- अनुराधा प्रभुदेसाई
पुढे काय? हा प्रश्न दहावी-बारावीच नाही तर अगदी ग्रॅज्युएशनच्या टप्प्यावरही पाठ सोडत नाही. अनेकदा मुलांना बरंच काही करायचं असतं, ते म्हणतात अजून माझं काही ठरलं नाही. मी एक्सप्लोअर करून पाहणार आहे. पालकांची त्याला ना नसते; पण हा शोध किती काळ चालणार, नेमकं आपल्याला काय आवडतं किंवा कशात अधिक उज्जवल संधी आहेत हेच मुलांना कळत नाही आणि पालकांना सांगता येत नाही. अनेकदा आपण अमुकच करिअर करायचं असं ठरवलेलं असलं तरी आपली तशी क्षमता आहे का? त्यात खरंच काही भवितव्य आहे का? पिअर प्रेशर किंवा काहीतरी आकर्षण यापायी निर्णय घेतला आहे का? हे काही कळत नाही. अशावेळी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आपली अॅप्टिटय़ूड टेस्ट करून घेणं.मात्र ती टेस्ट करणं म्हणजे काय आणि तिच्याकडून नेमक्या किती अपेक्षा करायच्या, आपले निर्णय कशाच्या आधारे घ्यायचे, कल समजून घ्यायचा, करिअरचा निर्णय नव्हे हे सगळं मनाशी स्पष्ट असायला हवं.मात्र हल्ली अॅप्टिटय़ूड चाचण्या म्हणजे अभिक्षमता चाचण्याही सर्रास कुठंही केल्या जातात. अनेकजण सांगतात की, टेस्ट केली; पण गोंधळ वाढला काहीच निर्णय घेता आला नाही. असं होतं कारण या चाचण्यांबद्दलच मनात प्रचंड गोंधळ असतो. ‘या परीक्षेसाठी काय तयारी करावी लागेल’, असा प्रश्न नेहमी पालक विचारतात. अनेकवेळा काही अतिजागरूक पालक एकाहून अधिक ठिकाणी जाऊन अॅप्टिटय़ूड टेस्ट करून घेतात आणि निर्णय वेगळे वेगळे आले की आणखी गोंधळात पडतात.
अॅप्टिटय़ूड टेस्ट म्हणजेनक्की काय?अॅप्टिटय़ूड टेस्ट म्हणजे नक्की काय? ती कोणाकडून करून घ्यावी? त्यांचे निष्कर्ष कसे समजून घ्यावेत? हे आधी समजून घेतलं पाहिजे. मानसशास्ननुसार अॅप्टिटय़ूडची व्याख्या काय तर ‘प्रशिक्षणामुळे फायदा होण्याची क्षमता’! म्हणजे आपला कल असा काय आहे की ज्याचं प्रशिक्षण मिळालं तर अधिक चांगलं काम, करिअर करता येऊ शकेल?ती क्षमता फक्त समजून घ्यायची असते, त्यामुळे ही टेस्ट कशात करिअर करू, असा काही निर्णय देत नाही. तर दिशादर्शक ठरते.त्यामुळेच या चाचणीसाठी तयारीची आवश्यकता नसते.मुळात ही एकच एक चाचणी नसते तर अनेक उपचाचण्यांमध्ये विभागलेली असते. उदा. भाषिक क्षमता, यांत्रिक क्षमता, गणित संकल्पाची क्षमता, तर्कसंगत विचार करण्याची क्षमता इ. सर्वसाधारण चाचण्या या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतात. या चाचण्यांची उत्तरे देताना विद्याथ्र्यानी स्वतर्शी प्रामाणिक राहून उत्तरं देणं आवश्यक आहे. ते व्यक्तीच्या विकसित होऊ शकणार्या क्षमतांचं एकसंध चित्र असतं. सर्वच क्षमतांमध्ये विद्यार्थी उत्तम असतोच असंही नाही.या चाचणीच्या निष्कर्षानुसार मानसशास्रज्ञ व्यवसाय मार्गदर्शन करतात तेव्हा अभिक्षमता चाचण्यांचेच निष्कर्ष तांत्रिकपणे लक्षात घेत नाहीत तर विद्याथ्र्याचं व्यक्तिमत्त्व, कौटुंबिक पाश्र्वभूमी, एखाद्या व्यवसायातील ताणतणाव, बुद्धिमत्ता, शारीरिक आरोग्य इ. गोष्टीसुद्धा विचारात घेतल्या जातात. मानसशास्नच्या योग्य अभ्यासाअभावी या टेस्टनुसार काढलेले निष्कर्ष अपुरे किंवा चुकीचे ठरू शकतात. म्हणून आकर्षक जाहिरात, गोड बोलणं, मोठमोठी आश्वासन देणारे लोक यांना भुलून तिथं अॅप्टिटय़ूड टेस्ट करू नये. योग्य व्यक्तीकडून योग्य वेळी जर अभिक्षमता चाचणी करून व्यवसाय मार्गदर्शन करून घेतलं तर ते व्यवसाय निवडीसाठी नक्कीच फायद्याचं ठरतं!
***
अॅप्टिटय़ूड चाचणीची गरज काय?
1. या चाचणीद्वारे विद्याथ्र्यामधील आत्मज्ञान व व्यवसाय निवडण्याबद्दल जागरूकता वाढीस लागते.2. विद्याथ्र्याना स्वतर्ची अभिरूची, अभिक्षमता, मूल्य कौशल्य याचा शोध घेऊन मग महाविद्यालयीन विषयांची निवड करणं सोपं जातं.3. योग्य व्यवसाय शोधून त्या संबंधी माहिती गोळा करणं, माहितीची साधनं शोधून काढणं सोपं जातं.4. आपली व्यक्तिगत ताकद व कच्चे दुवे समजातात.
(लेखिका करिअर काउन्सिलर आणि मानसशास्त्रज्ञ आहेत.)