शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

दिसाड दिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 2:00 AM

-नागनाथ खरातनागनाथ खरात.२३ वर्षांचा हा मुलगा.सभोवतालचं खेड्यापाड्यातलंवास्तव पाहून अस्वस्थ झालेला.त्यानं ठरवलं आपण सिनेमा करू.कथा लिहिली.पैसे हातउसनवार घेतले.मोबाइलवर शूट केलंआणि सांगितली,जागतिकीकरणानंतर बदलत चाललेलीखेड्यापाड्यातली गोष्टफक्त १४ मिनिटांत.आणि आजवर अनेक फिल्म फेस्टिव्हलही या फिल्मनं गाजवले.कसं जमलं त्याला हे?त्याविषयी सांगणारा नागनाथचा हा लेखचार वर्षांपूर्वी सिनेमा बनवायचं, असं जर मी घरी सांगितलं असतं, तर घरच्यांना ...

-नागनाथ खरात

नागनाथ खरात.२३ वर्षांचा हा मुलगा.सभोवतालचं खेड्यापाड्यातलंवास्तव पाहून अस्वस्थ झालेला.त्यानं ठरवलं आपण सिनेमा करू.कथा लिहिली.पैसे हातउसनवार घेतले.मोबाइलवर शूट केलंआणि सांगितली,जागतिकीकरणानंतर बदलत चाललेलीखेड्यापाड्यातली गोष्टफक्त १४ मिनिटांत.आणि आजवर अनेक फिल्म फेस्टिव्हलही या फिल्मनं गाजवले.कसं जमलं त्याला हे?त्याविषयी सांगणारा नागनाथचा हा लेखचार वर्षांपूर्वी सिनेमा बनवायचं, असं जर मी घरी सांगितलं असतं, तर घरच्यांना वेडच लागलं असतं...अकरावी-बारावीत असतानाच वर्तमानपत्रातून- मासिकातून कविता, लेख, छापून आले होते. एका कथेला पारितोषिकही मिळालं होतं. परंतु बोलण्यातला न्यूनगंड, गावाकडून शहरात आल्यामुळे आलेला बुजरेपणा, कोणाजवळही हवं तसं व्यक्त होता न आल्यानं निर्माण झालेली अस्वस्थता. त्यामुळे माणसापेक्षा पुस्तकं, सिनेमागृहं जवळची वाटत...परंतु आईवडिलांनी शेतात राब-राब राबायचं आणि आपण त्याच पैशाचा थेटरात बसून (एसीत) सिनेमा पहायचा, म्हणजे खूप मोठा गुन्हा केल्याचा ‘फील’ यायचा. असे गुन्हे आठवड्याला करत होतो. पण सिनेमा अंगात भिनला होता...शेतीला लागलेला ‘भिरूडा’च्या झळा मला पुण्यात बसायच्याघरची चारबाजूंनी ओढाताण करून असताना मी फिल्मचा विषय काढणं म्हणजे पापच करतो असं वाटायचं. पाठीमागे घराकडे पाहिलं की सगळी फिल्मी स्वप्नं गायीला वेसण घातल्यासारखी आकसून जायची.कुठं तरी नोकरी धरावी म्हणून प्रयत्न करायचो.कामातून एक रुपया कमवायची अक्कल नाही. बºयाचदा मित्राबरोबर केटरिंगच्या वगैरे कामाला जायचो. तिथे जर कोणी कवी म्हणून ओळख करून दिली तर जी घालमेल व्हायची ती शब्दात व्यक्त करण्यापलीकडे आहे.मग तेही बंद केलं......असा सगळ्याच बाजूंनी अंधार पसरलाय असं वाटायचं. आहे ती गावाकडची दहा एकर जमीन विकावी आणि इकडे यावं असं वाटायचं.जीव भयाण उदास व्हायचा......इकडे दुसºया बाजूला ‘स्मार्ट सिटी’ च्या घोषणा होत होत्या, मेट्रोचा धुराळा उडतोय, नुस्ताच टोलेजंग झगमगाट निर्माण होतोय, मीडियादेखील या डोळे टिपणाºया विकासाचा देखावा निर्माण करतोय. पण दुसºया बाजूला ६० टक्के लोक स्वप्नांना मारून जगण्यासाठीच संघर्ष करताहेत.. याची दखल कोणालाच कशी नाही?कवी पाश म्हणतो ना ‘सबसे खतरनाक होता है, सपनो का मर जाना! आज देशातील युवकांची काय अवस्था आहे? पुण्या-मुंबईत येणारे लोंढेच्या लोंढे या देशातील सरकारी धोरणाचीच प्रचिती आहे.‘दिसाड दिस’ या माझ्या शॉर्टफिल्मचं बीज इथेच आहे’. अर्थातच ती काही वरील मुद्द्यांना धरून केलेली फिल्म नाही. ती विद्रोह करत नाही. टीका करत नाही.ती फक्त गोष्ट सांगते..दूरपर्यंत पसरलेली माळराने, कोणीतरी पाठीमागून हंडा घेऊन चाललेली म्हातारी, समकालीन राजकीय, सामाजिक स्थितीचे चित्रण. यात कोणावर टीका नाही, थेटपणे भाष्य नाही. आहे ते अशोक, अब्बास आणि शीतल या माझ्याच जगण्याचं प्रतिबिंब घेऊन आलेल्या तीन लहान मुलांची कथा. ते अप्रत्यक्षरीत्या बºयाचशा बाबींवर भाष्य करतात. जागतिकीकरणानंतर बदललेलं शेतकरी तरुणाचं, गावखेड्याचं एक चित्र सांगतात...चार-साडेचार महिन्यांत पटकथा लिहिली. पण निर्माता मिळणं अवघडच होतं. तीन-चार वर्षे जागतिक सिनेमाशी थोडाफार संबंध आल्यामुळे काहीसा आत्मविश्वास होताच. पण कोणत्याही प्रकारचा ‘कोर्स’ वगैरचं माझ्याकडे प्रमाणपत्र नव्हतं. त्यामुळे कोणी विश्वास ठेवणं दुरापास्त होतं. ‘परंतु आता थांबलो तर आपली फिल्म मरून जाईल’ असं वाटायला लागलं. पुण्यातील एका शिक्षकाकडून दहा हजार रुपये घेतले. दीपक शिंदे नावाच्या मित्राला बरोबर घेऊन मी माझ्या गावी गेलो. (फेब्रुवारी २०१६ मध्ये)‘‘कॉलेजचा १५ मार्कांचा प्रोजेक्ट असल्याचं आणि त्यासाठी आपल्या गावचं शूटिंग करून न्यायचं आहे’’ अशी थाप मी घरी हाणली. कारण फिल्मशूट करायला आलोय असं सांगितलं, असतं तर डोंब उठला असता...सगळं झालं होतं; पण कॅमेरा हवा तसा मिळत नव्हता... मी घाईवर आलो होतो. सगळं गुंडाळून पुण्याला माघारी जावं लागू नये एवढंच वाटत होतं...शेवटी मोबाइलवरच चित्रित करायचा निर्णय घेतला...मोटेवाडीच्या ज्या माळरानातून टिटव्या, पखुर्ड्या, होल्यांची कोटी (घरटी) शोधत लहानपणी फिरायचो, तिथलं चित्रीकरण केलं. शीतल मोटे, दीपक वायदंडे, महादेव खरात या गावातीलच त्या बालकलाकारांनी कामं केली.संकलन झाल्यानंतर पुढचा फिल्म पोहचविण्याचा टप्पा ही तितकाच अवघड होता.टीव्हीवर ज्या लोकांना ऐकायचो, पाहायचो किंवा ज्याचं काम पाहत फिल्म शिकलो, त्यांनीच दिलेल्या प्रतिक्रिया खूप उत्साह वाढवणाºया होत्या. माझ्या नावासकट देशा-परदेशातील महोत्सवात झळकली हाच मोठा दिसाड दिस कडून मिळालेला अवॉर्ड होता.अर्थातच काटेरी वाटेवरचा संघर्ष संपला अशातला भाग नाही. अजून लय लांबचा पल्ला गाठायचाय. परंतु समकालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती मला सतत अस्वस्थ करत असते.रोजगार शून्य विकासाचे इमले उभे राहताहेत. तरुण धड शेतीही करत नाही नोकरीतही तगत नाही. सामान्य माणसे किड्या-मुंगीसारखी कुचलेली जात आहे...दिसाड दिस मधला अब्बास स्थलांतर करतो, हे त्याचेच प्रतीक आहे...अजून काय सांगू, दिसाड दिस जाताहेत, इतकंच..