शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

सतत 12 वर्षे एकटीनं जगभरात समुद्र सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 4:21 PM

ती समुद्री सफर करत जगभर फिरते आहे. गेली ती समुद्री कचरा विषयात जनजागृती करत समुद्राची गोष्ट सांगतेय.

ठळक मुद्दे ‘ई - एक्सपिडिशन राउंड द वर्ल्ड’

 - भाग्यश्री मुळे

जगभरातल्या समुद्रांमध्ये विविध प्रकारचे प्लॅस्टिक जमा होत आहे. पाणी प्रदूषित होत आहे. प्लॅस्टिक माशांसह इतर समुद्री जिवांच्या पोटात जात आहे. अन्नसाखळीतून परत ते मानवाच्या पोटात जाते.  एका अशाच सागरी प्रवासात महिलांच्या आरोग्यावर या सा:याचा काय परिणाम होतो, हा प्रश्न आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लंडन येथील एमिली पेन या 35 वर्षीय तरु णीने या विषयावर काम करायचे ठरवलं.जगाला या समस्येची माहिती व्हावी यासाठी तिने प्रत्यक्ष समुद्रात प्रवास करून संशोधन सुरू केले. या मोहिमेअंतर्गत आतार्पयत एमिलीबरोबर 28 देशांतील 80 महिला संशोधकांनी 10,330 नॉटिकल मैल प्रवास केला. या अंतर्गत 3 वर्षात 38 हजार नॉटिकल मैल प्रवास करून सागरी आरोग्य समजावून घेतले. सध्या जगातील एकूण प्लॅस्टिक उत्पादनाच्या 20 टक्के पुनर्प्रक्रि या होते. जगभरातल्या समुद्रांना प्लॅस्टिकच्या विळख्यापासून कसे वाचवायचे यासाठी धडपड करणो हेच आता या तरुणींच्या जीवनाचे ध्येय बनले आहे.एमिली, त्यांचा चमू, त्यांनी केलेला प्रवास, त्यांना आढळलेल्या गोष्टी, त्यांना पडलेले प्रश्न, त्यातील काही प्रश्नांची आपसूक गवसलेली उत्तरे, उपाययोजना सारे काही अद्भुत आहे. त्यांच्या मोहिमेचे नाव आहे ‘ई - एक्सपिडिशन राउंड द वर्ल्ड’ .आर्किटेक्चरच्या शिक्षणादरम्यान लंडन येथून चीनमधील शांघाय येथे बांधल्या जात असलेल्या एकमेक इको-सीटी येथे तिला डेझरटेशन करण्यासाठी जायचे होते. विमानाऐवजी एमिलीने युरोप, रशिया, मंगोलिया आणि पुढे चीन असा प्रवास रेल्वे, घोडा, उंट अशा साधनांनी करण्याचं ठरवलं. तिच्या आयुष्यातला तो पहिला साहसी प्रवास होता. जैवइंधनावर चालणा:या अर्थरेस बोटीवरून ती 12क् दिवसांच्या सागरी प्रवासाला निघाली. प्रवासात तिची बोट एक दिवस प्लॅस्टिक कच:याला धडकली. ते प्लॅस्टिक बघून ती चक्र ावून गेली. तिने बोटीतून पाण्यात उडी मारली; पण जिकडे तिकडे नुसते प्लॅस्टिकच होते. ती जवळपास 1 मैल पोहत गेली. प्लॅस्टिक समस्येनी ग्रासलेल्या काही बेटाँना या प्रवासात तिने भेटी दिल्या, माहिती घेतली. या प्रश्नातून या प्लॅस्टिकमुक्तीसाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना तिच्या मनात आली. 

या विषयावर काम करायचंच असा दृढ निश्चय करून प्लॅस्टिकमुक्त समुद्रासाठी तिचा प्रवास सुरू झाला. मूळची आर्किटेक्चर असल्याने केवळ समस्या बघायची नाही तर तिच्यावरचा उपायही शोधायचा हे तिने तेव्हाच ठरवून टाकले होते. त्यातून समुद्रकिना:यावरचे, समुद्रातले प्लॅस्टिक गोळा करणो, प्रदूषणाचे नमुने गोळा करणो, त्याचा अभ्यास करणो, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणो यासह अशा अनेक मोहिमा तिने पुढे  तिच्या सहका:यांसह केल्या. मोठमोठय़ा मोहिमा केल्या, अजूनही चालूच आहेत. हा सारा प्रवास केवळ महिलांसोबतच करण्याचे ठरवले. जगभरातल्या संवेदनशील महिला तिला येऊन मिळाल्या. महिला सफरीवर निघाल्या तेव्हा ‘या बायका काम करण्याऐवजी एकमेकींशी भांडत तर नाहीना बसणार’ असे म्हणत अनेकांनी त्यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला; पण बोटीवर एकत्न आलेल्या या धाडसी महिला विशेषत: तरु णी अधिकच एकोप्याने, सहका:याने आणि एकमेकींना प्रेरणा देत मोहिमा पूर्ण करत आहेत. वा:याचा वेग, उसळत्या लाटा आणि अशात 7क् फूट उंच शिडाच्या होडीवर उभे राहणो ही कल्पनाच पोटात भीतीचा गोळा आणणारी ठरते. पण या महिलांनी हे आव्हान स्वीकारले, त्या त्यावर स्वर झाल्या. गेल्या 12 वर्षात एमिली या न त्या मोहिमेमुळे सतत समुद्रात आहे, समुद्र प्रदूषणाविषयी काम करण्याच्या निमित्ताने घराबाहेर आहे.तिची फिरस्ती सुरूआहे, आणि नवं जग सतत खुलं होत ती ते समजून घेते आहे.

( भाग्यश्री मुक्त पत्रकार आहे.)