- श्रवणी बॅनर्जी
फॅशन कॉलम्सवाले फार टिपीकल सांगतात.
म्हणजे मान्सून आला की तसे कपडे, तशा फॅशन्स. हिवाळा आला की बदला, उन्हाळा आला की बदला तो वॉर्डरोब.
एवढे पैसे प्रत्येक वेळेस आणणार कुठून?
पण मग करायचं काय?
ऋतुमान आणि फॅशन यांचा मेळ घालून ट्रेण्डी तर राहायलाच हवे.
या पावसाळ्यात ट्रेण्डी राहण्याचा एक एकदम सिम्पल फॉम्यरुला.
- नेलपेण्ट!
तुम्हाला नेलपेण्ट आवडत असेल तर या पावसाळ्यात तुम्ही सगळ्यात ट्रेण्डी दिसू शकता, सगळ्यात जास्त फॅशनेबलही ठरू शकता.
नेहमीचेच कपडे, नेहमीचाच अवतार, मात्र एका नेलपेण्टने तुमचा मूड सहज बदलू शकतो.
त्यासाठीच या काही एकदम सोप्या साध्या गोष्टी.
1) ग्लिटर ही सध्या सगळ्यात भन्नाट गोष्ट. चमकिल्या चमकीवाल्या नेलपेण्ट. आपल्याला हव्या त्या ग्लिटरच्या रंगाची नेलपेण्ट बिंधास्त लावा. त्यातही गोल्डन, सिल्व्हर, ब्लॅक, निळा आणि जांभळा या रंगाचे ग्लिटर एकदम हटके दिसतात.
2) एका बोटाच्या नखाला ग्लिटर एका नखाला ब्राईट पेस्टल कलर्स लावले तरी भन्नाट दिसतं.
3) पिवळा, केशरी, निळा यासारखे वॉर्म पेस्टल कलर्स तर तुम्ही कधीही लावा.
4) एक पिवळा, एक हिरवा असा मान्सूनवाला मूड सांभाळत तुम्ही वेगवेगळ्या रंगांचं शेडिंगही करू शकता.
5) सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आवडतील त्या रंगाच्या नेलपेण्ट लावा. या मौसमात तुमचा मूड सुधारण्याचं काम त्या हमखास करतील!