भक्ती सोमण
फ्रेंच फ्राइज. हा शब्द आणि पदार्थ काही आपल्याकडे आता नवीन राहिलेला नाही. बटाट्याचं प्रेम असलेल्या कुणालाही हे फ्रेंच फ्राइज फार प्यारे. आणि आता तर तरुण जगात या फ्राइजमध्ये अनेक फ्लेवर्स आले आहेत. फ्राइज देणाºया विविध कंपन्यांनी अक्षरशा: तरुणांना टार्गेट करत या फ्राइजचा नूर बदलून टाकला आहे. बटाट्याचेच फ्राइज, पण ते देताना त्यात विविध फ्लेवर्सची भर घातल्यानं तरुणाईत सध्या ते हिट आहेत. कॉलेजच्या बाहेर जनरली वडापाव, डोसा, बर्गर, पिझ्झाच्या गाड्यांवर गर्र्दी पहायला मिळते. हीच गर्दी कॅच करण्याचा प्रयत्न हे फ्राइज करत आहेत.असतं काय या फ्राइजमध्ये इतकं? हा प्रश्न साहजिकच पडला असेल, तररेड मसाल्यात फ्राय केलेल्या फ्रेंच फ्राइजवर हल्ली चिली गार्लिक सॉस किंवा कुठलाही आवडीचा सॉस तर असतोच. त्याचबरोबरीने चीजही घातलेलं असतं. त्या चिजमध्ये डीप करून हे फ्राइज खाण्याचा तरुण ट्रेण्ड दांडगा आहे. मॅक्सिकन सॉस, बार्बेक्यू सॉस, चिली गार्लिक, चिली चीज, मेयो, सालसा, पिझ्झा सॉस अशा फ्लेवर्समध्ये तरुणांच्या जगात या फ्राइजची चलती आहे. मोठ्या कागदी कपात भरून येणारा हा प्रकार ९० रुपयांपासून १४० रुपयांचा खड्डा खिशाला पाडतो. पण एकावेळी भरपूर खाता येणारा हा प्रकार म्हणूनच तरुणाईत सध्या फेमस आहे.तरुण मुलांना नेहमीच वेगळं काहीतरी खायला हवं असतं. फ्रेंच फ्राइज हे पटकन खाता येतात. उभ्या उभ्या कुठंही खाता येऊ शकतात. म्हणून फ्रेंच फ्राइज आवडीनं खाल्ले जातात. साइड डिश किंवा स्टाटर म्हणून फ्राइज खाण्याऐवजी आता मेनडिश म्हणून हा प्रकार आता खाल्ला जातो आहे, असं सुप्रसिद्ध शेफ अभिषेक पुरोहित सांगतो.हॉटेलात चमचमीत मिळत असले तरी आता घरीही फ्रेंच फ्राइज केले जातात. घरी असलेले सॉस आणि मेल्ट चीज घातलं की होतं ते एकदम बाहेरसारखंच! सोबत आपले जिवाभावाचे दोस्त हवेत फक्त, मग त्याची लज्जत वाढते...
स्पायरल फ्रेंच फ्राईजया फ्राईजमध्ये सध्या स्पायरल फ्रेंच प्राईजची क्रेझ जास्त बघायला मिळते आहे. दोन काठ्यांमध्ये स्पायरल केलेले बटाट्याचे चीप्स असतात. एका मोठ्या काठीत स्पायरल केलेल्या या चीप्सचा आकार फार मस्त दिसतो. हे चिप्स हातात ती काठी धरून सहज खाता येतात.
(भक्ती लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)