खरं सांगतो,
कुढतो आम्ही.
आतल्या आत स्वत:ला
छळतो आम्ही.
नको नको म्हणताना
स्वत:चा येतो राग,
इतरांना काय बोलणार,
नुस्ताच संताप आरपार.
का होतंय आमचं असं
म्हणून काय विचारता,
अपेक्षांचं ओझं पाठीवर घेता,
धावत राहतो, नुस्तेच चक्रात
अपेक्षा तरी कुणाच्या?
आमच्या घरच्यांच्या?
त्यांना कशाला उगा दोष द्यायचा?
आमचे आम्ही स्वतंत्र आहोत,
कायद्यानं साक्षर आहोत,
वाटलं तर वेगळे राहू,
वाटलं तर प्रेमात पडू,
हवं ते शिकू,
हवं ते बकू
कोण आम्हाला रोखतंय म्हणा,
पण स्वत:च्याच
अपेक्षांचं ओझं पाठीवर
घेऊन धावता धावता
आमचे आम्हीच कुढत राहतो,
इतरांकडे पाहून पाहून
आमचे आम्हालाच छळत राहतो
आम्हीच कसे असे सतत मागे पडणारे,
हिरो मटेरियल नसणारे,
कितीही काहीही करा,
आम्हाला काही अपील नाही,
कुठंही जा,
गर्दीत आम्ही उठून दिसत नाही.
निराश, आतल्या आत उदास
अशा वर्गातला मी एक तरुण आहे,
हरला, नडला, सडला आहे,
स्वत:च्याच वतरुळात
आणि कुढत कुढत म्हणतो आहोत,
आमचाच आम्हाला आहे त्रस.
- अजिंक्य