- ऑक्सिजन टीम
तिला तो आवडायचा. अगदी मनापासून आवडायचा. तो होताच तसा. डार्क, टॉल अँण्ड हॅण्डसम. कायम बाइकवर यायचा. त्याचे कपडे, गॉगल सगळंच भारीतलं असायचं. मोबाइलही एकदम लेटेस्ट असायचा. खरं म्हणजे तो तिच्या कॉलेजमध्ये नव्हता. तिच्याच काय, तो कुठल्याच कॉलेजमध्ये नव्हता. पण मित्राला भेटायला म्हणून आला आणि तिच्या प्रेमात पडला. तिनं त्याला नकार देण्याचा प्रश्नच आला नव्हता. सगळं कॉलेज तिच्याकडे हेव्यानं बघत होतं.
सुरुवातीचा काळ खरंच मजेत गेला. रोज हॉटेलिंग, बाइकवर भटकणं आणि गिफ्ट्स. त्याला इतका खर्च कसा काय परवडायचा ते तिला कळायचंच नाही. तो काय काम करतो तेही तिला माहिती नसायचं.
पण हळूहळू तिला त्याच्या अनेक गोष्टी खटकायला लागल्या. तो सिगारेट ओढायचा. ते तिला मुळीच आवडत नसे. शिवाय तो दारूही प्यायचा. तो हल्ली तिलाही भेटायला यायचा तेव्हा ‘तो पिऊन आलाय’ असा तिला संशय यायचा. त्यात हल्ली त्याचा स्पर्शही जरा बदलायला लागला होता. तिला त्याच्याबरोबर गावापासून दूर फिरायला जायची भीती वाटायला लागली होती. मैत्रिणींशी सगळ्या गोष्टींची चर्चा करून झाल्यावर सगळ्यांचं मत असं पडलं की तिनं त्याच्याशी संबंध ठेवणं योग्य नाही. त्याला ते कसं सांगायचं याचीही सविस्तर चर्चा झाली.
मात्र जेव्हा ती त्याला भेटायला गेली तेव्हा जे झालं त्याची कोणीच अपेक्षा केली नव्हती. त्यानं तिला थंडपणे सांगितलं, की असं नातं वगैरे काही तोडता येणार नाही. मी काही तुला सोडणार नाही.
एव्हाना तिला त्याच्या उत्पन्नाचा मार्गही समजला होता. अनेक कारणांनी त्याच्या संपर्कात असलेली माणसं कशी आहेत तेही समजलं होतं. त्यानं तिला स्वच्छ सांगून टाकलं, की तूही रोज कॉलेजला येतेस, तुझी बहीणही येते, भाऊ शाळेत जातो, आई देवळात जाते. या सगळ्यांचा विचार कर आणि काय ते ठरव.
आता तिच्यात आणि त्याच्यात फक्त भीतीचं नातं उरलंय. पण ती ते ओढते आहे. कारण? फक्त दहशत..
आता ही दहशत किती काळ चालणार?
हे नातं असंच ओढत राहायचं का?
हे नातं जर संपवायचा प्रय} केला तर मग आपले भाऊ, बहीण, आई. यांचं काय होणार?. असे असंख्य प्रo्न तिला छळायला लागले.
आता हे सारे प्रo्न तिनं स्वत:हूनच ओढवून घेतले.
त्यातून एक धडा तिनं घेतला. आयुष्यभरासाठी.
कोणावरही झोकून देऊन प्रेम करणं ठीक आहे, पण त्याआधी व्यवहारिक विचारही करायला हवा. सगळी माहिती काढायला हवी. आयुष्यात केवळ सौंदर्य हेच काही नसतं. त्या जोडीला अनेक गोष्टी असतात. खरं सौंदर्य तर त्यातच असतं.
हे तिला पटलं.
आता या प्रेमप्रकरणातून बाहेर कसं पडायचं याचा ती प्रय} करते आहे.
तुम्हीही जर मागचा पुढचा काहीही विचार न करता जर असं काही केलं असेल, करीत असाल, तर वेळीच सावध व्हा. योग्य ती काळजी घ्या आणि आपलं पाऊल अगदीच चुकीचं पडण्याआधी वडीलधार्यांचा सल्ला घ्या.