अतुल कहाते
ताणतणाव आणि मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्या हा प्रकार माणसाला काही नवा नाही. जसजसं माणसाचं आयुष्य अधिकाधिक धकाधकीचं होत गेलं आणि एकत्न कुटुंबपद्धतीपासून माणूस जसजसा विभक्त कुटुंबपद्धतीकडे जात राहिला तसतसं या ताणतणावांचं प्रमाण अजून गंभीर होत गेलं. जे लोक आपल्या आयुष्यात लौकिक अर्थानं अपयशी ठरतात त्यांना तर या ताणतणावांच्या समस्या सतावताच; पण ‘यशस्वी‘ ठरलेल्यांचीही यातून सुटका होऊ शकत नाही! एकीकडे आपण काही करू शकलो नाही याचा तणाव, तर दुसरीकडे हे सगळं करून आपण नेमकं काय मिळवलं, असा प्रश्न. याच्या जोडीला नातेवाईक, मित्न-मैत्रिणी, सहकारी यांच्याशी संबंधित असलेल्या मुद्दय़ांवरून येणारे ताणतणाव वेगळेच. नवरा-बायकोमध्ये स्मार्टफोन आणि व्हॉट्सअॅप यांच्यापासून कुणी कशात पुढाकार घ्यायचा आणि माघार घ्यायची यावरून होत असलेला विसंवाद तर आता घरोघरी दिसतो. आधीच्या पिढीला कसं आणि कुणी सांभाळायचं तसंच पुढच्या पिढीशी कसं जुळवून घ्यायचं या मुद्दय़ांवरूनही अनेक घरांमध्ये सगळं बिनसलेलं दिसतं. एकूण काय स्ट्रेस आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न आता मोठे होत चालले आहेत. शिक्षणाकडे दुर्लक्ष किंवा त्यामधली कामगिरी एकदम घसरणं, व्यसनं लागणं, स्मार्टफोन आणि इंटरनेटचं अॅडिक्शन यामुळे असंख्य प्रश्न निर्माण होणं ही कोवळ्या वयातल्या मुलांची भीषण समस्या बनली आहे.
संधी कुणाला?जवळपास प्रत्येक शाळा, महाविद्यालय, कार्यालय अशा ठिकाणी आता मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या समुपदेशकांची नेमणूक केली जाते. मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्या मोठय़ा रोजगार संधीला निमित्त ठराव्यात हे काही फार बरं लक्षण नव्हे, निकोप सक्षम समाजाचं लक्षण तर अजिबातच नाही; पण निदान मदतीचा हात देणारी आणि त्याविषयी उघड मदत मागणारी माणसं आता उपलब्ध असणं ही चांगलीच गोष्ट आहे. अर्थातच हे काम करणं अजिबातच सोपं नाही. त्यासाठी मानसशास्त्नाचा सखोल अभ्यास करणं, अनेक ‘केस स्टडी’ स्वतर् कुणाच्या तरी हाताखाली हाताळणं अशा अनेक गोष्टी पारंपरिक अभ्यासक्र माखेरीज कराव्या लागतात. आपलं व्यक्तिमत्त्व अशा प्रकारचं काम करण्यासाठी योग्य आहे का हेसुद्धा आपण योग्य माणसांकडून तपासून घेतलं पाहिजे. संभाषणकौशल्य आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असल्याशिवाय आपण समोरच्या माणसाचा विश्वास संपादित करू शकत नाही याची प्रत्येक होतकरू समुपदेशकानं जाणीव ठेवलीच पाहिजे!
स्कोप का आणि किती?मानसिक समस्या वैयक्तिक तसंच सामूहिक पातळीवर समजून घेऊन त्यातून योग्य दिशा दाखवू शकणार्या समुपदेशकांची प्रचंड मोठय़ा प्रमाणावर गरज आत्ताच भासते आहे. मानसिक प्रश्न अधिकाधिक जटिल आणि गंभीर होत चाललेले असल्यामुळे ही गरज आणखी वेगानं वाढणार यात शंका नाही. मानसशास्त्नाच्या पदवीच्या शिक्षणापासून फक्त मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्यांचा ऊहापोह करणार्या अभ्यासक्र मांर्पयत असंख्य शैक्षणिकपर्याय त्यासाठी उपलब्ध आहेत. याविषयात गांभीर्यानं अभ्यास करून विविध क्षेत्रात काउन्सिलर, शाळा-कॉलेजात समुपदेशक, कार्पोरेट जगातलं काम आणि स्वतर्ची स्वतंत्र प्रॅक्टिस अशा अनेक संधी या क्षेत्रात आहेत. भविष्यात त्या वाढणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात तर त्या अधिकच वाढत जाणार आहेत.