- योगेश बिडवई
...तसा चहाशी संबंधित कोणत्याच व्यवसायाचा आणि माझा काहीच संबंध नव्हता. चहा पिण्यापुरताच मर्यादित हा विषय. बीएस्सी (आयटी) झालो. नोकरीला लागलो. बर्याच बडय़ाबडय़ा आयटी कंपन्यांत नोकरी केली. घरात सामाजिक कामाचं वातावरण असल्यानं मी नोकरी करून एमएसडब्ल्यूही केलं. त्या अभ्यासाचा भाग म्हणून चहा विक्रेते (टी व्हेण्डर) हा विषय घेऊन एक प्रोजेक्ट केला. चहा विक्रेते असंघटित क्षेत्नात काम करतात, त्या प्रोजेक्टच्या निमित्तानं त्यांचं जग जवळून पाहिलं. त्यातून मग पुढं जाऊन चहा विक्रेत्यांची ‘टी कॉफी असोसिएशन’ सुरू केली. मुंबईत चहा विक्रेत्यांची नोंदणी सुरू केली. माझं मूळ गाव बुलडाणा. तिथंही चहा विक्रेत्यांची नोंदणी केली. नोकरी सोडून स्वतर्चं काहीतरी करावं असं मनात होतंच. आपला व्यवसाय पण समाजाच्या विकासालाही त्यातून काही हातभार लावता आला तर बरं असंही डोक्यात सारखं यायचं. त्यातून मग असा सोशल आंत्रप्रेनर अर्थात सामाजिक उद्योजकतेचा विचार आला. टी कॉफी असोसिएशनमुळे चहा उद्योगाची माहिती झाली होतीच. आसामलाही बर्याच वेळा जाणं झालं. त्यातूनच वर्षभरापूर्वी डब्ल्यूएनके इंडस्ट्रिज सुरू केली. मेट्रो टी हा स्टार्टअप उद्योग सुरू केला. मुंबई सोडून पुन्हा गावी बुलडाण्याला गेलो..’प्रमोद वाकोडे सांगत असतो. जेमतेम पस्तीशी पार तरुण उद्योजक. त्यांच्या घराण्यात तशी उद्योगाची परंपरा असण्याचंही काही कारण नाही. मात्र पहिल्याच उद्योग पिढीत वाकोडे ही पायवाट हमरस्ता करायला निघाले आहेत. दलित समाजातील वाकोडे कुटुंबातील ते पहिलेच उद्योजक. संघर्ष तर होताच; पण यशाची चव काही न्यारीच असते, हे त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होतं.प्रमोद आणि त्यांच्यासह काही तरुण उद्योजक भेटले मुंबईतील वल्र्ड ट्रेड सेंटरमध्ये. डिसेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात मुंबईत एससी-एसटी उद्योजक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेत प्रमोदसारखे महाराष्ट्रातील सुमारे 150 तरुण आणि विशेष म्हणजे दलित आणि आदिवासी उद्योजक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे हे सगळे पहिल्या पिढीतले तरुण उद्योजक. ज्यांच्या घरात उद्योग-व्यवसायाची कुठलीच परंपरा नाही. जे रुढार्थानं शहरात राहात नाहीत, ज्यांना व्यवसाय संधी चटकन डोळ्यासमोर येत नाहीत. आणि मुख्य म्हणजे शिकून नोकरी बघ सुखाची असं वाटणार्या मानसिकतेत वाढलेले हे तरुण. त्यांना वाटलं, आपण उद्योजक व्हावं, आपण व्यवसाय करावा, संपत्तीनिर्मिती करावी, इतरांना आपल्यासोबत घेत पुढं जावं हे सारंच किती नवं आणि महत्त्वाचं आहे. त्या तरुण उद्योजकांना भेटताना हे वारंवार लक्षात येतं की उद्योजक म्हणूनच नाही तर व्यक्ती म्हणूनही प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. वाट अवघड, चढणीची आहे. मात्र हिंमत, तिला तोड नाही.त्या जिगरबाज वाटेवरचे हे प्रवासी. त्यातलाच एक प्रमोद. आता तर देशात नाही तर परदेशातही तो अनेक टी कॉफी एक्स्पोमध्ये सहभागी झाला आहे. आसाममधून चहाची पानं आणून बुलडाण्यात त्याचं पॅकिंग होतं, त्यांच्याकडे 25 लोक काम करतात. अजून एक उद्योजक ग्रुप इथं भेटला. मराठवाडय़ातील जालन्याचा. 34 महिला व्यावसायिकांचा हा गट आहे. शासनाच्या क्लस्टर योजनेचा त्यांनी लाभ घेतला आहे. तिथं भेटल्या वंदना दाभाडे. त्या सांगतात, ‘आम्ही ‘सासर’ हा मसाल्याचा ब्रॅण्ड विकसित केलाय. सोबत वंदनाचे पती संतोष दाभाडे होते. त्यांनी उद्योजकता विकास कार्यक्र मांतर्गत एक महिन्याचं प्रशिक्षण घेऊन मसालेनिर्मितीचा उद्योग सुरू केला. पाच हजारांपासून सुरुवात केली. आता शासनाने त्यांच्या क्लस्टरसाठी एमआयडीसीत जागाही दिली आहे. आता ते 20 प्रकारच्या मसाल्याची निर्मिती करतात. सम्यक स्पायसेस क्लस्टर असोसिएशन परिषदेत सहभागी झाले आहेत.कॉम्प्युटर इंजिनिअर असलेला 36 वर्षीय मंगेश वानखडे. त्यानं पुण्यात स्मार्ट पार्किग ही कंपनी सुरू केली आहे. त्यांचा सध्या केरळमध्ये प्रकल्प सुरू आहे. 2400 चौरस फूट परिसरात बहुमजली कार पार्किगची संकल्पना विकसित केली आहे. डिझाइनचं पेटण्ट घेतलं आहे. मूळचा अमरावतीचा असलेला मंगेश, तो त्याच्या कुटुंबातला पहिलाच पदवीधर अन् त्यातही पहिला इंजिनिअर. जालन्याच्याच पूजा रोटोमेक या कंपनीचे संचालक रत्नाकर पांडू पाडळे. तरुण वयातच ते शहरात कामासाठी आले. कारखान्यात छोटी-मोठी कामं केली आणि त्यातून तांत्रिक कौशल्य विकसित करून जालना एमआयडीसीत डाय मेकिंगचा (स्टिलपासून साचे बनविणे) कारखाना सुरू केला. 7 देशांत त्यांची उत्पादनं निर्यात होतात. इटलीच्या एका कंपनीबरोबर त्यांनी तांत्रिक करार केला आहे.जोतिबा-शाहू-बाबासाहेब या सामाजिक क्रांतिकारकांच्या नावाने मंठा (जालना) इथं चप्पल व बूट बनविणार्या 101 व्यावसायिकांनी संघटित होऊन जोशाबा क्लस्टर बनविलं आहे. त्यातून 300 जणांना प्रत्यक्ष व 700 जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. राज्य सरकारच्या उद्योग विभागाने या क्लस्टरला 4.75क ोटींचे अर्थसाहाय्य दिलं आहे. आम्ही स्वतर् 1.25 कोटी भांडवल उभारलं असं जोशाबा क्लस्टरचे अध्यक्ष कैलास कांबळे सांगतात.औरंगाबादच्या दुष्यंत आठवले यांनी खूप वर्षे नोकरी केली. मग शेती विकून वैशाली लेझर कटिंग हा उद्योग सुरू केला. त्यांच्या उद्योगाची उलाढाल 2 कोटींवर पोहोचली आहे. मराठवाडय़ातल्या याच तरुण उद्योजकांत भेटला मुंबईत धारावीत उद्योग करणारा एक तरुण. संतोष कांबळे. तो सांगतो, ‘मुंबईत धारावीमध्ये मी 2009 मध्ये बॅग निर्मितीचा बिझक्र ाफ्ट उद्योग सुरू केला. मी बनवलेल्या स्कूल बॅग, लॅपटॉप बॅग, सॅक मोठमोठय़ा कंपन्या त्यांचा टॅग लावून विकतात. 300 कामगार माझ्याकडे काम करतात.’ संतोष अस्खलीत इंग्रजीत बोलतो. तो आत्मविश्वासानं सांगतो की, लवकरच माझा स्वतर्चा बॅगचा ब्रॅण्ड असेल. कोणतीही शासकीय मदत न घेता त्यांनी उद्योग विस्तार केला आहे. या परिषदेत असे अनेक तरुण उद्योजक भेटले. गप्पा मारताना, त्यांचा संघर्ष समजून घेताना कळते त्यांची जिद्द आणि उद्योग-व्यवसाय करण्याची कळकळ. तिथून निघताना वाटत राहातं की, पहिल्या पिढीत उद्योगाची पायाभरणी करणारे हे तरुण दोस्त, ते तक्रारीचे पाढे वाचत नाहीत तर पुढं जाण्याचे तोडगे सांगतात. उद्यमशील होण्याची प्रेरणा बनून राहातात.
*****
देशातील पहिलं एससी क्लस्टर
35 उद्योजकांनी एकत्न येऊन चाकण (पुणे) येथे मैत्नेय हे एससी क्लस्टर तयार केलं आहे. मूळचे नगर जिल्ह्यातील (धामोरी, कोपरगाव) असलेले विनोद अहिरे (अध्यक्ष), सोलापूरचे महेश वाघमारे (चिटणीस) व उस्मानाबादचे गोकूळ गायकवाड (संचालक) या तरुण उद्योजकांनी त्यासाठी पुढाकार घेतला. क्लस्टरच्या माध्यमातून त्यांना उत्पादनासाठी बाजारपेठ शोधणे सोपे झाले आहे. केंद्र सरकारने या क्लस्टरला 15 कोटींची मदत देऊ केली आहे. 50 स्टार्टअप उद्योजक तयार करणे व 100 तरुणांना प्रशिक्षण देण्याची अट त्यांना सरकारने घातली आहे.
रोजगार देणार्यांच्या सरकार पाठीशी
या परिषदेत उद्योजकांना नव्या बाजारपेठेशी संबंधित मार्गदर्शन करण्यात आलं. राज्य व केंद्र सरकारने मागासवर्गीय समाजासाठी उद्योग विकास कार्यक्र मांतर्गत विविध प्रोत्साहनपर योजना आणल्या आहेत. सरकारच्या खरेदी धोरणामध्ये या उद्योजकांच्या वस्तू घेण्याची अंमलबजावणी सुरू आहे. रोजगारनिर्मिती करणार्या उद्योगांना सक्षम करण्याचं काम शासन करत राहीन!- सुभाष देसाईउद्योगमंत्री