शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

बहुरंगी जगण्याच्या संघर्षाचा झेंडा

By admin | Published: April 04, 2017 3:27 PM

समलैंगिक व्यक्तींना जगण्याचे अधिकार मिळावेतम्हणून उभारलेल्या एका अष्टरंगी झेंड्याचा जिद्दी प्रणेता, गिल्बर्ट बेकर

मुंबई: समलैंगिकांच्या हक्कांसाठी चालू असलेल्या जागतिक चळवळीचे प्रतीक म्हणून वापरल्या जाणाऱ्या अष्टरंगी ध्वजाचे निर्माते गिल्बर्ट बेकर यांचं निधन नुकतंच निधन झालं. बेकर यांनी न्यू यॉर्कमध्ये वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी समलैगिंक व्यक्तींच्या अधिकारासाठी जी चळवळ उभारली त्याचं मोल मोठं आहे.बेकर यांनी १९७८ साली सॅन फ्रॅन्सिस्को येथे झालेल्या समलैंगिक हक्क मोर्चासाठी त्यांनी एक झेंडा तयार केला होता.गिल्बर्ट यांचा जन्म २ जून १९५१ साली अमेरिकेत झाला. त्यांचे वडील न्यायाधीश होते तर आई शिक्षिका होती. मी समलैंगिक आहे असे गिल्बर्ट यांनी मातापित्यांना सांगितल्यावर त्या दोघांनी कित्येक वर्षे त्यांच्याशी बोलणे टाकले होते. व्हीएटनाम युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना सॅन फ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयामध्ये आणल्यावर त्यांची शुश्रुषा करण्याचे काम बेकर यांनी केले. लष्कराच्या वैद्यक विभागात नोकरी केल्यानंतर बेकर सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये १९७२ साली स्थायिक झाले होते. त्यानंतर त्यांनी समलैंगिकांच्या हक्कासाठी चाललेल्या चळवळीमध्ये सहभाग घेणे सुरु केले. तेथे राहायला लागल्यावर त्यांनी एक शिलाई मशिन विकत घेतले होते. शिलाईचे काम आवडू लागल्यामुळे त्यांनी समलैंगिकांच्या मोर्चांसाठी लागणारे फलक शिवून देणे सुरु केले आणि यातूनच या झेंड्याच्या संकल्पनेचा उगम झाला. याच कालावधीमध्ये सॅन फ्रॅन्सिस्कोच्या बोर्ड आॅफ सुपरवायजर्समध्ये सदस्य असणाऱ्या समलैंगिकांच्या हक्कांसाठी प्रयत्न करणाऱ्या हार्वे मिल्क यांच्याशी त्यांची ओळख झाली. हार्वे मिल्क हे स्वत:ची समलैंगिक असण्याची ओळख उघड करणारे निवडून आलेले पहिले राजकीय नेते होते. मिल्क यांनी समलैंगिक हक्क चळवळीसाठी काही प्रतिकाची निर्मिती गरज असल्याचे बेकर यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी गुलाबी, लाल, नारिंगी, पिवळा, हिरवा, आकाशी, निळा, जांभळा अशा रंगांचा वापर करुन हा झेंडा तयार केला. एका मुलाखतीमध्ये या ध्वजाबाबत बोलताना ते म्हणाले होते, हा बहुरंगी ध्वज विविधतेचे आणि शक्तीचे प्रतीक आहे. वंश, लिंग, वय असा कोणताही भेदभाव यामध्ये केला जात नाही असा त्याचा अर्थ आहे.झेंडा तयार करण्याासठी त्यांनी ३० स्वयंसेवकांसह तयारी सुरु केली. मलमली कापड आणून कॅनमध्ये भिजवायला घातले. त्यामध्ये डाय करुन कपड्यांना रंगवण्यात आले. हा झेंडा ३० फुट रुंद आणि ६० फुट लांब होता. सर्वांनी या झेंड्याचा जोरदार पसंती देऊन तो स्वीकारला होता. अमेरिकेपाठोपाठ जगामध्ये सर्वच देशांमध्ये समलैंगिक हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते या झेंड्याला स्वीकारू लागले. समलैंगिक चळवळ आणि हा झेंडा हे समिकरण इतके घट्ट झाले की हा झेंडा म्हणजेच चळवळ अशी एकरुपता निर्माण झाली. व्हाईट हाऊस, नायग्रा धबधब्यावरही या बहुरंगी दिव्यांच्या झोतांनी रोशणाई करण्यात आली होती.