- निकीता बॅनर्जी
दिवाळी आता पंधरा दिवसांवर येऊन ठेपली. दिवाळी शॉपिंग हा आता सगळ्यात महत्त्वाचा आणि अवघड विषय आता अजेंडय़ावर असेल.तर या दिवाळीत ट्रेण्डी, फेस्टिव्ह आणि तरीही पारंपरिक देखणं दिसेल असं घ्यायचं काय, असा प्रश्न मुख्यतर् मुलींसमोर असतो. मुलांना पर्यायही तसे कमीच असतात.पण मुलींच्या फॅशनच्या जगात सध्या फ्यूजनचं राज्य आहे. त्यामुळे पारंपरिक आणि आधुनिक यांचा मेळ घालणारं काही या सणावाराच्या दिवसांत तुम्ही घेऊच शकता.
1. शरारा कुर्तायाची सध्या जोरदार फॅशन आहे. शरारा आणि त्यावर लॉग कुर्ता. त्यावर विविध प्रकारची एम्ब्रॉयडरी. लांब दुपट्टा हे सध्या हीट कॉम्बिनेशन आहे.
2. रफल लहेंगारफल म्हणजे झालरी झालरीचा लेहंगा. या प्रकारच्या लहेंग्याचीही सध्या जोरदार चलती आहे. अंगकाठी कशीही असो, तो दिसतोही उत्तम. आणि त्याला पारंपरिक लूकही असल्यानेही या दिवाळीत हा रफल लहेंगा हिट आहे.
3. जॅकेट ब्लाउजसाडी तुम्ही पारंपरिक नेसा नाही तर आधुनिक डिझायनर. साडी हा कायम फॅशनच्या जगात इन मामला असतो. मात्र टिपिकल जुन्या पद्धतीचे ब्लाउज मात्र आता घालू नका. सध्या लॉँग जॅकेट व न साइडेड जॅकेट अशा ब्लाउजची फॅशन आहे. त्यापैकी काही रात्रीच्या कार्यक्रमासाठी नक्की वापरता येईल.
4. धोती पॅन्ट-लॉँग कुर्ताहा ट्रेण्ड म्हटलं तर जुना आहे; पण यंदा पुन्हा चर्चेत आहे. वर्कवाला लॉँग कुर्ता आणि प्लेन धोती पॅन्ट हा एक उत्तम फ्युजन मामला आहे.
5. स्मोकी आइजकपडय़ांबरोबरच एक सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आय मेकअप. या दिवाळीत फार मेकअप न करता केवळ स्मोकी आइज मेकअप केला तरी तुमचा लूक बदलू शकतो.