शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तलाश

By admin | Published: February 15, 2017 5:23 PM

गावांतल्या बिननावाच्या ओबडधोबड रस्त्यांवरून येत थेट एफसी रोडवरच्या फुटपाथवरून चालताना, पिझा हट, सीसीडीमध्ये काचेबाहेरून पाहताना आसपासच्या झगमगाटाशी माझं नातं काय, असं स्वत:लाच विचारत राहायचे.

 - शर्मिष्ठा भोसले

 

गावांतल्या बिननावाच्या ओबडधोबड रस्त्यांवरून येत थेट एफसी रोडवरच्या फुटपाथवरून चालताना, पिझा हट, सीसीडीमध्ये काचेबाहेरून पाहताना आसपासच्या झगमगाटाशी माझं नातं काय, असं स्वत:लाच विचारत राहायचे. वेगाच्या जंजाळात सिग्नलच्या लाल-हिरव्या-पिवळ्या प्रकाशातले थांबे शोधत राहायचे.मु. पो. उदगीर, जिल्हा लातूर. हा पत्ता बदलायचा विचार मनात यावा असे दिवस नव्हतेच ते. ओळखीचा प्रदेश, लोक, भाषा, जगणं मला आवडत राहायचं. मी अमान्यच केलं असतं, पण माझं गाव माझा ‘कम्फर्ट झोन’ होतं. अनेकांसाठी असेल तसं. उदगीरच्या उदयगिरी महाविद्यालयात बी.ए.ची पदवी मिळवली आणि सगळे करतात तसं पुढे वाटेत लागणारं एम.ए. करायचं ठरवलं. सुटीच्या काळात आमचे एक सर भेटले. महादेव गंदिगुडे त्यांचं नाव. मी माझा मनसुबा उत्साहात सांगितल्यावर म्हणाले, ‘आता पुढच्या वर्षी अजिबात कॉलेजमध्ये दिसायचं नाही. इथं विद्यार्थी म्हणून नाव कमावलं. नाट्य-वक्तृत्व स्पर्धांतून अनेक मेडल्स जिंकून कॉलेजचंही नाव मोठं केलं. आता हे न सोडवणं साहजिकच आहे; पण इथं थांबशील तर तुझं डबकं होईल. तसं झालेलं मी अनेकांचं पाहिलंय. तू वाहत राहा, साचू नको इथं. शहर सोड.’ मला खूप राग आलता तेव्हा त्यांचा. पण आता नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद या लहानशा गावातून लातूर जिल्ह्यातलं उदगीर, मग पुणे पुन्हा पुण्याहून औरंगाबाद आणि पुढे माहीत नाही... असे स्थलांतराचे थोडे मकाम तय केल्यावर कळतंय, माझी इयत्ता वाढलीय या प्रवासांमधून....शहरात शिकायला आल्यावर पुन्हा काही काळ गावी जायचे तेव्हा मन नकळत तुलना करत राहायचं. समाजशास्त्रात शिकलेलं, की खेडं म्हणजे बंदिस्त समाजरचना. शहर म्हणजे खुली समाजरचना. मात्र खेड्यातलं अनपेक्षित मोकळेपण आणि दुसऱ्या बाजूला शहरातलं बंदिस्तपणही कधी दृश्य तर कधी अदृश्य रु पात अनुभवायला येत राहिलं. म्हणजे असं, की खेड्यात अनेकदा तुमची जात कळत नसेल तर समोरचा ‘तुम्ही कोणच्या लोकाचे?’ असं विचारून मोकळा होतो. पण शहरात एखाद्याच्या जातीची आडूनआडून चाचपणी केली जाते. एका मुस्लीम मित्रानंही त्याला शहराच्या मध्यवर्ती भागात सतत भाड्यानं घर नाकारले जाण्याची सल बोलून दाखवली. मग कळलं, शहर म्हणजे सगळं आदर्श आणि खेडं म्हणजे सगळं टाकून देण्यासारखं असं नसतं. आणि अजून एक, अभ्यासक्र मातली पुस्तकं नेहमीच खरं बोलतात असं नाही. एकदा एका प्राध्यापकाच्या घरी गेले होते. ते मूळ मराठवाड्यातले. एका मोठ्या अलिशान अपार्टमेण्टमधलं घर. गॅलरीत गेले तर समोर मोठी वस्ती दिसली. सगळी कच्ची घरं आणि झोपड्या. मी विचारलं तर प्राध्यापक म्हणाले, ‘ही सगळी ७२ च्या दुष्काळात मराठवाड्यातून इथं स्थायिक झालेली माणसं. यांच्या कुटुंबातल्या स्त्रिया या कॉलनीतल्या लोकांकडे मोलमजुरी, धुणी-भांडी करतात. मी आतल्या आत स्तब्धच झाले. ते प्राध्यापक, मी विद्यार्थी आणि समोरचे सगळे कष्टकरी. एकाच मातीतून आलेल्या आमचं हे असंच असणं वा नसणं कुणी ठरवलं? म्हणजे नुसतं स्थलांतर सगळं काही देणारं असतं असं नाही. ते कोण करतं, कधी करतं आणि दरम्यानच्या प्रवासात त्याच्या हाती काय असतं या गोष्टीही खूप काही ठरवतात...  मी शहराचा द्वेषही करू लागले एका टप्प्यावर. अनेकदा असंही वाटलं, की स्थलांतर म्हणजे आपल्याला उपलब्ध झालेल्या, आपण जन्मलेल्या बऱ्या-वाईट भवतालापासून पळ काढणं, आपल्या प्रदेशाला कमी लेखत कुठल्या तरी अधिक हव्याश्या, नव्याच प्रदेशाची इच्छा धरणं. त्याचा गिल्टही आला काही काळ. गावांतल्या बिननावाच्या ओबडधोबड रस्त्यांवरून येत थेट एफसी रोडवरच्या फुटपाथवरून चालताना, कडेच्या पिझ्झा हट, सीसीडीमध्ये काचेबाहेरून पाहताना आसपासच्या झगमगाटाशी माझं नातं काय, असं स्वत:लाच विचारत राहायचे. वेगाच्या जंजाळात सिग्नलच्या लाल-हिरव्या-पिवळ्या प्रकाशातले थांबे शोधत राहायचे. चौकात रोमॅण्टिक सोनचाफा विकणारी मळकट बाई, एखादा वारकऱ्याच्या वेशात खांद्यावर पताका घेतलेला कुणी अनोळखी म्हातारा तेवढा ओळखीचा वाटायचा. त्या भावनेचं काय करावं हेही कळेना. मग एकदा रवीश कुमार बोलून गेला ते कानावर पडलं आणि मनावरही गोंदलं गेलं. त्याचं बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातल्या लहानशा गावातून थेट दिल्लीत दाखल होण्याबाबत तो सांगत होता. त्याच्या स्थलांतराबाबत खुलेपणानं बोलत होता की, ‘पलायन तो नये संभावनाओ की तलाश होती है. हर किसी को अपने जीवन में पलायन करना चाहिये, नई संभावनाओ की तलाश में.’ काहीतरी लख्खक्न चमकलं आत. मग मी शोधू लागले, शहरातल्या मला आणि कदाचित माझ्यातल्या शहरालापण.