शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

दिवाने भटके

By admin | Published: December 28, 2016 4:42 PM

कामाच्या, यशाच्या सेलिब्रेशनच्या त्याच त्या वाटा आणि व्याख्या नाकारून आपल्या वाटा शोधू पाहणारा एक नवा ट्रेण्ड.

कामाच्या, यशाच्या

सेलिब्रेशनच्या त्याच त्यावाटा आणि व्याख्या नाकारूनआपल्या वाटा शोधू पाहणाराएक नवा ट्रेण्ड.

सोमवार ते शुक्रवार तेच ते काम करायचं..आणि मग विकेण्ड म्हणजेच शनिवार-रविवारी मौजमजा करायला बाहेर पडायचं..तेही ठरलेलंच. दणकून काम, सणकून मजा. रुटीनचाच भाग.मात्र या रुटीनलाच चॅलेण्ज करत, चाकोरी सोडण्याचं, आपल्याला अवतीभोवतीचं जगच नाही तर स्वत:लाही एक्सप्लोअर करण्याचं एक धाडस यंदा तरुण मुलांनी ठळकपणे केल्याचं दिसतं.दिवान्या भटक्यांनीकाय धाडस केलं?* सरधोपट रुटीनपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची धडपड तरुणांनी यंदा करून पाहिली. एक्सप्लोअर म्हणून, भटके शोधक म्हणून स्वत:ची इमेज अभिमानानं मिरवली. आपला देश कसा आहे, माझ्यासारखेच, माझ्याच वयाची मुले इतर शहरांमध्ये कशी राहत असतील असे प्रश्न भारतातील मुलांना पडू लागले आहेत. आणि म्हणून मग अनेक सायकलवेडे क्लब सुरू झाले. अनेकजण सायकलवर देश पाहत निघाले. कुणी बेटी बचाव मेसेज घेऊन, तर कुणी पर्यावरण रक्षणाचे मेसेज घेऊन..* काहींनी तर वर्तमानातील प्रश्न आपल्यापरीने कसे सोडवता येतील, याचाही आपल्यापरीनं शोध घेतला..* २०१६ चा उन्हाळा भयंकर दुष्काळी होता. दुष्काळामुळे मराठवाड्यातून मुंबई आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरु झाले. गावं सोडून मुंबईत आलेल्या या लोकांना मदत करण्यासाठी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील मुलांनी मदतीचे हात पुढे केले. कुणी त्यांच्यासाठी धान्य, कपडे गोळा केले. कुणी त्या वस्तीत जाऊन मुलांना शिकवायलाही सुरुवात केली. मी आणि माझ्यापलीकडचं आयुष्य तरुणांनी असं शोधून पाहिलं.* मुलं-मुली असा भेद यंदा मुलींनीच मोडून काढला. पनवेलची प्रिसिलिया त्या मुलींचीच एक प्रतिनिधी. पनवेल ते कन्याकुमारी आणि त्यानंतर कन्याकुमारी ते खार्दुंग ला हे दोन सायकलप्रवास तिने एका वर्षात पूर्ण करून दाखवले. मला माझ्याच देशात मनासारखं फिरता आलं पाहिजे, प्रवास करत लोकांची माहिती घेता आली पाहिजे हा त्यामागचा तिचा विचार. * तिच्यासारख्या अनेकजणी. अनेकींनी चाकोरीबाहेरच्या नोकऱ्या स्वीकारल्या, चाकोरीबाहेरच्या वाटांवर पाऊल टाकतं धाडसानं आपली कामं केली..* असं हे वर्ष एक्सप्लोरर या एका वर्षानं तरुण मुलांच्यात उत्सकुता जागी करतच आलं..* नाकासमोरची वाट नाकारून, पायवाटेनं न कळणाऱ्या जगात जायचं धाडस ही या एक्सप्लोररर्सची कमाई...गेल्या वर्षीची गोष्ट..स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया - स्टँडअप इंडियाची घोषणा केली. आणि त्यानुसार यावर्षीच १६ जानेवारी रोजी स्टार्टअपचं धोरणही जाहीर केलं. नोकऱ्या मागणाऱ्यांची फौज निर्माण करण्यापेक्षा नोकऱ्या देणाऱ्यांची फौज वाढीस लागावी यासाठी सरकारनं धोरणात्मक पाऊलं उचलली. त्यात ‘अ‍ॅप’ हा शब्द तरुण मुलांच्या जगात परवलीचा झाला तोही याच काळात. आॅनलाइन खरेदी करण्याचे अ‍ॅप ते डॉक्टर शोधून देणारं अ‍ॅप ते सिनेमाची तिकिटं बुक करणारं अ‍ॅप अशा अनेक गोष्टींनी तरुण लाइफ हायटेक होत होतं. वर्षाखेरीस मोबाइल वॉलेट अ‍ॅप्सपर्यंत ते येऊन पोहचलंच. स्टार्टअपने केलं काय?* स्टार्टअपनं चांगली आघाडी घेतली ती याच काळात. कोची, हैदराबाद, बेंगळुरू अशा आयटी हब्जमधील अनेक तरुणांनी नोकरी सोडून स्वत:चे काहीतरी निर्माण करण्यासाठी आणि आपल्या मनातील संशोधन कल्पनांचा विकास करण्यासाठी स्टार्टअपचा मार्ग स्वीकारला. स्टार्टअपच्या निर्मितीची आणि विकासाची प्रक्रिया यंदा गतिमान झाल्याचे जाणवले.* या वर्षाची सुरुवातीला चर्चा झाली ती अक्षय गुणेती या हैदराबादी मुलाच्या सायकल प्रवासाने. स्टार्टअपचा भारतातला प्रवास कसा सुरू आहे हे पाहण्यासाठी अक्षयने भारतभर सायकलने प्रवास केला. स्टार्टअप इंडिया टुर असंच म्हणतो तो त्याला. बेंगळुरूच्या राजेश मानपतने ही चमकदार कामगिरी केली. अभ्यासात आणि खेळात हुशार असणाऱ्या राजेशने आपल्या आर्क रोबोटच्या मदतीने मुंंबईत झालेल्या मेक इन इंडिया संमेलनामध्ये सहभाग घेतला आणि पठ्ठ्याने दोन कोटींचा पहिला पुरस्कारही मिळवला. पुण्याच्या अभिमन्यू भोसले आणि मुकुंद मालानी या दोघा मित्रांनी आरोग्य तपासणीचे रिपोर्ट्स रिअलटाइम मोबाइलवर मिळावेत यासाठी लाइव्ह हेल्थ हे अ‍ॅप सुरू केलं.* फेसबुक, अमेरिकन सरकारने दिलेल्या पुरस्काराच्या, मदतीच्या आणि काही अ‍ॅप्स मल्टिनॅशनल्सनी घेतल्याच्या बातम्याही हे वर्ष संपता संपता आम झाल्या. * २०१६ या वर्षानं स्टार्टअपला एक भरीव पायाभूत वळण दिलं. स्टार्टअपचं बिझनेसमध्ये रूपांतर कसं होईल, ते मॉड्युल व्यवसाय म्हणून यशस्वी कसं होईल याचाही अनेकजण विचार करू लागले.आणि स्टार्टअप ही केवळ चर्चेपुरती गोष्ट न राहता, तरुण जगण्याचा एक भाग झाली..* भारत सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार भारतात नोंदणीकृत, तंत्रज्ञानस्रेही १९,००० स्टार्टअप आहेत.