शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

फेक फॉलोअर्स विकले जातात , विकत  घेतले  जातात , मात्र हे फेक  काम  करणारे असतात  कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 6:10 PM

इन्स्टा, ट्विटर, फेसबुकवर सेलिब्रिटींचे फेक फॉलोअर्स असतात. असे फेक फॉलोअर्स विकणारे काहीजण असतात, ते खरेदी करणारेही असतात. अशा फेक फॉलोअर्सच्या रॅकेटमध्ये सध्या अनेक तरुण मुलं अडकलेले आहेत.

-मनीषा म्हात्रे

गेल्या काही वर्षात जाहिरात क्षेत्रत सोशल मीडियाचं प्राबल्य वाढलं आहे. उत्पादक आपल्या उत्पादनाची जाहिरात जास्तीत जास्त लोकांर्पयत पोहोचविण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र नेहमीच्या जाहिरातींपेक्षा कुणी सेलिब्रिटीने जर त्या उत्पादनाविषयी माहिती दिली तर त्याचा प्रभाव वाढतो असं दिसतं. त्यामुळे ज्या सेलिब्रिटीचे चाहते जास्त त्याचे मूल्यही अधिक. त्यामुळे जाहिरातदार अशा व्यक्तीकडे आकर्षित होऊ लागले. यातच अशा फेक फॉलोअर्सनं डोकं वर काढण्यास सुरुवात केली. सध्याच्या स्पर्धेच्या जगात त्यांची मागणीही वाढली. आणि फेक फॉलोअर्सचं एक भलतंच जग उभं राहिलं.चेक या सायबर सुरक्षेबाबत कार्यरत असलेल्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, या फेक फॉलोअर्समुळे जाहिरात कंपनीना नऊ कोटींचा फटका बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटमध्ये शिक्षित तरुणच जास्त सहभागी आहेत. गुन्हे गुप्तावार्ता विभागाच्या (सीआययू) कारवाईतून हे उघड झालं आहे. सीआययूचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी फॉलोअर्स कार्ट या संकेतस्थळाचा पर्दाफाश केल्यानंतर बनावट चाहते प्रकरणाचा घोटाळा उघडकीस आला.यात सुरुवातीला अविनाश दवडे नावाच्या तरु णाला अटक झाली. कुर्ला परिसरात राहणारा अविनाश पदवीधर. एका पीआर कंपनीत नोकरीला असताना, त्याला फॉलोअर्स कार्ट संकेतस्थळाबाबत माहिती मिळाली. त्यातूनच पीआरची नोकरी सोडून तो यात अडकला. त्याने फॉलोअर्स कार्ट या संकेतस्थळामार्फत हजारो बनावट फॉलोअर विकत घेणा:या 176 जणांसाठी काम केलं. यात मुंबई, अहमदाबादसह देशभरातील चित्रपट आणि मालिका विश्वातील तारे-तारका, फोटोग्राफर, निर्माते, दिग्दर्शकांचा समावेश आहे. या संकेतस्थळाने समाजमाध्यमांवर अस्तित्व असलेल्या, नसलेल्या व्यक्तीच्या नावाचा, फोटोचा वापर करत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर लाखो बनावट खाती तयार केली. या संकेतस्थळाचा सव्र्हर फ्रान्समध्ये आहे.  तर  1क्क् पेक्षा जास्त सोशल मीडिया मार्केटिंग पोर्टल या रॅकेटमध्ये सहभागी आहेत.  बनावट फॉलोअर्स, खोटय़ा ओळखी किंवा बॉट्सद्वारे हे पोर्टल काम करतात. हे रॅकेट भारतीय तसेच परदेशी इंटरनेट नेटवर्क व सव्र्हरद्वारे कार्यरत आहे. अशी 54 संकेतस्थळं वाङो यांच्या पथकाने शोधून काढली आहेत.याच तपासादरम्यान जोगेश्वरीत राहणारा सिव्हिल इंजिनिअरिंग केलेला कशिफ मन्सूर पथकाच्या हाती लागला.त्याने  एवीएमएसएमएम नावाची कंपनी थाटून हा धंदा सुरू केला होता. 

त्याच्या चौकशीत त्याने आतार्पयत 25 हजार जणांना दोन कोटी 30 लाख बनावट फॉलोअरची विक्री केली आहे. यात, सुरुवातीला बनावट अकाउण्टद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करणा:यांना टार्गेट केले. यात, रेटकार्ड दाखवून तो फॉलोअरची विक्री करत होता. ही कलाकार मंडळीही त्याच्या जाळ्यात अडकली. प्रसिद्धीसाठी त्यांनी बनावट फॉलोअरचा आधार घेतला आहे. यात, मन्सूरने कोटय़वधी रुपये कमावले आहेत.

अशी ही फेक फॉलोअर्सची दुनिया. जिला भुलून भलतेच व्यापार इथं सुरू असतात.याच रॅकेटमधील ठगांनी बॉलिवूड पाश्र्वगायिका भूमी त्रिवेदी सोबतच्या बनावट चॅटिंगच्या स्क्रीनशॉटचा वापर करत तिच्या फॉलोअर कलाकार मंडळीची फसवणूक केली. तर ओशिवरा परिसरात राहणा:या अभिनेत्री कोयना मित्र हिच्या फोटो आणि नावाचा वापर करत बनावट इन्स्टाग्राम अकाउण्ट तयार केल्याचे 3 जुलै रोजी तिच्या निदर्शनास आले. त्याचे जवळपास 36 हजार फॉलोअर होते. या अकाउण्टच्या माध्यमांतून कोणी तरी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याने तिने याबाबत मित्रमैत्रिनींनाही अवगत केले. तसेच इन्स्टाग्रामवर अधिकृत अकाउण्टसाठी आधार कार्डसह अन्य कागदपत्रे जमा केले. मात्र इन्स्टाग्रामने कागदपत्रची पडताळणी न करता 9 तासांतच तिचे अकाउण्ट रद्द केले. अखेर तिने 7 जुलै रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार हे प्रकरण पुढील तपासासाठी सीआययूकडे वर्ग करण्यात आले आहेत. तिचे बनावट फॉलोअर्स आणि यू-टय़ूब चॅनल हटविण्यात आले.

हे सगळं चालतं कसं?सध्या भारतात इन्स्टाग्रामवरून सोशल मीडिया मार्केटिंगवर (एसएमएम) अधिक भर आहे. सामाजिक संदेशाआड ब्रॅण्डचा प्रचार करण्यात येत आहे. यातच बॉट्स या सॉफ्टवेअरद्वारे एकाच वेळी हजारो बनावट खाते तयार करून चाहत्यांचा आकडा कृत्रिमरीत्या फुगवून देणारी यंत्रणा कार्यान्वित झाली. सोशल नेटवर्कच्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणोत हे फेरफार करून अशा बनावट प्रोफाइल पोस्ट करतात. यात, चाहते, लाइक्स, कमेंट तसेच चाहत्यांचे वय, स्री, पुरुषा, तरुण, तरुणी याची विभागणीही बोगस असते.  ..

प्रसिद्ध अभिनेत्रीचे 45 टक्के बनावट फॉलोअर्स..इन्स्टिटय़ूट ऑफ कंटेम्परी म्युङिाकने गेल्या वर्षी बनावट फॉलोअर प्रकरणी प्रसिद्ध कलेल्या अहवालात बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये भूमिका बजावणा:या दोन बडय़ा अभिनेत्रीचे 45 टक्क्यांहून अधिक बनावट चाहते असल्याचा दावा केला होता. हा अहवालही सीआययूने चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे गरज पडल्यास त्यांनाही चौकशीसाठी बोलावू शकतो, असे एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले. 

पीआर कंपनी रडारवरबनावट चाहते प्रकरणात चौकशीसाठी बोलावलेल्या 18 पैकी 12 सेलिब्रिटींचे जबाब नोंद करण्यात आले आहेत. त्यांच्या चौकशीत त्यांनी त्यांचे काम पीआर कंपनीना दिले होते. त्यामुळे यात पीआर कंपनीच्या माध्यमांतून याला खतपाणी मिळत असल्याच्या संशयातून संबंधित पीआर कंपनीनाही समन्स बजावून चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहेत.

(मनीषा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत  गुन्हे वार्ताहर आहे.)