खेडय़ापाडय़ातल्या माणसांना मुख आरोग्याची माहिती व्हावी, कर्करोग कमी व्हावेत म्हणून झटणारे दोन तरुण.
तंबाखूची फक्की मारलेले अनेकजण आपण नेहमी पाहतो. खेडय़ापाडय़ात, कष्टकरी वर्गात तर तंबाखू, मिस्त्री हे तर जिवाभावाचे सखे असल्यासारखे सतत सोबत करतात. त्यात दात जातात, किडतात. आपल्याकडे दंत आरोग्याविषयी शहरातच घनघोर अज्ञान असताना, खेडय़ापाडय़ात तर खर्चिक दंतोपचार मिळणं फार अवघड.
जिथं बेसिक आरोग्यसुविधा मिळायचे तर खासगी डॉक्टर पोहचत नाही तिथं कोण डेण्टिस्ट खेडय़ात स्वत:हून जातो !
पण एका तरुणीनं ही भलतीच जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली आणि एक मोबाइल डेण्टल क्लिनिक घेऊन ती खेडय़ापाडय़ात फिरु लागली. तिनं स्वत:चं एक मोबाइल डेंटल क्लिनिक सुरू केलं. ती गावक:यांना मुखाच्या आरोग्याविषयी माहिती देते. मूलभूत तपासणीनंतर माफक शुल्क आकारत गावक:यांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधादेखील पुरवते.
छत्तीसगढमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलई गाव. या गावात दंतारोग्याविषयी जनजागृतीचे महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी स्वत:चा चालताफिरता दवाखाना घेऊन डॉ. प्रीती आदिल चंद्राकर दर आठवडय़ाला येतात. गावक:यांना तोंडाच्या कर्करोगाविषयी माहिती देत, दंतविषयक समस्या आणि तोंडाच्या व दातांच्या अन्य समस्यांबाबत काळजी कशी घेतली पाहिजे याचे धडे देत, मोफत तपासणी करते. केवळ दोन वर्षाच्या कालावधीतच त्यांनी छत्तीसगढमधील कित्येक गावांची वाट सेकंडहँड ट्रकमध्ये थाटलेल्या आपल्या दंतचिकित्सा दवाखान्यासमवेत आनंदाने आणि जबाबदारीने तुडवली आहे.
प्रत्यक्ष कामाला जरी 2012 पासून सुरूवात झाली असली, तरीही ख:या अर्थाने 2009 पासूनच या कामाचे विचारमंथन त्यांनी सुरू केले होते. प्रीती यांनी राजनांदगावमधून डेण्टीस्ट्रीची पदवी घेतली आणि भिलईमध्ये काम करण्यास सुरूवात केली. इतिदिरखा या आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गावक:यांसाठी शिक्षण व तपासणीचे काम सुरू केलं. याकामी त्यांचे भाऊ प्रवीण आदिल यांनादेखील त्यांनी सामील करून घेतले. सेकंडहँड ट्रकचा कायापालट करून तिचे दाताच्या दवाखान्यामध्ये यशस्वीरीत्या रूपांतर करण्याची किमया स्वत: आयआयटी कानपूरमधून इंजिनिअर झालेल्या प्रवीण यांनी केली आहे. प्रीती यांच्या प्रोत्साहनाने सिंगापूरमधील मल्टीनॅशनल कंपनीतील लाखो रूपयांची नोकरी सोडून देत त्यांनी याकामी स्वत:चे ज्ञान वापरण्याचे धाडस केले.
वडील शेतकरी पण नोकरीदेखील करीत असल्याने डॉ. प्रीती आणि प्रवीण अगदी बालपणापासूनच गावाशी जोडलेले. आपल्या अनेक नातेवाइकांना त्यांनी सतत तंबाखू खाताना पाहिले होते. क्र ॉनिक हाय ब्लडप्रेशर असलेले आणि त्यात भर म्हणजे तंबाखू सेवनाची सवय जडलेल्या अनेक नातेवाइकांना त्यामुळे आपले प्राणदेखील गमवावे लागल्याचे या भावंडांनी अनुभवले होते. ग्रामीण भागाशी संपर्क असल्याने त्यांना गावाकडील लोकांच्या या सवयीविषयी आणि तोंडाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण याविषयी माहिती होती. त्यामुळेच भविष्यात संधी मिळाल्यावर या भावंडांनी हे अत्यंत महत्त्वपूर्ण काम हाती घेतले.
अशी चालते मोबाइल व्हॅन
प्रवीण सांगतात, ‘उपाययोजनेपेक्षा काळजी घेतलेली बरी या तत्त्वावर आमचं काम चालतं. त्यामुळे मोफत तपासणीचे काम आम्ही करतो. त्यानंतर आवश्यकता वाटल्यास एक कार्ड देऊन त्या रूग्णाने कोणत्या औषधोपचाराचा फायदा घेतला पाहिजे याची नोंद करून त्या रूग्णाकडे देतो. कार्ड घेऊन रूग्णाने अन्य कोणत्या दवाखान्यात तपासणीसाठी जाण्यास आमची हरकत नसते. एरवी वैद्यकीय तपासणीकरिता तो जर आमच्याकडे आला तर माफक शुल्क आकारून आम्ही पुढील औषधोपचार त्यास देतो.’
प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यापूर्वी डॉ. प्रीती यांनी स्वत: तब्बल हून अधिक वैद्यकीय कॅम्पस्मध्ये सहभाग नोंदवला. या माध्यमातून गावक:यांशी कशाप्रकारे संवाद साधला जातो याचे शिक्षण त्यांनी घेतले व त्यानंतरच त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. अगदी लहान वयात अशा प्रकारचे काम करणा:या त्या सध्या एकमेव आहेत.
डॉ. प्रीती यांना प्रत्यक्ष काम करताना अनेक मजेशीर अनुभव येतात. त्या सांगतात, ‘सुरुवातीला जेव्हा आम्ही मोबाइल क्लिनिक घेऊन गावात येत असू तेव्हा गावकरी अत्यंत आश्चर्याने बघत. काहीतरी अजबच पाहिल्याप्रमाणो ते व्हॅनपासून अगदी दूर उभे राहत आणि कितीतरी वेळ निरीक्षण करत. नंतर हळूहळू त्यांची भीड चेपली. तरीही तोंड आणि दाताच्या आरोग्याविषयी कोणतीही जाणीव गावक:यांना नव्हती. हे लोक फक्त आम्ही दात पाडतो का आणि दाताची सफाई करतो का या दोनच गोष्टींबाबत विचारणा करीत.
एकदा एक काका दात दुखत असल्याची समस्या घेऊन माङयाकडे आले. पाहिलं तर त्यांनी दातात काहीतरी चावून धरलं होतं. काय आहे म्हणून विचारणा केली तेव्हा ते चटकन म्हणाले, काय करणार बेटी, इतकी तकलीफ होत होती मग शेवटी दारुत बुडवलेला कापसाचा बोळा दाताखाली दोन दिवसापासून धरून ठेवला आहे. अशावेळी काय समजवणार असा प्रश्नच पडतो.’
दातांचे उपचार खर्चिक असतात हे आम्हालाही मान्य आहे; पण कुणीतरी तरी खेडय़ात जायला हवं म्हणून आम्ही जातो, असं प्रीती सांगते !
- मोहिनी घारपुरे-देशमुख