नेहा
इयत्ता बारावी, जालंदर, पंजाब
रसायनशास्त्र हा नेहाच्या आवडीचा विषय. तिला केमिकल इंजिनिअरच व्हायचंय. तिचे वडील इलेक्ट्रीशियन आहेत आणि आई गृहिणी. घरी दोन धाकटे भाऊ. मध्यंतरी चर्चा होती, फळं कृत्रिमरीत्या पिकवले जात असल्याची, त्यामुळे होणा:या अपायांची. नेहाच्या मनात विचार आला की, आपण शाळेत जशी लिटमस टेस्ट करतो तशी फळांची नाही का करता येणार? फळं तपासून पाहायची, ही नैसर्गिकरीत्या पिकवली आहेत की रसायनं वापरून? मग तिनं रसायनं वापरून लिटमस पेपरसारखा एक पेपर तयार केला. तो लिटमस पेपरसारखाच दिसतो. तो पेपर फळांवर धरला की त्या फळात नैसर्गिक साखर किती आणि कृत्रिम साखर किती हे कळू शकतं. बाजारात गेलं की फळांवर तो लिटमस कागद ठेवून पाहायचा. फळं नैसर्गिकदृष्टय़ा पिकवलेली असतील तर ती घ्यायची, नसतील तर नाही घ्यायची, इतकं सोपं गणित.
नेहा म्हणते, ‘मला रसायनशास्त्रत काम करायचंय, पण तेही देशातच राहून. इथं माङया कामाची खरी गरज आहे.’