तांदुळवाडीच्या डोंगरानं एका दोस्ताला दाखवलेला एक नवा रस्ताट्रेकिंगची विशेष आवड, आकर्षण होतं पण त्यासाठी फारसा वेळ कधी देता आला नाही. मात्र व्हाट्स अॅप वर मयूर तेंडुलकर नावाच्या मित्रानं त्याच्या ट्रेकिंग ग्रूपमध्ये अॅड केलं. ट्रेकिंगच्या ग्रुप वर आल्यावर तिथे आधीपासून असलेल्या जुन्या मंडळींच्या ओळखीने बरीच उत्सुकता ताणली गेली. अशातच मयूर ने तांदुळवाडी ट्रेक ला जाण्याचं जाहीर केलं. मला मनातून खूप आनंद झाला की मी आज लहानपणापासून जे स्वप्न बघत आलो ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. होळीच्या दिवशी जाण्याचे ठरले. त्या दिवसा आधी मी मयूरची सदिच्छा भेट घेऊन बरीचशी माहिती काढली. तो त्याच्या काही वैयक्तिक कारणामुळे येऊ शकला नाही. तेव्हा ग्रुप मध्ये असे वातावरण झाले की ट्रेक एकट्याने कसा पार पाडायचा. मग ठाणे येथे राहणारे गजानन नामजोशी व पुणे येथून अनिरु द्ध जोशी हे दोघे तयार झाले माझ्यासोबत येण्यासाठी.अखेर तो दिवस उजाडला ज्याची मी आतुरतेने वाट बघत होतो. मी भुईगाव हुन बसने नालासोपारा स्टेशनवर आलो. तिथून नालासोपारा ते सफाळे रिटर्न तिकीट काढून लगेच आलेल्या विरार लोकल ने विरार स्टेशन गाठले. तिथे गजानन आणि अनिरु द्ध दोघे आधी हजर होते. मग वेळ न घालवता आम्ही डहाणू लोकल ने सफाळे ला पोचलो. सफाळे ला बाहेर पडून एका रेस्टोरन्ट मध्ये नाश्ता केला आणि तांदुळवाडी ला जाणारी बस कुठून आहे याचा शोध घेण्यासाठी बाहेर आलो. मार्केट मधून बाहेर पडुन मुख्य रस्त्याच्या उजवीकडून सरळ चालत गेल्यावर रिक्षा स्टॅन्ड आहे तिथे गेलो. स्पेशल कम शेअर रिक्षा घेऊन आम्ही तांदूळवाडीच्या पायथ्याशी आलो. तेव्हा जवळ जवळ ११.३० वाजले होते.दुपारच्या त्या वेळी चारही बाजूला रखरखाट आहे. पायथ्याशी तांदुळवाडी ग्रामपंचायतीचे आॅफिस आहे तिथून आत चालत निघालो.गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार तोच रस्ता धरून पुढे चालत राहिलो. वाटेत स्थानिक मुलं क्रि केट खेळत होती. त्यांना विचारून सरळ रस्ता पकडला आणि पायऱ्या चढायला सुरु वात केली.माझा हा पहिलाच ट्रेक असल्यामुळे मला फारसा अनुभव नव्हता. त्यामुळे मी अंदाजे ५० पायऱ्या चढून जाताच मला दम लागला. मी थांबलो तेव्हा गजानन आणि अनिरु द्ध बरेच पुढे गेले होते. त्यांना थांबायचं इशारा करून हळू हळू ते होते तिथपर्यंत पोचलो. जरा विश्रांती घेऊन पाणी पिऊन परत चढायला सुरु वात केली. साधारण पाऊण तासाच्या चढाईनंतर पुन्हा एकदा थांबलो. आसपासचे काही फोटो काढले आणि नव्या दमाने पुढील चढाईला सुरु वात केली.त्यानंतरही अजून अर्ध्या तासाने ज्याला बेस कॅम्प म्हणता येईल अशा सपाटीवजा जागेत आलो.तिथून तांदुळवाडीचे टोक पाहताना अतिशय सुंदर वाटत होते.मग तिथे एका डेरेदार वृक्षाखाली बसून फराळ, फोटोसेशन केलं.फराळ खाऊन ताजेतवाने झालेले आम्ही सगळे पुढच्या चढाईसाठी सज्ज होतो. तिथून लाकडे तोडून घेऊन जाणाऱ्या स्थानिक गावकऱ्याला पुढील रस्ता विचारला. त्याने सांगितले की ही दोन्ही बाजूला दगड रोवून केलेली पायवाट गडाच्या माथ्यापर्यंत घेऊन जाईल.त्याप्रमाणे मजल दरमजल करीत गप्पा मारीत पुढे चालत राहिलो. साधारण तासाभराच्या पायपीटीनंतर सावलीखाली बसून फलाहार केला आणि पुन्हा चढाई सुरु केली.तिथून पाऊण तास चढून गेल्यावर आम्ही गडाच्या माथ्याजवळ पोचलो. मध्ये वाटेत एक पडझड झालेला पण कामचलाऊ पाण्याचा हौद पाहिला. तसेच म्हातारीच्या केसाप्रमाणे दिसणारे गवत पाहिले. तिथून गडाचा माथा अगदीच जवळ होता. वीस मिनिटाच्या पायपीटीत आम्ही माथ्यावर पोचलो. वर माथ्यावरून दिसणारे तांदुळवाडी गाव आणि परिसर तसेच वैतरणा नदी याचे विहंगम दृश्य पाहून सर्व थकवा कुठच्या कुठे पळून गेला.मग आम्ही एक सुळक्यावजा दगडाच्या जवळ जाऊन तिथे आधीपासून रोवून ठेवलेल्या झेंड्याला हात लावून फोटो काढले. पाणी वगैरे पिऊन जरा तरतरीत झाल्यावर परतीच्या मार्गाला लागलो. उतरताना काही ठिकाणी मध्ये येणार्या झाडांच्या फांद्यांमुळे खरचटले तरी त्याची कोणाला पर्वा नव्हती.एकामागोमाग एक उतरत होतो आम्ही सगळे. अशा वेळी एकी हीच कामी येते. कारण ज्या मार्गाने आम्ही चढत गेलो त्यातील गडाच्या माथ्यापासूनचा अर्धा टप्पा आम्ही परतीच्या प्रवासात पार केला, पण पुढे वाट चुकली आणि आमच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले कि आता काय करायचे खाली कसे उतरायचे? पण गजानन ने आम्हाला धीर देऊन काही मार्ग दिसतोय का पाहतो असे सांगितले. तो म्हणाला,‘ अरे, असे प्रसंग येतच असतात.त्यामुळे खचून न जाता त्यातुन बाहेर कसे पडता येते याकडे लक्ष केंद्रित करा.’ त्याने हळू हळू पुढे होत रस्ता शोधून काढला आणि आम्हाला मागोमाग येण्यासाठी इशारा केला.आम्ही दोघे तिथपर्यंत गेलो रस्ता पाहायला, पण तो अतिशय धोकादायक उतरणीचा होता. मी थोडा घाबरलो होतो.पण अनिरुद्ध आणि गजाननने धीर दिल्यामुळे तयार झालो. एक तासाच्या खडतर उतरणीनंतर आम्हाला एक मंदिर दिसलं, पण ते आम्ही उभे होतो तिथून खूप दूर होत. आता थोडंच उतरायचं असे मनाशी म्हणत मंदिरापर्यंत पोचलो. तिथे पायरीवर बसून दम टाकला तेव्हा जरा बरं वाटलं. वाट चुकल्यामुळे या उतरणीने उतरताना माझा पाय अनेकदा मुरगळला होता .त्यामुळे दोन्ही पाय खूप दुखत होते. मंदिराच्या पायरीवर बसून थोडं बरं वाटत होत. मनाचा हिय्या करून खाली उतरलो. खाली एक बोअरिंग चे पाणी गावकरी बायका भरत होत्या. तिथले बोअरिंग चे थंड पाणी पिऊन तरतरीत झाल्यावर परतीच्या बसची वाट बघत थांबलो. आणि निघालो घराकडे..पहिल्यांदा ट्रेकला गेलो..आणि मग कळलं ही ट्रेकची नशा नेमकी असते काय?-चेतन जोग
पहिल्यांदा ट्रेकला जाताना नेमकं वाटतं काय?
By admin | Published: April 11, 2017 6:45 PM