शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

डिसिजन फटीग- रोज शेकडो निर्णय घेऊन शिणलेल्या तुमच्या मेंदूची लॉकडाऊन कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 4:45 PM

घरून काम करताना दगदग कमी झाली, प्रवास कमी तरी शीण जास्त येतो, काम एकतर संपत नाही, संपलं तरी त्यात मजा नाही,असं म्हणून आपल्या कामाचा आणि एकूण जगण्याचाही उबग आला असं अनेकांना वाटतं आहे. त्याचं कारण काय?

ठळक मुद्देसध्या जगभरातच या डिसिजन फटीग कल्पनेवर बोललं जातं आहे, आणि त्यातून बाहेर न पडणं, वेळीच न सावरणं आपल्याला कुठं नेईल याचीही चर्चा सुरू आहेच.

अनन्या  भारद्वाज 

डिसिजन फटीग-अशी एक कल्पना सध्या पुन्हा जगभर चर्चेत आहे. आणि त्याला निमित्त आहे तरुण वर्कफोर्सचं घरून काम करणं.वर्क फ्रॉम होमचा अनुभव गेले अनेक महिने जगभरातले कर्मचारी घेत आहेतच. मात्र त्यातही अनेक तरुणांचं असं म्हणणं आहे की, पूर्वी ऑफिसला आठ ते बारा तास काम, तासभराचा प्रवास आणि एवढं करूनही ‘फ्रेश’ वाटायचं. दुस:या दिवशी पुन्हा ऑफिसला जाण्याची ओढ वाटायची.आता प्रवासाचा वेळ वाचतो आहे. घरूनच काम करायचं असल्यानं आपल्या सोयीनं, आपल्या सोयीच्या वेळेतही ते करणं शक्य आहे मात्र असं असतानाही दमल्यासारखं वाटतं. एक्झॉस्ट फील येतो. काम उरकत नाही, उरकलं तरी ते केल्याची मजा वाटत नाही. आणि आपण तासन्तास तेच करतोय ज्यात काही मजा नाही असा फील भरून वाहतो आहे.आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ही ‘डिसिजन फटीग’ ही संकल्पना चर्चेत आहे.खरं तर कोरोनापूर्व काळात या संकल्पनेला एक वेगळं वलय एक फॅशनेबल परिमाण होतं.ते होतं कपडे घालण्याच्या संदर्भात, अर्थात स्टाइल स्टेटमेण्टचं.‘व्हाय हायली इंटिलिजण्ट पीपल वेअर द सेम स्टाइल ऑफ क्लोथ्स’ नावाचा हा लेख जगभर भरपूर वेळा गुगल होत आला आहे.त्यातही मुख्यत्वे स्टिव्ह जॉब्जची चर्चा होते. तो कसा नेहमीच, जगात कुठंही टर्टल नेकचा काळा शर्ट, जिन्सची पॅण्टच घालत असे. आणि अतिशय बुद्धिमान आणि श्रीमंत असूनही कपडे कसे कायम तेच ते घातले जात यावर ब:याच थिअरीही मांडण्यात आल्या आहेत.दुसरीकडे फेसबुकचा मार्क झुकरबर्गही नेहमीच प्लेन राखाडी शर्ट घालताना दिसतो. ओबामा कायमच काळा सुट आणि फारच महत्त्वाचं काम असेल तेव्हा राखाडी थ्री पीस सुट घातलेले दिसतात.ही एवढी श्रीमंत आणि जगभरात अतिशय एन्फ्लुएनशियल माणसं असे तेच ते कपडे का घालतात याच्या थिअरी मांडल्या गेल्या.त्यातली एक थिअरी असंही म्हणते की, ही माणसं सतत निर्णय घेत असतात. आणि त्यासाठी त्यांची चिक्कार मानसिक ऊर्जा खर्ची पडत असते त्यामुळे कपडे कोणते घालायचे, व्यायाम कधी करायचा, किती वाजता जेवायचं हे सारं ते एकदाच निश्चित करून टाकतात त्याचा पुन्हा पुन्हा विचार करत नाहीत.त्यामुळे त्यांची मानसिक ऊर्जाही वाचते आणि डिसिजन फटीग म्हणजेच निर्णय घेण्याचाच त्रस होणं यापासून ते वाचतात आणि ऊर्जा योग्य ठिकाणी खर्ची घालतात.

आता या सा:याचा या महामारीच्या काळाशी आणि घरून काम करणा:यांशी काय संबंध?मुळात कोरोना महामारीच्या काळात तसाही अनेकांना फटीग येणं, डोकं जड होणं, कंटाळा येणं, उबग येणं हे सारं वाटतं आहे. तेच आम आहे आणि जो तो त्याच्याशी झगडून आपलं आर्थिक-मानसिक नैराश्य दडपून जगण्याचा प्रयत्न करतो आहे.त्यात या डिसिजन फटीगचा काय संदर्भ?- एक  विनोद मध्यंतरी समाजमाध्यमांवर फिरत होता, तो तुम्हीही वाचला असेलच.त्या विनोदात, कपाटातले कपडे घालणा:याला विचारतात की, अजून आहात की.. गेलात?- विनोद असा की, इतक्या कपडय़ांनी कपाट तुडुंब भरलेलं आहे, मात्र त्या कपडय़ांचे गठ्ठे तसेच पडून आहेत.ते कपडे घालून जाणार कुठं.जो तो आपापल्या ‘पजामा लूक’मध्ये घरात बसून काम करतो आहे. आणि ते काम करून करून पाठ भरून येते; पण ते संपत नाही आणि संपले तरी केल्याचा आनंद नाही.हे असं वाटणं यालाच आता डिसिजन फटीग असंही म्हटलं जातं आहे.आणि आपल्याही नकळत आपल्याला या महामारीच्या काळात शेकडो निर्णय हरघडी घ्यावे लागत आहेत, त्याची जबाबदारी आणि ते चुकलेच तर वाटय़ाला येणारी अनिश्चितता याचाही विचार करावा लागत आहे.मानसिक थकवा येतोय तो त्यातून.त्यामुळेच या डिसिजन फटीगशी डील करणं हे एक मोठं आव्हान आताच्या काळात तरुणांसमोर आहे.

त्यासाठी काय करता येईल?

1.एकतर गोष्टी प्लॅन करा. अगदी आठवडाभर आपण रोज घरातच काम करताना कोणते कपडे घालणार हे ठरवणं, ते अमुकच दिवशी बाहेर जाऊन अमुक कामं करून येऊ असं ठरवणं, ते तमुक दिवशी मित्रंशी व्हिडीओ कॉलवर बोलू हे ठरवणं असं सगळं प्लॅन करून टाका.भरपूर गोष्टी प्लॅन करून टाकल्या, आणि त्या त्याचदिवशी ठरल्याप्रमाणो केल्या की मेंदूला जे सतत निर्णय घ्यावा लागण्याचं दडपण येतं ते कमी होऊ शकेल.2.आपलं रूटीन, विशेषत: सकाळी उठल्यानंतरचं, ते ऑटो मोडवर टाका. म्हणजे रोज उठलं की त्याच गोष्टी, चहा, व्यायाम, घरकाम, नास्ता हे ठरल्याप्रमाणो, ठरल्या गतीने आणि क्रमाने करायचं त्यामुळे त्यासाठीचे निर्णयही घ्यावे लागणार नाही. आणि मूड बदलणार नाही. हातात मोबाइल घेऊन सोशल मीडिया सकाळीच पाहत बसलं की त्याचा आपल्या मूडवर आणि आपल्याही नकळत अनेक गोष्टी प्रोसेस करण्याच्या मेंदूच्या ताणावरही परिणाम होतोच.3.लिंकडीनवर प्रसिद्ध झालेल्या व्हिन्सेट कालरेस यांच्या लेखानुसार अनेक माणसं सहज चिडतात, सहकारी, घरच्यांवर चिडचिड करतात, चटकन निर्णय घेऊन पटकन रिअॅक्ट करतात, त्याचं कारण हेच की एरव्ही आपण कितीही रॅशनल असलो तरी सतत मेंदूला निर्णय घ्यायला लावले की तो दमतो आणि आपल्या नकळतही आपल्याला मानसिक थकवा येतो. कितीही हुशार माणूस असला तरी तो सतत निर्णय नाही घेऊ शकत.4. हा लेख असंही म्हणतो की, शिणू नका, ब्रेनपॉवर जपून वापरा आणि 80 टक्के निर्णय हे ऑटो मोडवर टाकले तर 20 टक्के निर्णय घेताना तुमचा मेंदू उत्तम काम करेल.  सध्या जगभरातच या डिसिजन फटीग कल्पनेवर बोललं जातं आहे, आणि त्यातून बाहेर न पडणं, वेळीच न सावरणं आपल्याला कुठं नेईल याचीही चर्चा सुरू आहेच.(अनन्या मुक्त पत्रकार आहे.)