हटून बसलेल्या सळसळत्या जगाची खबर
एफटीआयआय.
म्हणजेच फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया.
गेले काही दिवस देशभर हे नाव गाजतं आहे.
(मुलांच्या म्हणण्याप्रमाणो) सुमार वकुबाची व्यक्ती
संस्थेच्या संचालकपदी लादून सरकारने
संस्थेच्या ‘भगवीकरणा’चा घाट घातलाय.
मुक्त अभिव्यक्तीला अशा ठराविक (विचारांच्या) साच्यात
कोंडण्याच्या दडपशाहीविरोधात
तिथं शिकणारी मुलं आंदोलनाला भिडली आहेत.
त्यावर देशभरात वाद, टीव्हीवर प्राइमटाइम चर्चा सुरू आहेत.
ही मुलं वेगळी आहेत, त्यांच्या जाणिवा टोकदार आहेत
आणि त्यांचं जगही!!
मुक्त? स्वत:च्या शोधात गुंतलेलं?
की टीकाकार म्हणतात तसं
बेफिकीर आणि बेदरकार.?
या प्रश्नांच्या शोधात कॅम्पसमधल्या
‘विजडम ट्री’च्या कट्ट्यावर मारलेल्या गप्पांचा
एक लाईव्ह रिपोर्ट आणि एरव्ही आपल्याला न भेटणा:या
कॅम्पसमधून एक खास चक्कर..
- ऑक्सिजन टीम