ऑक्टोबर हीट सुरु झाली. ऊन तापायला लागलं आता.या काळात केस आणि त्वचा यांचे प्रॉब्लम्स हमखास वाढतात.
सनबर्न, ड्रायनेस, केसांचा कोरडेपणा, आणि रखरखीत त्वचा असे त्रास अनेकांना होतात.
आणि मग नेहमीचा प्रश्न डोकं वर काढतो, या कोरड्या केसांचं आणि रखरखीत केसांचं करायचं काय? ट्राय धीस.
१) आळशीपणा सोडाच. सीटीएम प्रोसेसला काही पर्यायच नाही. सीटीएम म्हणजेच. क्लिझिंग, टोनिंग आणि मॉयश्चरायझिंग. हे तीन याच क्रमानं केलं तर त्वचेचा रखरखाट कमी होऊ शकतो.
२) सनबर्नचा त्रासही होतो. त्यासाठी एखादं चांगलं जेल बेस्ड सनस्क्रीन लोशन वापरा, पण असं लोशन ऑयली त्वचा असणार्यांनीच वापरावं. ज्यांची त्वचा कोरडी असेल त्यांनी क्रीम बेस्ड लोशन वापरणं उत्तम.
३) त्वचा कोरडी होते म्हणून एखादं चांगलं कोरफड जेल, लोशन दिवसाही वापरणं चांगलंच.
४) याच दिवसात केस जास्त तुटतात. कोरडे होतात. पिंजारतातच. ज्यांचे केस छोटे असतील त्यांनी एखादा मस्त शॉर्ट फंकी हेअरकट करा. केस कापायचे नसतील तर केस थोडे ट्रीम करून घ्या.म्हणजे त्यांना उंदरी लागणार नाही.
५) केस गरम पाण्यानं न धुता गार पाण्यानंच धुवा आणि जमल्यास डोकंही थंड ठेवा !
६) केस धुतल्यावर जेल मास्क कंडीशनर लावा म्हणजे तुमच्या केसांना थोडं मॉयश्चरायझर मिळेल.
७) कोण म्हणतं या काळात मेकप करू नये. हॅव फन विथ मेकप. लिपस्टिकऐवजी शिमर लीपग्लॉस वापरा.
- धनश्री संखे ब्यूटी एक्सपर्ट