‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ हा सिनेमा अनेक कारणांनी गाजला.
अनेकांना अनेक पात्रंशी रिलेट करता आलं, पण अनेकांची कथा मात्र वेगळीच होती. त्यांना तनू-मनू आणि दत्ताे यांच्यापलीकडे तिस-याच एका पात्रत आपली गोष्ट दिसली.
त्याचं नाव अरुणकुमार ऊर्फ चिंटू. तोच तो जो वकिली शिकतोय आणि भाडेकरू म्हणून घरात घुसून दादागिरी करतोय!
तसं चिंटूला माहितीच असतं की, तनू थोडी सटक आहे. नव-याला पागलखान्यात डांबून आली आहे. तरी तो तिच्या मागेमागे फिरतो. तिचं अतीच स्वतंत्र आणि सटक असणं त्याला आवडत असतं!
आणि म्हणून मग तिला हवी ती मदत करत, ती म्हणोल ते करत, तिच्या वेडेपणात तिची चिक्कार साथ देतो!
तनूच्या मात्र तो खिजगणीतही नसतो. ती त्याला कशात मोजत नाही किंवा त्याच्याकडे फारसं लक्षही देत नाही!
आणि म्हणून तिचा माजी प्रियकर जेव्हा या चिंटू वकिलाला विचारतो की, ‘तू कोण आहेस?’
तेव्हा तो संतापून सांगतो, ‘वो बिरादरी होती है ना कंधों की, जो कन्या का सिर्फ कंधा बनते है, तो वो हूं मै!’
या विषयावरून ही चर्चा सुरू झाली. दि. 3 आणि 10 जुलैच्या अंकात ‘ऑक्सिजन’मधे दोन लेख प्रसिद्ध झाले होते. एक बाजू होती मुलांची, जे फक्त कंधा बनून राहतात त्यांची, तर दुसरी बाजू होती मुलींची. आपल्यासाठी कंधा बनणा:या तरुणाला समजून घेण्याची, न घेण्याची आणि त्यापलीकडे त्याच्याशी असल्यानसल्या नात्याची!
या लेखांच्या निमित्तानं ‘ऑक्सिजन’ने वाचक मित्रमैत्रिणींना विचारलं होतं की, तुमची आहे अशी काही कहाणी? तुम्ही बनला आहात कधी असा कंधा? बनवलं आहे कुणाला कंधा? वापरलं आहे, वापरू दिलं आहे स्वत:ला?
आणि असं सारं आपल्या बाबतीत होत आहे, हे माहिती असूनही तुम्ही ते सारं का होऊ देता? झटकून का टाकत नाही? की ते तसं घडण्यातच खरा आनंद असतो?
- प्रश्न अनेक होते!
त्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्र आणि गोव्यातल्या तरुण मित्रमैत्रिणींनी पाठवलीच पण लिहिली ‘आपबितीही’!
एक अशी गोष्ट जी त्यांनी आजवर कुणालाही सांगितलेली नव्हती. अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींनाही! दुस:याला काहीही दोष न देता अनेकांनी स्वत:हून आपण ‘कंधा’ कसे बनलो हे तर लिहिलंच पण कबूलही केलं की तो पल दो पल का साथच आजही जगण्याची उमेद आहे.
अनेकांनी मान्य केलं की, ‘ती’ कधीही आपली होणार नाही, आपण तिच्या लायकच नाही हे माहिती असतानाही तिच्या सहवासात थोडा काळ जगता आलं हेच आपलं भाग्य होतं.
आणि मुली?
त्यांची कथा तर अजून वेगळी!
बहुसंख्य मुलींनी लिहिले की, आम्हाला हे ‘त्याच्या’ नजरेतच कळतं की, त्याच्या लेखी आपण फक्त मैत्रीण नाही, पण म्हणून आपल्याला त्याच्याविषयी तसलं काही वाटत नसताना त्याला आशेवर ठेवण्यात अर्थ नसतो. तो फक्त मित्रच असतो, पण त्याला मित्र म्हणून राहायचं नसतं. त्याला आपल्या जगण्यातलं शेअरिंग हवं असतं. मग त्याच्यापुरती जागा तो बनवत जातो!
कधी कधी वाटतंही की, आपण त्याला वापरतोय. पण तसं नसतं अनेकदा, तो एक वेगळाच पेच होऊन बसतो!
- अशा कितीतरी कहाण्या!
ब:याच जणांनी तर आत्मचरित्र लिहावं इतकं मोठं बाड लिहून पाठवलं. केवळ जागेअभावी कुणाच्याच व्यक्तिगत कहाण्या, अनुभव आणि लेख प्रसिद्ध करता येणं शक्य नाही.
मात्र या सा:या पत्रंत होतं काय काय, याची ही एक झलक!
मुलामुलींनी सांगितलेली स्वत:चीच काही सिक्रेट्स!
- ऑक्सिजन टीम
मुलं म्हणतात,
हो, आहे मी कंधा काही प्रॉब्लम?
‘ऑक्सिजन’नला आलेल्या पत्रत बहुसंख्य पत्रं ही मुलांचीच होती. अनेकांनी आपल्या आयुष्यात तिचं येणं, ते स्वत:चं मोर होत नाचणं, तिचं हसणं, मदत मागणं, तिच्यासाठी वाट्टेल ते करण्याची धमक दाखवणं, त्या धमकेतून इतर मुलांना कॉम्प्लेक्स देणं, आणि कुणी काहीही म्हटलं तरी स्वत:ला विसरून तिला मदत करणं हे सारं तपशिलात लिहिलं होतं.
‘ती’ आपली मैत्रीण होती, पण आपण तिचा बेस्टफ्रेण्डही होऊ शकलो नाही, अशी खंतही अनेक पत्रंत होती. काही ठिकाणी अव्यक्त प्रेमाची घुसमटही होती.
एक मात्र विशेष होतं, कुणीही आपण हरलो असं म्हणत नव्हतं. पण तरीही आपल्या हरलेपणाची, आपण गेममधेच नव्हतो या भावनेची चुटपूट सगळ्याच पत्रंमधे होती.
आणि या सा:या पत्रंमधून मग उभं राहिलं एक चित्र.
स्वत:हून कंधा झालेल्या आणि आपण तिचा कंधा आहोत हे अभिमानानं सांगणा:या अनेक दोस्तांचा एक चेहराच!
जो म्हणत होता, हो आहे मी कंधा, स्वत:हूनच झालोय, काही प्रॉब्लम?
आणि मग शोधलं तर का हे तरुण स्वत:हून कंधा झालेत?
तर त्याचीच या सा:या पत्रंत सापडलेली ही काही कारणं.
1) ‘मला आवडते ती, सिम्पल आहे’ बहुतेक मुलांनी हेच कारण सांगितलं होतं. ते म्हणतात, आपल्याला आवडते ती! मात्र आपल्या आयुष्याच्या कक्षेत ती कधीच येणार नाही आणि आली तरी तिचं येणं आपल्याला ङोपणार नाही. पण म्हणून तिच्यापासून लांब राहण्यापेक्षा तिच्या ग्रुपमधे स्वत:हून एण्ट्री मारणं आणि तिचा वन ऑफ द का होईना फ्रेण्ड होणं आपल्याला महत्त्वाचं वाटत होतं.
2) अनेक मुलांनी सांगितलं की, आपण फार सामान्य आहोत हे आम्हाला माहिती आहे. आपण हिरो मटेरियल नाही. मुली आपल्यासारख्या फाटक्या चेह:याच्या आणि फाटक्या खिशाच्या माणसांना उभंही करत नाही. पण त्या मुली ज्या वतरुळात जगतात, ती लाइफस्टाईल आपल्या वाटय़ाला येण्याचा मार्ग असतो, तिचा कंधा बनणं!
3) काही मुलं म्हणाले की, आपण मित्र तर असतोच; पण मित्रपेक्षा जास्त कधी होतो, स्वत:च्याच मर्यादेच्या पुढे मनातल्या मनात कधी सरकतो हे कळतही नाही. त्यामुळे प्रश्न तिचा नसतो, प्रश्न आपला असतो. आपण इमोशनली जास्त अडकत असतो.
4) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकर्षण, ओढ आणि समवयस्क मुलांमधे भासमारूपणा करण्याची संधी यामुळेही अनेकजण कंधा बनतात.
5) आणि काही मात्र इमोशनली एकेकटे असतात. बोलायला कुणीही नसतं. कुढे असतात. आणि मग केवळ ‘तिची’ सोबत आणि तिचं आपल्यावाचून अडतं, ती आपल्याला कामं सांगते या भावनेतून त्यांचं एकटेपण सरतं. आणि आपण कुणीतरी आहोत ही उमेद वाढते!
मुली म्हणतात,
‘त्याची’ गरज नसते, पण तरीही..
‘ऑक्सिजन’नला आलेल्या पत्रत मुली मात्र जास्त प्रॅक्टिकल वाटतात. त्या म्हणतात की, मित्र हे मित्रच असतात. मित्रंशी बोलताना, शेअर करताना काही ऑकवर्डनेस नसतो. मात्र मित्रपेक्षा जास्त काहीतरी बनू पाहणा:या तरुणांची नजर तेव्हाच लक्षात येते. त्यांचं आपल्या पुढे पुढे करणं, मागे मागे फिरणं नेमकं कशासाठी हेसुद्धा कळतं. आणि काहीजण स्वत:ला नुस्ते मित्र म्हणवत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या मनात काय चाललंय हे पटकन कळतं!
पण म्हणून त्यांना हाडतूड करता येत नाही. कारण ते खोटं वागत नसतात. ते इमोशनली मजबूर असतात. त्यांना लाथाडलं, ङिाडकारलं तरी ते दुखावणार आणि आपल्या आयुष्यात दुसरं कुणी आलं तरी त्यांना त्रसच होणार!
पण म्हणून त्यांना हाडतूड करता येत नाही. कारण अनेकदा ते मित्रंपेक्षा जास्त जवळचे वाटतात. हक्काचेही वाटतात.
काही मुलींना कळतंही त्याचं दु:ख. त्या या मित्रला आधार देतात, उभारीही देतात. काही मात्र हरकाम्यासारखं वागवतात.
एक नक्की अनेक कारणांसाठी अशी स्वत:हून कंधा बनणारी मुलं मुलींना आपल्या ग्रुपमधे हवी असतात.
1) एकतर नोट्स, अभ्यास, सबमिशन्स या सा:या काळात त्यांची खूप मदत होते. अनेकदा एखादा विषय त्यांच्याकडून समजून घेता येतो. अनेकदा आपले प्रोजेक्ट पूर्ण करायला ते मदत करतात. त्या जोरावर आपण बरे मार्कबिर्कही मिळवतो.
2) अनेकदा शॉपिंगला, कॅण्टिनला, सिनेमाला सोबत म्हणून ही मुलं येतात. घरचेही त्यांना ओळखतात. त्यामुळे तो सोबत आहे, भला मुलगा आहे यासाठीही बाहेर जाण्याची परवानगी मिळणं सोपं होतं.
3) काहीजण खरंच खूप काळजी घेतात. आपल्या महत्त्वाकांक्षांना खतपाणी घालतात. आपल्याला चांगलं काम करायला भाग पाडतात.
4) काहीजण स्वत:हून आपल्यासाठी मार्गदर्शक आणि मदतनीसाची भूमिका घेतात. त्यामुळे अनेक गोष्टी बिंधास्त करणं सोपं होतं. जी हिंमत मुलगी मैत्रीण देत नाही ती हिंमत या मुलांची मैत्री देते.
5) अनेक मुलींना नकोच असते प्रेम आणि कमिटमेण्टची झंझट. त्यात जातीपातीचे घोळ. उगीच कशाला आयुष्यातले प्रश्न वाढवा असं वाटून त्या आपल्याला आवडत असलेल्या मुलापासूनही अंतर राखूनच वागतात.
तिचा धोका
खूप तरुण मुलांनी ‘तिनं’ धोका दिल्याच्या कहाण्या सांगितल्या आहेत.
सगळ्यांचं म्हणणं एकच की, तिनं कळून न कळल्यासारखं केलं. तिला कळत होतं की, माझं तिच्यावर प्रेम आहे पण तरीही तिनं मला हरकाम्यासारखं सगळं काम करवलं, माङया भावनांशी खेळ केला आणि नंतर दुस:याशीच लगA केलं.
तिच्यासाठीच्या अॅडमिशन्स, तिच्या नोट्स, तिला सांगितलेले बसचे पत्ते, तिला घरी नेऊ सोडणं, पिकअप करणं, तिच्याबरोबरचं शॉपिंग, तिच्यासाठी ब्यूटिपार्लरबाहेर ताटकळणं, तिच्यासाठी रात्ररात्र जागणं, तिच्या घरच्या कटकटी ऐकणं.
हे सारं आपण केलं आणि तरीही तिनं आपल्याला ङिाडकारलं.
तिनं आपल्याला गृहीत धरलं असं बहुतेक मुलांनी सांगितलं!
विशेष म्हणजे हे कबूल केलं की, ती असंच सारं करतेय. आपल्याविषयी तिला फिलिंग नाही हे माहिती होतं, पण तरीही आपण तिच्यामागे फरफटत गेलो ही आपली चूक आहे.!
तिचा धोका नाही, आपणच आपला धोका खाल्ला हे मुलं (बिच्चरे) अनेकदा कबूल करतात!
त्याचा मौका
मुली स्पष्ट सांगतात, आपण काही त्याला धोका दिला नाही.
आम्ही काही त्यांना वापरत नाही.
ते आपला वेळ आणि एनर्जी इन्व्हेस्ट करतात. त्यांना आस असते की, त्यांच्या चांगुलपणानं हे नातं एका वेगळ्या टप्प्यात जाईन. प्रेमाबिमात पडता येईल.
दुर्दैवानं तसं होत नाही.
आणि त्याहून वाईट म्हणजे एका चांगल्या मित्रला आम्ही कायमचं गमावून बसतो.
मुली म्हणतात, या दोस्तांना सांगावंसं वाटतं, प्लीज कंधा बनू नका. आमचे मित्र बना. मैत्रीच्या नात्यातला समभाव जगण्याला अधिक उभारी देईन, तुमच्याही आणि आमच्याही!
कंधा नकोच, सोबती व्हा, प्लीज!!
उल्लेखनीय प्रतिसाद
‘कंधा’साठी पत्रंचा पाऊस पडला, अनेकांच्या ईमेल्सही आल्या. पण केवळ जागेअभावी सगळे लेख, कहाण्या प्रसिद्ध करता येणं शक्य नाही.
तरीही ज्यांचे लेख विशेष उल्लेखनीय होते, त्यांची ही नावं.
मनोज संत- पुणो, अश्विनी गोरे- सोलापूर, स्वप्निल पाटील, अविनाश आंबरे, काव्यस्वरा, प्रकाश बनसोडे- उस्मानाबाद, राजेशकुमार कुटे-परभणी, प्रदीप सामुद्र-नंदुरबार, योगेश काटे, अजय, वेदिका कुमारी, साईप्रसाद ढवळे- नांदेड.