शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
5
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
6
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
7
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
8
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
9
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
10
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
11
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
13
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
14
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
16
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
17
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
18
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
19
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
20
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

प्रेमापेक्षाही फेस टाईम महत्त्वाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 7:58 AM

प्यार भी और फेसटाइम भी, अशी नवीच कमिटमेन्ट अनेकांनी सांभाळली, कुणाला झेपली, कुणाला नाही. पण गोष्ट प्रेमापेक्षा फेसटाइमचीच जास्त रंगली!

-ईशिता मराठे

 

जेवण करताना भसकन फोन वाजला. ठसकाच लागला मला. पाहते तर मित्रमंडळीचा व्हिडिओ कॉल. लॉकडाऊनमध्ये सतत हेच.

याला फेसटाइम त्याला फेसटाइम.

धड अवतारात नसतानाही कॅमेराकडे टकमक पाहायचे. समोरची व्यक्तीही अर्धवट झोपेत. कोरोना काळात अगदी दूरदूरची माणसे आठवण काढत. बाकी मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांचे ठीक; पण लॉकडाऊनमध्ये खरी पंचाईत झाली तरुणांची. आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडशी रोजरोज गुलगुल करणारी पिढी आता फेसटाइमवर कॉफी डेटला जाऊ लागली.

म्हणजे घराबाहेर जायला तर चान्स नव्हताच; पण मग या फेसटाइम कॉफी डेटचा अर्थ काय?

तर आपल्याच घरात, आपल्याच फोनच्या स्क्रीनसमोर बसून, आपल्याच घरात तयार केलेली कॉफी आवडत्या मगमध्ये घेऊन एकत्र कॉफी प्यायची, पिताना फेसटाइमवर गप्पा मारायच्या. मात्र, विक इंटरनेट कनेक्शन त्यात व्हिलन, त्या विक कनेक्शनमध्ये अडखळतच गप्पा मारायच्या. अजबच फंडे; पण काही पर्यायही नव्हता तेव्हा. अनिश्चित काळ घरातच राहायची सक्तीच होती, मग त्या काळातही आपले प्रेम प्रकरण अनेक मुला-मुलींनी असे कसेबसेे मॅनेज केले.

त्यात काहींचे प्रेमप्रकरण अशा फेसटाइम कॉफी डेट आणि लॉकडाऊनपुरतेच चालले.

काहींनी मात्र त्या काळातला दुरावा सहन करून आपले प्रेमप्रकरण अजूनही उत्तम टिकवून ठेवले. ते टिकवण्यात फेसटाइमचा मोठा वाटा.

ज्यांचे प्रेमप्रकरण टिकले त्यांना विचारले ‘कसं?’

तर ते त्याचे क्रेडिट ते आवर्जून फेसटाइमला देतात. इन्स्टाग्रामला काही पुरेसे क्रेडिट मिळत नाही, ती गोष्ट वेगळी. बऱ्याच प्रेमात पडलेल्या रोमॅन्टिक जिवांना न्यू नॉर्मलशी जुळवून घ्यायला जरा वेळ लागला. भसकन व्हिडिओ कॉल आला की, फोन उचलणे पहिल्यांदाच काही सगळ्यांना जमायचे नाही; पण आता मात्र गबाळ्या अवस्थेतही व्हिडिओ कॉल उचलण्याचा कॉन्फिडन्स आला आहे.

मला तर नटून फोनसमोर बसायचा वैताग आहे. कॉलेजच्या सगळ्या झूम मीटिंगसुद्धा ‘नॅचरली ब्युटीफुल’ चेहऱ्याने मी अटेंड केल्या. शिक्षकांना तर मी अटेंड केल्याचेच कौतुक. आता त्यांना कोण सांगणार आईने बळजबरी बसवलेय; पण दोस्त कंपनीचा व्हिडिओ कॉल आला की, स्वखुशीने तासन्‌तास गप्पा. मग कोणी काय खाल्ले यापासून बॉयफ्रेंडशी कसे भांडून झाले इथपर्यंत चर्चा. उगाच गॉसिपिंग पण करायला दुसरे काही नव्हते. खाणे, गप्पा, झोपा, एवढाच रोजचा कार्यक्रम.

मात्र, इथेही प्रेमात पडलेल्यांची गोष्ट जरा वेगळी. त्याचे खाणे, झोप, विरंगुळा सर्व स्क्रीनसमोर.

या फेसटाइमने काय काय नाही केले त्यांच्यासाठी या काळात...

एकतर आपल्या लव्हरला मिस करण्याची हद्द म्हणजे दोघांनी फेसटाइम सुरू ठेवूनच झोपी जायचे. म्हणजे व्हिडिओ कॉल सुरू ठेवत शक्य तेवढा वेळ गप्पा मारायच्या; पण झोप लागताना ते बंद करायचे नाही, तर चालूच ठेवायचे. सकाळी उठून परत फेसटाइमवर त्याला/तिला पाहत बडबड सुरू.

हे वाचूनही हसू येऊ शकते; पण असे अनेकांनी केले. लॉकडाऊनमधील दुरावा या लव्हर्सला झेपेनासा झाला होता. त्यामुळे ‘दिसत’ राहणे एकमेकांना असा मार्ग त्यांनी शोधला. दुसरीकडे त्यांच्या घरच्यांना वाटायचे की, यांना स्क्रीनचे ॲडिक्शन लागले आहे. फोन सतत कानाला किंवा हातात. त्यात चोवीस तास चार्जिंग सुरूच. नेट स्लो झाले किंवा बॅटरी संपली म्हटल्यावर, तर दु:खाचा डोंगरच कोसळत असे.

तेव्हा ‘डिसकनेक्शन’ही अनेकांना झेपत नसे. मग त्यावरूनही वाद. पुन्हा व्हिडिओ कॉल केल्यावर तो किंवा ती विचारणार, ‘फोन कट करून कोणाशी बोलणं झालं?’

मग त्यावरून वाद, रुठना- मनाना- पुन्हा फेसटाइम कॉफी डेट सुरूच!

प्रेम करायला फेसटाइम आवश्यक झाले, असा हा काळ. प्यार भी और फेसटाइम भी, अशी नवीच कमिटमेन्ट अनेकांनी सांभाळली, कुणाला झेपली, कुणाला नाही; पण गोष्ट प्रेमापेक्षा फेसटाइमचीच जास्त रंगली!

 

(ईशिता बारावीत शिकते.)

ishitamarathe1@gmail.com