शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

एको चेंबर्स आणि फिल्टर बबल! माहितीचे बुडबुडे आणि एकुसरी प्रतिध्वनी आपल्याला ‘कोंडून’ घालतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 1:16 PM

एको चेंबर्स आणि फिल्टर बबल्स या सोशल मीडियातल्या दोन संकल्पना. त्या आपल्याला एका चौकटीत कोंबून एकसुरी माहिती आपल्यावर लादतात. आपले विचार, मतं, आपलं वागणंच नाही तर जगणंही त्या ‘एकलकोंडं’ करून टाकतील, असं भय आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर वावरताना आपल्यामध्येही बदल होत असतात, ते काय आणि कशाप्रकारचे ?

-मुक्ता चैतन्य 

फेसबुक किंवा ट्विटरवर वावरताना सहज बारकाईनं बघा, तुमच्यार्पयत कोणत्या प्रकारच्या पोस्ट येतात? कुठल्या माणसांच्या पोस्ट येतात? काय काय तुमच्यार्पयत येतं? वारंवार त्याच त्या माणसांच्या पोस्ट तुमच्या टाइमलाइनवर दिसतात का? जरा बारकाईने बघितलंत तर लक्षात येईल की आपण जो विचार करत असतो, ज्याविषयी बोलत असतो, ऑनलाइन जे बघत असतो, जे सर्च करत असतो, जे फॉलो करत असतो, शेअर आणि कमेण्ट करतो त्याच्याशी संबंधितच तपशील आपल्यार्पयत वारंवार येतात.  त्यापलीकडचं क्वचितच आपल्यार्पयत पोहोचतं. दुसरीकडे सोशल मीडियावर वावरताना आपल्यामध्येही बदल होत असतात, ते काय आणि कशाप्रकारचे बदल असतात याकडेही बारकाईने बघितलं तर लक्षात येईल की, सोशल मीडिया वापरताना हल्ली आपण आधी आपल्याशीच आतल्या आत बोलत असतो. पुटपुटत असतो. एखादी पोस्ट वाचल्यानंतर मनातल्या मनात आधी आपण प्रतिक्रि या देतो, आपल्याच प्रतिक्रि येवर पुन्हा मनातल्या मनात प्रतिक्रि या देतो, समोरचा काय लिहील याचा अंदाज स्वतर्‍शीच बांधतो आणि मग आपली कमेण्ट प्रत्यक्षात लिहितो..सोशल मीडियाच्या या आभासी जगात तसे आपण काही कोटी लोकांच्या गर्दीत असतो; पण असतो तसे एकटेच. मात्र आपल्याला जे काही ऐकायचं, बघायचं, वाचायचं असतं तेच सतत बघत, ऐकत आणि वाचत असतो. त्याच त्या लोकांर्पयत सतत पोहोचत असतो. तीच ती माणसं आपल्याला पुनर्‍ पुन्हा दिसत राहातात. तेच ते आपण परत वाचत राहातो. आपल्याच विचारांचे प्रतिध्वनी आपण पुनर्‍ पुन्हा ऐकत असतो. आपल्याला जे माहीत आहे, आपल्याला जे ऐकायला, वाचायला आवडतं, जे हवंय तेच ते पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यांसमोर येतं. या सार्‍याला समाजमाध्यमांचे अभ्यासक ‘एको चेंबर्स’ म्हणतात. म्हणजे अशी जागा किंवा अशी अभासी खोली जिथं बसून आपण सतत आपल्याला पटलेले, रु चलेले, आवडलेलेच विचार, माणसं, वस्तू यांच्याच संपर्कात असतो. एको म्हणजे प्रतिध्वनी जसे कानावर सतत पडतात तसे हे सोशल मीडियातले एको चेंबर्स.असे ‘एको चेंबर्स’ तयार होतात कारण सोशल मीडिया आणि विशेषतर्‍ फेसबुकनं त्यांचे अल्गोरिदम बदलले आहेत. ते अधिक वैयक्तिक पातळीवर आणले आहेत. हा सगळा विषय आणि त्याच्याशी आपला सोशल मीडिया यूझर म्हणून असलेला संबंध समजून घ्यायचा असेल तर आधी अल्गोरिदम म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. अल्गोरिदम म्हणजे तुम्ही काल काय निवडलं होतं, आज काय निवडलं आहे आणि उद्या काय निवडू शकता यावर प्रभाव टाकणारं तंत्नज्ञान. आपल्या आभासी जगातल्या पाऊलखुणा आणि पाऊलवाटा वापरून आपला आभासी जगातला वावर आणि वापर ठरवू पाहणारं तंत्नज्ञान. हे फेसबुक अल्गोरिदम काय करतं तर तुमच्या वॉलवर येऊ शकणार्‍या सगळ्या पोस्टमधून तुम्हाला नेमकं  काय बघायला, वाचायला, ऐकायला हवंय आणि आवडेल ते ठरवून तेवढय़ाच पोस्टचा अग्रक्र म लावून ते तुमच्या वॉलवर दिसेल अशी सोय करतं. फेसबुक अल्गोरिदम चार गोष्टींवर अवलंबून असतो.1) आपल्या वॉलवर येणार्‍या सगळ्या पोस्टची यादी.(इन्व्हेण्टरी)2) प्रत्येक पोस्ट काय आहे ते फेसबुकला सांगणारे संकेत. (सिग्नल्स)3) प्रत्येक पोस्टवर आपण कसे प्रतिक्रि या देऊ याचे पूर्वानुमान किंवा अंदाज. ज्यामुळे आपल्याला हव्या असलेल्या, आवडणार्‍या पोस्टची निवड (प्रेडिक्शन्स)4) सगळ्या घटकांना विचारात घेऊन केलेली अंतिम निवड. (फायनल स्कोअर)ही सगळी यंत्नणा विकसित झाली आहे ती मुळात फेसबुकच्या आर्थिक उत्पन्नासाठी. फेसबुकवर जाहिरातींची एक प्रचंड मोठी इंडस्ट्री आहे. जाहिरात करणारा आपल्याला नेमक कुणार्पयत पोहोचायचं आहे हे ठरवून फेसबुकच्या माध्यमातून नेमक्या त्याच व्यक्तीर्पयत पोहोचत असतो. तुम्ही तुमच्या फेसबुक वॉलवरची एखादी जाहिरात बघा. तिथे उजवीकडे असलेल्या तीन उभ्या टिंबांवर क्लिक केलं तर एक ऑप्शन दिसतो ‘व्हाय एम आय सीइंग धिस?’ त्यावर क्लिक केलंत तर ती विशिष्ट जाहिरात तुम्हाला का दाखवली जाते आहे याचे तपशील तुम्हाला बघायला मिळतात. ज्यात टार्गेट ग्राहकांविषयी लिहिलेलं असते. म्हणजे जाहिरात करणार्‍या व्यक्तीला कोणत्या वयोगटातील, कोणत्या भौगोलिक परिसरातील, कोणत्या भाषिक स्त्नी किंवा पुरु षांर्पयत जाहिरात पोहोचवायची आहे याचे तपशील दिलेले असतात. त्यामुळे फेसबुकवर आपल्याला ज्या जाहिराती दिसतात, त्याच नेमक्या दिसतात कारण आपण त्यांचे ‘टार्गेट ग्राहक’ असतो. पर्सनलाइज्ड अल्गोरिदम फक्त इतकंच करत नाहीत, तर या जाहिरातींच्या बरोबर सोशल मीडियावरच्या आपल्या पाऊलखुणांनुसार इतरांच्या पोस्ट आपल्याला दाखवायला लागतं. आपल्याला सतत आपल्याच विचारांशी, आवडीनिवडीशी संलग्न पोस्ट दिसत राहातात. आपल्या फ्रेण्डलिस्टमध्ये असणार्‍या प्रत्येकाच्या पोस्ट दिसणं तर केव्हाच बंद झालं आहे. आपल्याला एखाद्याच्या पोस्ट सातत्यानं बघायच्या असतील तर त्या व्यक्तीच्या वॉलवर दोन-चारदा जाऊन यावं लागतं, त्या व्यक्तीच्या पोस्टवर व्यक्त व्हावं लागतं तरच आपल्याला त्या पोस्ट दिसतात. अन्यथा फेसबुक ठरवतं आपल्याला काय दिसेल आणि काय नाही. आपल्याला काय आवडू शकतं याचा निर्णय तंत्नज्ञान घेतं आणि तेवढंच आपल्यार्पयत पोहोचवलं जातं. निरनिराळ्या विचारधारांकडे, विषयांकडे, व्यक्तींकडे पूर्णतर्‍ दुर्लक्ष करून आपल्यासारखाच आवाज, विचार ऐकण्याची सोय तंत्नज्ञानानं करून ठेवली आहे. कारण आपल्याला तेच आवडतं, ते आवडलं तर आपण फेसबुकवर जास्त वेळ राहू. तेच ते वाचू, तेच खरं असं मानू असं यात गृहीत धरलेलं असतं. त्यालाच ‘एको चेंबर्स’ म्हणतात. मीडिया कंपन्यांनी अल्गोरिदममध्ये केलेला हा बदल जाहिरातींचा बाजार आणि ग्राहक काबीज करण्यासाठी असला तरी आपण नेमकं काय बघायचं, आणि आपल्याला काय दाखवलं जातंय, आपल्यार्पयत कोण व्यक्ती आणि विचार पोहोचत आहेत हे सारं आता आपल्या हातात उरलेलं नाही.हे सारं पाहता तोंडावर आलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीकडे आणि त्यानिमित्तानं एकंदरीतच आपल्यार्पयत पोहोचणार्‍या माहितीकडे बघायला हवं. आपल्यार्पयत पोहोचणारं सगळं खरं असेलच असं नाहीच; पण त्याचबरोबर जे आपल्यार्पयत पोहोचतंय, तेच नेमकं का पोहोचतंय आणि इतर माहिती, आपल्या विचारांपेक्षा वेगळा विचार, आपल्या मतांपेक्षा वेगळी मतं आपल्यार्पयत का येत नाही याचाही विचार करणं अतिशय गरजेचं आहे. सतत आपल्या आवडीनिवडीशी, विचारांशी, इच्छांशी, अपेक्षांशी, स्वप्न आणि लालसेशी संबंधित माहिती मिळत राहाणं हे भयावह आहे. आपली वर्तणाकूल व्यवहार हेरून, आपल्याला फक्त आपलेच प्रतिध्वनी ऐकू येताहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आज सोशल मीडियावर आपल्याला मुक्तपणे व्यक्त होता येत असलं आणि त्यावर कुणाचंही बंधन नसलं तरी सोशल मीडिया चालवणं हा एक व्यवसाय आहे. तो अर्थातच बाजारधार्जिणा आहे. आपण त्याचे फक्त लाभार्थी नाही तर ग्राहक आहोत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपल्या विचारांच्या प्रतिध्वनीपलीकडचे विचार आणि आवाज जर आपल्याला ऐकूच येणार नसतील तर आपण एककल्ली, एकांगी होत जाणार हे उघड आहे. हे एकारलेपण भारतसारख्या समाजाला घातक आहे. त्यातून आपल्या समाजाचं ध्रुवीकरण सहज साध्य आहे. त्याला आपण बळी पडणार का?हे एको चेंबर्स आपल्याला एका बंदिस्त खोलीत कोंबून पुनर्‍ पुन्हा तेच ते ऐकावयाचा, दाखवण्याचा प्रय} करत आहे आणि जे आपल्याला ऐकू येतंय तेच खरं असं आपण गृहीत धरतोय.लक्षात ठेवा, ते आणि तेच तेवढं खरं असेल. असतंच असं नाही!

****

फिल्टर बबल

माहितीचे फुगे उडतात आणि आपण तरंगतो, त्यानं काय होतं?

एकीकडे आपल्याला तेच ते ऐकवणारे, दाखवणारे, विशिष्ट विचारात कोंडून घालणारे एको चेंबर्स आहेत तर त्यासोबत अजून एक भयंकर गोष्ट आहे. एक प्रकारचा फुगवटा आहे, त्याला म्हणतात फिल्टर बबल.फिल्टर बबल ही संकल्पना एली पॅरिसर या सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिस्टने 2010 साली पहिल्यांदा मांडली. फिल्टर बबल म्हणजे बौद्धिक अलगवादाची (इंटलेक्चुअल आयसोलेशन)ची अवस्था. शब्द अवघड वाटत असला तरी प्रत्यक्षात आपल्या सगळ्यांच्या संदर्भात ते होऊ शकतं. कारण ही अवस्था आहे बौद्धिक एकटेपणाचीअवस्था.ही अवस्था माणसांना इतरांचं काहीही ऐकून, समजून घेण्यापासून परावृत्त करते. म्हणजे काय तर सोशल मीडिया वापरणारा कुणीही काय बघेल याचा अंदाज, त्याची वैयक्तिक माहिती, पूर्वी त्यानं केलेले सर्च, तो कुणाला फॉलो करतो आणि एकूण त्याचा सोशल मीडिया व्यवहार आणि वर्तन हे सारं सतत जमा होत असतं. त्यामुळे त्याच्याशीच निगडित माहिती त्याला पुरवली जाते. यूझरला काय बघायला आवडेल याचा निर्णय यूझरच्या हातात न राहाता तो तंत्नज्ञानाच्या हातात गेला आहे. कुंपणापलीकडचं दिसूच नयं अशी व्यवस्था तंत्नज्ञानाने आपल्यासाठी करून ठेवली आहे. ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे सोशल मीडियावरच्या चर्चा आणि त्यातला विसंवाद.अजून सोपं करायचं झालं तर आपण काय बघतोय, वाचतोय हे आता आपल्या हातात नाही. इतरांनी घेतलेल्या निर्णयांप्रमाणे आपण सोशल मीडियावरून येणारी माहिती वाचत, बघत, ऐकत असतो आणि त्यावरून आपली मतं बनवत असतो. म्हणूनच मतं बनवणं, मत प्रभावित करणं या सगळ्याच गोष्टी सोशल मीडियामुळे सहज शक्य झाल्या आहेत. एरवी माणसं एकमेकांशी सहजतेनं बोलू शकत असताना सोशल मीडियावर मात्न ती विसंवादी होतात. वाद घालतात. ते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण एको चेंबर्स आणि फिल्टर बबल  आहे. आपल्यार्पयत संपूर्ण माहिती पोहोचत नाही. आपल्याला जे हवंय तेवढंच पोहोचतंय ते सर्वागीण आणि परिपूर्ण नाहीये. खरं- खोटं नेमकं कळतच नाही. एकीकडे आपण म्हणतो माहितीचा महापूर आहे, आपल्या अंगावर सतत माहिती येऊन आदळत असते, पण त्याचवेळी ‘अमुक एका प्रकारचीच माहिती’ वारंवार आपल्यार्पयत का पोहोचतेय हे आपण स्वतर्‍ला विचारत नाही. अपुरी, थोडीशीच, तोडफोड केलेली, बदलून-फिरवून सांगितलेली माहिती आपल्यार्पयत पोहोचते, जी आपण खरी मानतो. किंवा ती खरी आहे असं आपल्याला भासवलं जातं. त्यावर विश्वास ठेवून आपली मतं बनवत जातो.यातली सगळ्यात मोठी गोची म्हणजे प्रत्यक्ष परिस्थितीपासून आपण दूर जायला लागतो. ज्याला ग्राउंड रिअ‍ॅलिटी म्हणतात. त्यापासून आपण फारकत घेतो. आणि आपल्यार्पयत पोहोचलेली माहिती आणि त्यावरचं आपलं मत हेच जगातलं अंतिम सत्य आहे असं मानण्याची आपली मानसिकता होते. मग ते राजकारण असो, नाती असोत नाहीतर जगण्याच्या मूलभूत कल्पना.वास्तव आणि आभास यातली सीमारेषा ‘एको चेंबर्स’ आणि ‘फिल्टर बबल्स’ पुसून टाकतात. या सगळ्याच गोष्टी भावनिक-मानसिक-सामाजिक आणि बौद्धिक नुकसान करणार्‍या असतात. आपण आपल्याच भ्रमाच्या विचित्न चक्र ात अडकत जातो. 

***

एको चेंबर्स आणि फिल्टर बबलपासून स्वतः ला  वाचवायचं तर?

* तंत्नज्ञानानं जरी आपल्याला एका चौकटीत कोंबून कुंपणापलीकडचं दाखवायला नकार दिला असला तरी आपण आपल्याला हवं ते शोधू शकतोच. * आपल्या मतांपेक्षा निराळी मतं ऐकण्याची, समजून घेण्याची तयारी असेल, आपल्या आवडीनिवडींच्या पलीकडंच बघायचं असेल तर आपल्यापासून माहितीला कुणीही रोखू शकत नाही.*  माहिती खरी आहे की खोटी हे न तपासता त्यावर विश्वास ठेवण्याआधी एकदा स्वतर्‍ला विचारलं तर बर्‍याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतात. * आपल्यापर्यंत  जेव्हा माहिती पोहोचते तेव्हा आपण कसलाही विचार न करता जर त्यावर विश्वास ठेवणार असू, तेच खरं मानणार असू तर दोष फक्त तंत्रज्ञानाचा नाही, आपलाही आहे.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)