एकतर या काळात नोकरी मिळणं अवघड. त्यात फ्रेशरला संधी मिळणं तर अवघड. त्यामुळे जे मिळेल ते काम सध्या स्वीकारा.पैसे कमी मिळत असतील तरी कामाचा अनुभव मिळेल. आणि तो आता मोलाच आहे.मात्र काहीजण अशा छोटय़ा नोक:या करतच नाहीत. आणि केल्या तरी इतरांना सांगतात की, माझा अनुभव फार फ्रस्ट्रेटिंग होता. फारच डिसअपॉइण्टिंग होतं सारं. आपल्याला काहीपण काम सांगत, ते नाही पटलं.पण हे सारं घडतं कारण चुकीचा दृष्टिकोन घेऊन आपण नोकरीकडे पाहतो.नोकरीतून उत्तम पैसे मिळाले पाहिजे यात शंका नाही, मात्र ज्या काळात नोकरी मिळणं अवघड त्याकाळात छोटा जॉबही आपल्याला शिकण्याची मोठी संधी देऊ शकतो.
त्याअर्थानेच या कामाकडे पाहिलं पाहिजे.
1) नोकरी लागली की अनेकांना वाटतं की, मी लहानसहान कामं करणार नाही. माङया विषयाचं काम करेन बाकी विषयाशी माझा काही संबंध नाही.मला फार काम सांगू नका, मला तमुकच काम सांगू नका. चुकतं ते इथंच. पडेल ते काम करण्याची तयारी हवी. प्रत्येक काम आपल्याला त्या संस्थेविषयी बरंच काही सांगतं.
2) अगदी पेपरच्या फाइल करण्यापासून, ते रेकॉर्ड ठेवणं, ते एण्ट्रय़ा मारणं, ते लहानसहान दुरुस्ती, कुणाशी संवाद किंवा फोन कॉल अशी कामं रटाळ वाटू शकतात.बोअर होतात. पण म्हणून काम सोडायचं नाही. समजायचं की आपल्याला प्रॅक्टिस करवत आहेत, येऊ दे कसाही चेंडू मी खेळून दाखवतोच.
3) इगोमध्ये आणायचा नाही. कुठल्याही प्रकारची लैंगिक हॅरासमेण्ट सहन करायची नाही. मात्र कामाचा भाग म्हणून जी कार्यालयीन कामं वाटय़ाला येतील, त्याला ही काय बायकांची कामं आहेत का?मला कसं अमुक काम सांगतात असा इगो इश्यू मुलांनी आणि मुलींनीही करायची गरज नाही.
4) चुका होणारच. त्या होतील, बोलणी बसतील हे मनाशी ठेवून काम करायचं. आपल्याला वर्ष सहा महिने या कामातून काय काय शिकून पुढची पायरी चढता येईल, एवढाच विचार करा.