शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
2
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
3
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
4
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
7
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
8
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती मतदान? लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीची किती मते वाढली, आकडेवारी पहाल तर...
9
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
10
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
11
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर
12
पराभवानंतर शहाजीबापू पाटील पहिल्यांदाच बोलले, कारणही सांगितलं, म्हणाले, "ठाकरे, पवार, राऊतांनी..."
13
देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या हक्कांसाठी काम केलं; भुजबळांनी केलं तोंडभरून कौतुक!
14
'फॉरेनची पाटलीण' फेम अभिनेता आठवतोय का? तब्बल १० वर्षांनी करतोय कमबॅक; म्हणाला...
15
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
16
Health Tips: भातप्रेमींनो, 'या' पद्धतीने शिजवा भात! कितीही खाल्लात तरी सडसडीत राहाल!
17
डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेत प्लॅनिंग! भारतात वाढला सोन्याचा भाव; कुठेपर्यंत जाणार वाढती किंमत
18
भयंकर! बॉयफ्रेंडशी बोलताना झालं डिस्टर्ब; संतापलेल्या आईने लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्...
19
Guru Pradosh 2024: आनंद, ऐश्वर्यप्राप्तीसाठी आज प्रदोष मुहूर्तावर राशीनुसार करा शिव उपासना!
20
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 

पृथ्वी-अरमान-सरफराज रेकॉर्ड मेकर

By admin | Published: January 14, 2016 9:12 PM

मुंबई-ठाणे परिसरातले हे तीन खेळाडू, ज्यांनी रेकॉर्ड केले आणि काही रेकॉर्ड मोडले. त्यानंतरच्या प्रवासातले चढउतार, अपयश आणि यशही पचवत आज ते कुठे पोहचलेत?

 मुंबई-ठाणे परिसरातले हे तीन खेळाडू, ज्यांनी रेकॉर्ड केले आणि काही रेकॉर्ड मोडले.

त्यानंतरच्या प्रवासातले चढउतार, अपयश आणि यशही पचवत आज ते कुठे पोहचलेत?
प्रेशर हॅण्डल करत आपला गेम पुढच्या टप्प्यात नेताना त्यांच्यासाठीही सोपं नव्हतंच!
‘पृथ्वी’ क्षेपणास्त्र
 
पृथ्वी शॉ
३३० चेंडूत तुफानी ५४६ धावांचा विक्रम
२०१३
 
मुंबईच्या वांद्रे परिसरातील रिझवी स्प्रिंगफिल्डचा शाळेचा महत्त्वाचा खेळाडू. १६ वर्षांखालील संघाचा कर्णधार असलेल्या पृथ्वीने नोव्हेंबर २०१३ मध्ये एक मोठा धमाका करताना साऱ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले होते. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या १६ वर्षांखालील हॅरीश शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत त्याने सेंट फ्रान्सिस डी’अ‍ॅसीसी संघाविरुद्ध ३३० चेंडूत तुफानी ५४६ धावा चोपल्या. या धमाक्यानंतर मुंबईतील सर्वच क्रीडा पत्रकारांची धावपळ सुरू झालो. जो-तो पृथ्वीच्या एका प्रतिक्रियेसाठी धडपडत होता. न्यूज चॅनलवर फक्त पृथ्वीची चर्चा. त्यात दखल घेण्याची बाब म्हणजे, हा विक्रम अशा दिवशी झाला, ज्या दिवशी क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं जागतिक क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन फक्त चारच दिवस उलटले होते.
साहजिकच लगेच पृथ्वीची तुलना सचिनशी होऊ लागली. सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली आणि काही दिवसांतच देशाला दुसरा तेंडुलकर मिळाला, इथपर्यंत पृथ्वीवर स्तुतिसुमने उधळली गेली. शिवाय या विक्रमानंतर विविध सत्कार, अनेक शिष्यवृत्त्या, विविध स्पॉन्सरशिप अशा अनेक गोष्टी पृथ्वीसह घडल्या. 
मात्र, यानंतर त्याच्या कामगिरीला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र तरीही त्यानं आपल्या कामगिरीतलं सातत्य टिकवत उत्तम कामगिरी सुरूच ठेवली. या विक्रमानंतर त्यानं १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचं नेतृत्व करताना चमकदार कामगिरी केली.
सध्या पृथ्वी १९ वर्षांखालील मुंबई संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. या मोसमात त्यानं मुंबईकडून खेळताना चार सेंच्युरी ठोकल्या आहेत, तर याहून मोठी गोष्ट म्हणजे मुंबई संघासाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेतील तीन सामन्यांत तीन शतके करताना पृथ्वीनं आपली जागा निश्चितही केली होती. 
....................................
विक्रमी ‘अरमान’
 
अरमान जफर
४९० चेंडूत तब्बल ४९८ 
२०१०
 
पृथ्वी शॉच्या विक्रमी खेळीआधी भारतात एकाच डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला होता तो रिझवी स्प्रिंगफिल्डच्याच ‘अरमान जाफर’ने. याआधी मुंबईचा दिग्गज रणजीपटू वासिम जाफरचा पुतण्या अशी ओळख असलेल्या अरमानने या धमाकेदार खेळीनंतर स्वत:ची ओळख क्रिकेट जगताला करून दिली.
अरमानने २०१०-११ च्या मोसमात १४ वर्षांखालील गाईल्स शिल्ड स्पर्धेत रिझवीकडून खेळताना आयईएस राजा शिवाजी स्कूलविरुद्ध ४९० चेंडूत तब्बल ४९८ धावा ठोकल्या. या खेळीनंतर तो पटकन प्रकाशझोतात आला. या एका खेळीने त्याने तीन विक्रम मोडताना नवा पल्ला गाठला होता. ५०० धावांच्या टप्प्यासाठी फक्त दोन धावा दूर राहिल्याची हुरहुर होती, मात्र तरीही विक्रमाचा आनंद मोठा होता. 
यावेळी प्रत्येक वर्तमानपत्र व न्यूज चॅनलने अरमानची दखल घेतली. अरमानचाही विविध ठिकाणी सत्कार, स्कॉलरशिप प्रदान असे कार्यक्रम झाले. मात्र नंतर अरमान फार चर्चेत नव्हता. १९ वर्षांखाली चॅलेंजर ट्रॉफीत तीन सामन्यांत मिळून त्यानं फक्त ७५ रन्स केले, त्यामुळे तो सिलेक्टर्सच्या रडारवरूनही हलला. पण अपयशानं खचून न जाता त्यानं अधिक मेहनत केली आणि गतवर्षी झालेल्या १९ वर्षांखालील कूचबिहार ट्रॉफी स्पर्धेत अरमानने जबरदस्त धमाका करताना सात सामने मिळून सलग तीन डबल सेंच्युरी आणि सलग चार सेंच्युरी ठोकण्याचा भीमपराक्रम केला. शालेय क्रिकेटमधील विक्रमानंतर आणि थेट कुचबिहार स्पर्धेत केलेल्या पराक्रमानंतर अरमानची निवड १९ वर्षांखालील भारतीय संघात झाली आणि पुन्हा एकदा तो चर्चेत आला. 
आता २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान बांगलादेशात होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी जाणाऱ्या संघात त्याला स्थान मिळालं आहे.
नवाब.. सुसाट!
 
सरफराज खान
वैयक्तिक ४३९ धावा 
सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम मोडला
२००९
 
 
मूळचा लखनऊचा असलेल्या सरफराज खाननं शालेय मुंबई क्रिकेट अक्षरश: गाजवलं. २००९ मध्ये त्याने हॅरीस शिल्ड स्पर्धेत तब्बल ४३९ धावा कुटताना इतर कोणाचा नाही, तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम मोडला. रिझवी स्प्रिंगफिल्डचाचा खेळाडू असलेल्या सरफराजने मुंबई शालेय क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या खेळी करताना शतक, द्विशतक व त्रिशकांचा रतीब घातला. आता सचिनचा विक्रम मोडला म्हटल्यावर मीडिया दखल घेणार नाही असे कसे होईल? त्यावेळीही चर्चा होती ती फक्त सरफराजची. याआधीही त्याने अनेक मोठ्या खेळी करताना संघासाठी निर्णायक कामगिरी केली होती. मुळात मुंबई शालेय क्रिकेटला पहिल्यापासूनच प्रसिद्धी मिळत असल्याने अरमान किंवा सरफराज ही नावे क्रिकेटप्रेमींसाठी नवीन नव्हती. मात्र यांनी केलेल्या विक्रमांमुळे ते घराघरांत पोहचले होते. 
त्याचे वडील नौशाद खान हेच त्याचे कोच. त्यांनी त्याचा फोकस ढळू दिला नाही. मुंबईच्या १६ व १९ वर्षांखालील संघातून चमक दाखवल्यानंतर भारताच्या १९ वर्षांखालील संघात सरफराजची निवड झाली. २०१४ साली झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारताचा तो सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. गतवर्षी झालेल्या आयपीएलमध्ये बंगळुरू रॉयल्स चॅलेंजर्स संघातही त्याला स्थान मिळाले. आयपीएल खेळणारा तो सगळ्यात तरुण खेळाडू ठरला. विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हीलियर्स अशा महारथी खेळाडूंसमोर त्यानं उत्तम खेळ केला. 
आता त्यानं एक पाऊल पुढे टाकलं आहे.
२२ जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान बांगलादेश येथे रंगणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी जाणाऱ्या संघात त्याला स्थान मिळालं आहे.