- प्राची पाठक
दाखवतोच लोकांनाकरूनच दाखवतो,मला कमी लेखता का,मला नाकारता?बघा, मी काय करू शकतो ते.ही भावना काही एका टप्प्यापर्यंतआपल्याला प्रेरणा देते,कामाला भाग पाडते;पण असं किती काळआपण लोकांवर डूक धरल्यासारखंकडूजहर आयुष्य जगणार?इतरांचं जाऊ द्या,आपण आधी स्वत:लास्वीकारणार का,आपल्याला टाळलं त्यांनी..- का?नाकारलं आपल्याला..- का?‘त्यांच्यात’ घेतलेलंच नाही...- का?असे अनेक का ? का? का?आपल्या आयुष्यात असतात, आपल्या वाट्याला येतात. वाटतं, आपण कुठे कमी पडलो, आपल्यात काय न्यून आहे? त्यांच्यात असं काय भारी आहे?असे प्रश्न आपल्याला पडतात. आपल्याला वर वर काही खोट सापडत नाही. उत्तर मिळत नाही. मग आपण जे एरवी आपल्याला चांगले वाटलेलो असतो, लोकांनी आपल्याला ‘त्यांच्यात’ घ्यावं म्हणून आपण धडपडत असतो. आणि मग केवळ त्यांनी आपल्याला टाळलं म्हणून लगेच तेच लोकं वाईट होतात!आपण लगेच त्यांचं हे असंच आणि ते तसेच, अशी शोध मोहीम कळत नकळत सुरू करतो.खरं तर असं व्हायला लागले की अशावेळी मनाला लगेच एक ब्रेक दिला पाहिजे. दुसरं काही अजून बरं आपलं मन व्यापून टाकेल का, ते शोधलं पाहिजे. अर्थात, त्यात रमल्यावर देखील हे विचार उफाळून येऊच शकतात; पण ते ‘होल्ड’वर टाकून इतर कामात गुंतून घेतल्यावर कदाचित काही उत्तरं आपोआप मिळून जातात. त्याच गोष्टीकडे बघायचे वेगळे पैलू दिसतात. स्वत:मधली खोटदेखील समजून घ्यायचा प्रयत्न करता येतो. कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या गावीही नसतं की तुमच्या मनात त्यांच्या कोणत्या वागण्याचा आणि कसला राग आहे. आपल्याच मनात संप सुरू होतात. उठाव होतात. आंदोलनं होतात. आपण बाहेरून शांत असल्याचं दाखवत असतो आणि समोरच्याला यातलं काहीच माहीत नसतं. अशावेळी थेटच बोलून घ्यायला हवं. ते शक्य नसेल तर एखादा मध्यस्थ गाठून आपली शंका दूर करून घ्यावी.अवघड वाटतं; पण प्रयत्न केला तर हे जमूच शकतं.कधी कधी कोणी स्ट्रॅटेजी म्हणून आपल्याला असे दूर करतातदेखील. खासकरून कामाच्या ठिकाणी असा अनुभव येऊ शकतो. आपण स्वत:हूनच काही गोष्टींचा नाद सोडून द्यावा, असाही एक पैलू त्या स्ट्रॅटेजीला असतो. पण, तिथेही आपल्याला नेमकं काय आणि कसं साध्य करायचे आहे, ही स्पष्टता असेल तर टिकून राहून गोष्टी बदलता येतात. कधी कधी ती संधीदेखील होऊन जाते. ‘तिथून बाहेर पडले नसते/नसतो तर हे झालंच नसतं’, असा अनुभव आपण कित्येकांचा ऐकत, वाचत असतो. ते अशाच कुठल्या तरी नकाराला पचवून उभे राहिलेले असतात. आहे त्या परिस्थितीतून बाहेर येऊन जास्त मोठं आणि चांगलं काही करतात; पण अशाही वेळी ज्यांनी आपल्याला नाकारलं, टाळलं त्यांना एका मर्यादेपलीकडे सुनावण्यात काही अर्थ नसतो. तसं केल्यानं तोच एक विचार सतत बॅकग्राउंड म्युझिकसारखा आपल्या मनात सुरू राहतो. हा विचार आपलं मोटिव्हेशन म्हणून काहीकाळ वापरता येतो. आपला आपल्या कामातला फोकस वाढवायला, कष्ट घ्यायला प्रोत्साहन देतो; पण कालांतराने तो गळून एखादी गोष्ट आवडते म्हणून त्यात आपल्याला झोकून द्यावंसं वाटतं असा टप्पा यायला हवा. कोणाला तरी काहीतरी दाखवून द्यायचं आहे, हे किती काळ मोटिव्हेशन म्हणून वापरणार आपण, असा विचार केला पाहिजे.खरं तर, आपल्याला जे नाकारत आहेत, असं आपल्याला वाटतं ते क्वचित कदाचित आपले हितचिंतकदेखील असूच शकतात; पण एकदम आपण नाकारले गेलो आहोत, या भावनेच्या आहारी जाऊन जे एखाद्या संवादातून सुटू शकेल, ते आपण खूपच गुंतागुंतीचे करून टाकतो. म्हणूनच अशा टप्प्यावर सेल्फ चेक, होल्ड आॅन मोड खूपच महत्त्वाचा आहे. शिक्के मारून मोकळं व्हायचे नाही. दमानं घ्यायचं. आपलं विचारांचं क्षितिज विस्तारतं का, ते आधी बघायचं.ते कसंकसं करायचं, करता येतं का,हे पाहू पुढच्या भागात..हे करून पाहा..१) आपण नाकारले गेलो आहोत, ही भावना आपल्या मनात फॅक्ट म्हणूनदेखील पक्की करायच्या आधी ‘होल्ड’वर ठेवायची. थेट निदान करून टाकायचं नाही. कोणाची तरी त्या वेळेची काहीतरी अपरिहार्यता असेल बाबा, काहीतरी कारण असेल, असे स्वत:ला समजावायचं. त्या एकाच गोष्टीने माणूस-घटना जोखायची नाही.२) एरवी ‘शितावरून भाताची परीक्षा’ कितीही खरे असले, तरी केवळ शितावरून भाताची सर्वकाळ परीक्षा करता येईलच असे नाही, हे समजून घ्यायचं. ते शित भात शिजवताना कोणत्या टप्प्यातून घेतलेलं े आहे, त्यावर बरंच काही अवलंबून असतं. कदाचित जो भात समोर शिजलेला दिसतोय, त्याचे ते शित नसूदेखील शकते. सॅम्पल कलेक्शनमध्ये काहीतरी चूक झालेली असूच शकते. आपण शित ओळखण्यातले तज्ज्ञ नसू शकतो, असं बरंच काही.३) कधी कधी आपल्याला असे थेट आणि व्यक्तीश: नाकारलेले नसते. आपण ज्या परिस्थितीचा वगैरे भाग असतो, ते त्या-त्या स्वीकारण्यात गरजेचं नसतं. कधी अनफिट देखील असते. आपण नाकारले गेलो आहोत, हे पक्के करायच्या आधी आपणच आपल्याला कोणावर थोपवले तर नाही नां, हेदेखील बघायला लागतं नां? वरवरच्या एखाददुसºया अनुभवातून मत बनविणे खूपच सोपं असतं; पण तसं सातत्यानं होतेय का, सर्वत्र होतेय का, कुणाकुणाच्या बाबत होतेय, आपल्याला वाटतं तसंच होतंय का, असे बरेच पैलू यात असतात. अनेक गोष्टी आपल्या आकलन आणि माहिती बाहेरच्या असू शकतात.