मला माझ्या केसांबद्दलच सारखे विचारत. माझ्या केसांव्यतिरिक्तही माझ्याकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे, असं मला सारखं वाटायचं. मी कोणतं पुस्तक वाचतेय? असं मला कोणी का विचारत नाही? प्रश्न विचारण्यासाठी लोकांना माझे फक्त केसच का दिसतात? या प्रश्नांनी माझ्या डोक्यात गोंधळ घातला होता.’ या कल्लोळातूनच पुढे एलिझाबेथनं ‘ऑनेस्ट लिझ’ या ब्लॉगला जन्म दिला. 2014 पासून ती हा ब्लॉग लिहितेय. एलिझाबेथ सांगते, ‘सरळ केसांच्या तुलनेत कुरळ्या केसांची देखभाल जास्त अवघड असते. फक्त शाम्पू आणि कंडिशनर लावून चालत नाही, तर त्याबरोबरच जेल, हेअर मास्क यांचीही गरज असते. तुमचे केस हे नुसते केस नसतात तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा, तुमच्या व्यक्त होण्याचा तो एक भाग असतात. तुमचा आत्मविश्वास, तुमची प्रतिमा बर्याच अंशी ही तुमच्या केसांशी निगडित असते. जर तुमचे केस व्यवस्थित नसतील तर ती प्रतिमा डळमळीत होऊ शकते.’ एलिझाबेथचा हाच दृष्टिकोन तिला कुरळ्या केसांमुळे निर्माण झालेल्या न्यूनगंडाच्या पलीकडे घेऊन गेला. सध्या नेदरलॅण्डमध्ये असलेली 28 वर्षीय अंजना मुरलीधरन हीदेखील ‘कर्ली गर्ल’ या कम्युनिटीशी जोडली गेली आहे. ‘कल्र्स अॅण्ड ब्यूटीज’ हा ब्लॉग ती 2015 पासून लिहितेय. महिला सबलीकरणाचा वेगळाच अनुभव ‘कर्ली गर्ल’नं तिला आणि इतर महिलांना दिला आहे. कुरळ्या केसांसाठी लोरियानने सुरू केलेल्या चळवळीत या भारतीय युवतीही हिरिरीनं सहभागी झाल्या. स्वतर्ला आहे तसं स्वीकारल्यास खूप गोष्टी सोप्या होतात, हेच या ‘कर्ली गल्र्स’चा आणि त्यांना फॉलो करणार्या हजारो युवतींचा प्रवास सांगतो. त्यामुळे तुमचेही केस कुरळे असतील तर उगीच सरळ करण्याच्या भानगडीत पडू नकाच. काय?