इंग्लंडमध्ये असं कधीच घडत नव्हतं.
पण तसं घडलं खरं, चांगल्या श्रीमंत माणसाच्या घरी एकदम गरीबी यावी तशी परिस्थिती ओढावली!
जगभराला मंदीने झपाटले. नोक:या मिळणो कठीण झाले. पगारवाढ थांबल्या. आहे ती नोकरी टिकविणो कठीण झाले. या मंदीने जगणोच बदलून टाकले. पोट भरण्याचे वांधे तिथे चंगळ कशी करणार? तशीही माणसांना वेळ सारं काही शिकायला भाग पाडते, असे म्हणतात. वेळेनं हा शहाणपणा इंग्लंडच्या तरूणाना शिकविला.
या मंदीचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेत तर तो तरुणांना. हे निरीक्षण आहे इन्स्टीटय़ूट ऑफ फिस्कल स्टडीचे संचालक रॉबर्ट जाईस यांचे. जागतिक मंदीमुळे इंग्लडमधील तरुणांची मिळकत दहा टक्क्यांनी घसरली. याचा परिणाम असा झाला की, मद्य सेवन न करणा:या पंचविशीतील तरूणांची संख्या 2005 च्या तुलनेत तीनपट वाढली. याच वयोगटातील तरुणांचे ड्रग्ज सेवनाचे प्रमाण 2004च्या तुलनेत निम्म्याने कमी झाले. नाईट क्लबमध्ये जाणा:यांची संख्या अध्र्यावर आली. अल्पवयीन माता होण्याचे प्रमाण 1969 पासून सर्वात कमी नोंदले गेले. 18 वर्षाखाली तरुणांमधील गुन्हेगारीचे प्रमाण तब्बल 7क् टक्क्यांनी घटले. भाडय़ाच्या घरात राहायचे आणि मिळणारा पैसा मौजमौजा उडवायचा हे तरूणांमधले फॅडही बदलले. पंचविशीतला तरूण भाडय़ाचे घर सोडून स्वत:च्या घरात राहणो पसंत करू लागला आहे. आई-वडिलांसोबत राहणा:या तरूणांचे प्रमाणही वाढले. 2क्क्क् सालच्या तुलनेत ही संख्या सहा लाखांनी वाढल्याचे सरकारी आकडेवारी सांगते.
इंग्लंडमध्ये 2003 ते 2015च्या दरम्यान वय वर्षे 18 ते 21 आणि 22 ते 29 दरम्यानच्या युवकांचे पगार तब्बल 15 टक्क्यांनी कमी झाले. त्याचवेळी विद्याठीठांतील शिक्षणाचे शुल्क मात्र प्रचंड वाढले. अशा स्थितीत हे तरूण मौजमजा काय करणार? तरूणांचे राहणीमान बदलण्यात पालक आणि जनजागृती हे देखील तेवढेच कारणीभूत ठरत आहेत. आपल्या आई-वडिलांची काळजी घेणारा तरुण मोठय़ा संख्येने वाढत असल्याचे केरी रेस्टीन या महिला मानसशास्त्रज्ञाचे म्हणणो आहे.
इंग्लंडमधील अनेक शाळांमध्ये मद्य, धुम्रपान, ड्रग्ज आणि लैंगिक संबंधांवर चर्चासत्रे आयोजित केली जातात. चॅलेंज 21, चॅलेंज 25 अशा उपक्रमांद्वारे अनेक धोके समजावून सांगितले जातात. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक स्थळी धुम्रपानास बंदी असल्याचाही चांगला परिणाम समोर येत आहे. तरूणांच्या सवयी बदलण्यात सरकार काही प्रमाणात यशस्वी होत आहे, असा दावा सॅन डियागो स्टेट युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्रचे प्राध्यापक जीन ट¦ेंग करतात.
एकदा केलेली चूक आयुष्यभर महागात पडू शकते. एका वयानंतर हे कळते. सळसळते रक्त असणा:या तरुणांना ते कसे पटणार? इंग्लंडमध्ये तरूण वयातच हे पटत आहे. इंटरनेट आणि सोशल नेटवर्कमुळे हे घडत आहे. सोशल मीडीयामुळे बदनामी होतेच. नोकरी मिळतानाही ही चूक पाठ सोडत नाही, याची जाणीव या तरूणांना झाली आहे. म्
अर्थात सध्या सर्व युरोपियन देशांमध्ये कमी जास्त प्रमाणात असेच वातावरण आहे. या देशांत नाईटक्लब झपाटय़ाने बंद होत आहेत. 2012 नंतर 15 ते 24 या वयोगटातील धुम्रपानाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे.
आर्थिक तंगी माणसाला काय काय शिकवते, याचंच हे वर्तमानातलं एक रूप!
- गजानन दिवाण