शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

फ्युचर JOBS, काही भन्नाट पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 8:23 AM

आकाशात उडणाऱ्या ड्रोनची ट्रॅफिक कुणी कण्ट्रोल करेल, कुणी रोबोटला ट्रेन करेल, कुणी माणसांचंच नाही तर रोबोटचंही कौन्सिलिंग करेल आणि कुणी तर डेटा डॉक्टर होईल आणि कुणी कुणी डिजिटल करन्सी मोजत त्यातला तज्ज्ञ होईल.. ही सारी कामं आज अस्तित्वात नसली तरी भविष्यात असतील! २०४० मध्ये सर्वाधिक मागणी असलेले हे जॉब्ज असतील. आणि त्याची मुळं आज बदलत्या तंत्रज्ञानात आणि आर्थिक चक्रात आहेत असं थेट आॅक्सफर्ड विद्यापीठाचाच अभ्यास सांगतोय.

- मयूर देवकर

कल किसने देखा है? हा प्रश्नच येत्या काही वर्षांमध्ये बाद होणार असे दिसतेय. भविष्यात काय होणार याचा ‘प्रीव्ह्यू’ पाहण्याचं तंत्रही लवकरच विकसित होईल यात काही शंका नाही.माहिती तंत्रज्ञान व विज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात आज जे आहे ते उद्या बाद ठरतेय. काळाच्या पडद्यापुढे जरा डोकावून पाहिल्यावर जाणवते की, आज जे जग आपण पाहतोय ते पुढच्या दहाच वर्षांत प्राचीन होणार असे दिसतेय.रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (एआय) ‘ऑटोमेशन’ प्रक्रिया जोरात सुरू आहे. सगळं स्वयंचलित होण्याच्या मार्गावर आहे. उत्पादकता आणि गुणवत्तेच्या दृष्टीने जरी हे चांगले असले, तरी भविष्यात रोबोट माणसांचा रोजगार हिसकावून घेतील, अशी चर्चाही आताच जोर धरू लागली आहे.

गुगल-उबरसारख्या कंपन्या स्वयंचलित कार तयार करण्याच्या मागे लागल्या आहेत. तिकडे अमेरिकेत चालकरहित ट्रक्समधून मालवाहतूक सुरू होतेय. त्यामुळे लाखो चालकांच्या रोजगारावर गदा येणार आहे. कारखान्यांमध्ये तर स्वयंचलित यंत्रांमुळे कित्येक कामे सोपी आणि जलद झाली. त्यामुळे एकसाची काम करणाऱ्या माणसांवर येत्या काळात बेरोजगारीची कुऱ्हाड येण्याचा धोका आहेच. आताच अगदी अकाउण्टची कामंही सॉफ्टवेअर करू लागल्यानं माणसांचे रोजगार जाऊ लागले आहेत. हेच ऑटोमेशन रिटेल इण्डस्ट्रीतही येत आहे. एवढेच नाही तर मशीन लर्निंग आणि एआय तंत्रज्ञानामुळे वकील व डॉक्टरांनादेखील स्पर्धक निर्माण झाला आहे. ऑटोमेशनने फूड इंडस्ट्री, निर्मिती प्रक्रिया (मॅन्युफॅक्चरिंग), रिटेल अशा विविध क्षेत्रांमध्ये अनेक रोजगार हिरावून घेतले आहेत. यासह हळूहळू सर्वच क्षेत्रांमध्ये याचा प्रादुर्भाव जाणवणार आहे.मग याचा अर्थ पुढच्या २५ वर्षांच्या काळात आज अस्तित्वात असलेली बहुतांश कामं यंत्रच करायला लागतील. पण मग त्याकाळी माणसांच्या हाताला काम असेल का?

- या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे बदलणारं तंत्रज्ञानच भविष्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करेल. आज जे बदल तंत्रज्ञानामुळे दिसत आहेत, त्यातून उद्या नवे सेवा आणि उद्योग क्षेत्रातले पर्याय तयार होतील.हे पर्याय कोणते असतील याविषयी सध्या जगभरातील तज्ज्ञ विचार करताहेत, संकल्पना मांडताहेत, भविष्याचा अंदाज घेत आहेत. आज जे तांत्रिक बदल किंवा त्यांची सुरुवात आपण अनुभवतो आहोत येत्या वीस वर्षांत ते बदल मोठे उद्योगव्यवसाय म्हणून आकार घेतलेले असतील. आणि मग त्यातून काही नवे रोजगार अनेकांना मिळतील.ते काय असतील?

याचाच एक अंदाज आणि अभ्यास ‘इन्स्टिट्यूट फॉर द फ्युचर’ (आयएफटीएफ) या संस्थेने केला आहे. त्या अभ्यासानुसार २०३० साली उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांपैकी ८५ टक्के नोकऱ्या अद्याप निर्माणच झालेल्या नाहीत. म्हणजे पुढच्या काही वर्षांत किती झपाट्याने जग बदलणार याचा अंदाज येतोय. आज जन्मलेली मुलं जेव्हा २०४० मध्ये नोकरी मिळविण्यासाठी सज्ज झालेली असतील तेव्हा ते नाकासमोरच्या नोकऱ्यांसाठी प्रयत्न करताना दिसणार नाहीत. त्यांची उद्योगव्यवसायाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असेलच; पण त्यांच्यासाठी उपलब्ध असणारे पर्यायही वेगळे असतील.ते काय असतील याचा एक अंदाज फक्त हा अभ्यास मांडतो.

त्या रोजगारांची ही यादी पाहिली तर एक लक्षात येईल की यातल्या बहुसंख्य गोष्टी आजही आपल्या अवतीभोवती आहेत. त्यात आजही स्कोप आहे. फक्त या नव्या संधींसाठीची कौशल्यं आपल्याकडे आहेत का, हा प्रश्न आहे.त्याचं उत्तर ‘हो’ असेल तर भविष्यातले हे हॉट जॉब्ज आजही आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

१. व्हर्च्युअल स्टोअर मॅनेजरऑनलाइन शॉपिंगचं वाढतं प्रमाण जगभर आहे. येत्या काळात ते वाढेल हे उघड आहे. परंतु, कॉम्प्युटर किंवा मोबाइल स्क्रीनवर फोटो पाहून वस्तू विकत घेतानाही ग्राहकांना ‘ह्युमन कनेक्शन’ची ओढ असते. त्यामुळे सगळ्या वस्तू एका क्लिकसरशी जरी उपलब्ध असल्या, तरी आपल्याला त्या वस्तूबद्दल सांगणारी कुणी व्यक्ती असेल, योग्य सल्ला मिळाला तर चांगलं असं लोकांना वाटतंच. गुगलने केलेल्या सर्वेक्षणातही ही सल्ला, एक्सपर्टची मदत यांची गरज नोंदवण्यात आली आहे. वस्तूंचा रंग, स्पर्श, गंध याविषयी ग्राहक उत्सुक असतात. याच ग्राहकांना खरेदी करण्यात मदत करण्यासाठी भविष्यात ‘व्हर्च्युअल स्टोअर मॅनेजर्स’ असं नवीन काम निर्माण होणार आहे. ही नोकरी म्हणजे तुमच्या-आमच्या घराजवळील दुकानातील मॅनेजरसारखीच असेल. फक्त तो ऑनलाइन शॉपिंग ग्राहकांना खरेदीचा सुखद अनुभव मिळवून देण्यासाठी डिजिटल स्टोअरमध्ये मदत करेल. तो असेल आॅनलाइन पण सल्लामसलतीचं काम मात्र पर्सनल टच देत करेल.

२. रोबोट काउन्सिलररोबोटमुळे जरी अनेक रोजगार जाणार असले तरी काही नवीन संधीही उपलब्ध होतील. रोबोटमुळे कामगारांची क्षमता वाढते आहे. यंत्र आणि मानव एकत्र काम करताना अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोबोटला हाताळणाºया आधुनिक तंत्रज्ञानाने कौशल्यपूर्ण अशा मनुष्यबळाची कायम निकडही वाढेल. सध्या रोबोट दुरुस्ती करण्याचं काम आहेच. भविष्यात सहकारी म्हणून रोबोटसोबत काम करताना कर्मचाºयांना योग्य ते मार्गदर्शन देणाºया सल्लागारांची मोठी मागणी निर्माण होईल, असं तज्ज्ञांना वाटतं. रोबोट मेडिएटर किंवा काउन्सिलर म्हणून या संधी असतील. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणाºया ‘एआय थेरपिस्ट’चं काम महत्त्वाचं ठरेल.

३. रोबोट ट्रेनररोबोट ट्रेनर म्हणजे रोबोटचा प्रशिक्षक़ रोबोट जरी स्वत:हून काम करण्यास सक्षम असला तरी तो केवळ ठरवून दिलेले काम करतो. त्याला विविध कामं करण्यासाठी प्रशिक्षण म्हणजे प्रोग्राम करणाऱ्या प्रशिक्षकांना येत्या काळात बरंच काम असेल. रोबोट किंवा कॉम्प्युटरला शिकवणारे अल्गोरिदम म्हणजे मशीन लर्निंग तंत्रज्ञान. सरावातून नवीन गोष्ट शिकण्याची ही यांत्रिक क्षमता खूप क्रांतिकारी आहे. आज मशीन लर्निंग जाणणाऱ्या व्यक्तींना इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मागणी आहे. अत्यंत प्रगत असणाºया या तंत्रज्ञानामध्ये माहीर असलेले सध्या फार कमी लोक आहेत. परंतु, आगामी काळात हेच तंत्रज्ञान अगदी सामान्यांच्या हातात येईल, म्हणजे त्याच्याशी निगडित प्राथमिक पातळीवरील नोकऱ्या निर्माण होतील. उदाहरणार्थ गाडीच्या मेकॅनिकला गाडीची प्रॅक्टिकलच माहिती असते. गाडीच्या बनावट, निर्मिती अथवा त्यामागील अभियांत्रिकीची त्याला गरज नसते. तसंच रोबोटमध्ये नवनवीन प्रोग्राम इन्स्टॉल करण्यासाठी रोबोटिक्स माहीत असणं गरजेचं नाही. त्याला ट्रेनिंग देण्याचं काम रोबोट ट्रेनरचं असेल.

४. ड्रोन ट्रॅफिक कंट्रोलरड्रोनची ट्रॅफिक वाढेल आणि त्यासाठी माणसांना काम करावं लागेल असं आज आपल्याला वाटतं का? ड्रोन हा तसा काहींच्या कामाचा आणि काहींच्या निव्वळ हौशेचा विषय. पण ड्रोनच्या घिरट्या लवकरच वाढतील. एकट्या अमेरिकेत गेल्या वर्षी ६.७ लाख ड्रोन्सची नोंदणी झाली आहे. अमॅझॉन आणि गुगल ड्रोनद्वारे घरपोच सेवा सुरूकरण्यासाठी प्रयत्न करताहेत. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रात उत्तम नोकºया निर्माण होणार आहेत. सध्या विमानांची वाहतूक नियंत्रण व्यवस्था (एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम) जशी आहे तशीच व्यवस्था ड्रोनसाठी तयार करावी लागेल. त्यामुळे वैमानिकाला मदत करणाºया नियंत्रकाप्रमाणेच ड्रोन ट्रॅफिक नियंत्रण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. म्हणजे ड्रोनचा मार्ग, स्थळ, वेगावर नजर ठेवून योग्य त्या सूचना देण्याचं काम ड्रोन ट्रॅफिक कंट्रोलरकडे असेल. ड्रोनची वाहतूक सुरळीत राहील याची काळजी घेणं हे कंट्रोलरचे प्रमुख काम असेल.

५. ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी डिझायनरआभासी वास्तव (आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटी - एआर) हा आजच्या काळातील परवलीचा शब्द. व्हिडीओ गेम्समध्ये खेळाडूला वास्तववादी अनुभव देण्यासाठी प्रामुख्याने आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातोय. आता हळूहळू मार्केटिंग आणि रिटेलसारख्या इंडस्ट्री त्यांच्या ग्राहकांना ‘इंटरअ‍ॅक्टिव्ह एक्सपेरिअन्स’ देण्यासाठी एआरचा वापर वाढत आहे. त्यामुळे एआर डिझायनर्सना गलेगठ्ठ पगार दिला जात आहे. परंतु, भविष्यात हे तंत्रज्ञान मुख्य प्रवाहात येऊन या तंत्रज्ञानात पारंगत अभियंते, आर्किटेक्ट्स आणि यूएक्स डिझायनर्सना कंपन्या शोधत येतील. अगदी जॉब ट्रेनिंग देण्यापासून ते मार्केटिंगसाठी नवीन कल्पना अस्तित्वात आणण्याची जबाबदारी ते पार पाडतील. सध्या जरी व्हर्च्युअल किंवा आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटी ही संकल्पना बाल्यावस्थेत असली, तरी भविष्यात यातील डिझायनर्स आणि प्रोग्रामर्सना मोठ्या प्रमाणात नोकºया उपलब्ध होतील.

फ्रीलान्सर हेच कामआज कायमस्वरूपी (परमनंट) नोकरीचं अप्रूप आहे. पण एकाच ठिकाणी आजीवन काम करण्यापेक्षा आपल्या ज्ञानाचा वापर आपल्या आवडीनिवडीनुसार करण्याकडे आजच अनेकांचा कल दिसतो आहे. त्यातून ‘स्वतंत्र सल्लागार’ किंवा फ्रीलान्सर म्हणून काम करणारेही आहेत. अमेरिकेत आणि युरोपात आताच एक प्रोजेक्ट घेऊन तेवढ्यापुरतं काम करणारे आहेत. त्याला प्रोजेक्टबेस काम म्हणतात. प्रोजेक्ट संपला की दुसरी कंपनी, दुसरा प्रोजेक्ट. भविष्यात नोकरी न करता याच पद्धतीने प्रोजेक्टबेस काम करण्याकडे कल वाढेल. छोट्या छोट्या प्रकल्पावर काम करून मोठ्या कंपन्यांना योग्य ते मनुष्यबळ पुरविण्याचं किंवा सेवा देण्याचं काम हे फ्री-लान्सर करतील. मदतनीस म्हणून नवीन व्यवसायांना सल्ला व मार्गदर्शनाबरोबरच त्यांच्या नव्या कामाला हातभार लावतील. नोकरी करण्यापेक्षा हे फ्रीलान्सिंग पैसाही जास्त देईल आणि कामाचं समाधानही अशी शक्यता आहे.

* तीन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘फास्ट फॉरवर्ड २०३० : द फ्युचर ऑफ वर्क अँड वर्कप्लेस’ नावाच्या अहवालानुसार, आज अस्तित्वात असणाºया सुमारे ५० टक्के नोकºया २०२५ पर्यंत नामशेष होणार आहेत. तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे निर्माण होणाºया नवीन नोकºयांमध्ये सृजनशील (क्रिएटिव्ह), सामाजिक व भावनिक बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे सखोल ज्ञान या बाबींना अनन्य महत्त्व असेल, असं निरीक्षण या अहवालात नोंदविलेलं आहे.

* संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत (शिक्षण) गॉर्डन ब्रॉऊन यांनी याच वर्षी एप्रिल महिन्यात सांगितले की, सुमारे २६ कोटी मुलं शिक्षणापासून वंचित असून, अतिरिक्त ४० कोटी मुलांमध्ये रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांचा अभाव आहे. त्यामुळे शिक्षणाचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी आर्थिक मदतीची गंगा वाहिली नाही तर २०३० पर्यंत या जगात ८० कोटी मुले अशी असतील ज्यांच्यामध्ये नोकरी मिळविण्याचे कौशल्य नसेल.

* आॅक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, आॅक्युपेशनल थेरपी, नृत्य दिग्दर्शन, पर्यावरण, अभियांत्रिकी, मानसिक आरोग्य समुपदेशन यांसह शेकडो प्रकारच्या नोकºया भविष्यातही कायम राहतील.

* ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने सांगितल्याप्रमाणे, आॅटोमेशनमुळे २०२० पर्यंत सुमारे ७० लाख पारंपरिक नोकऱ्यांचं अस्तित्व संपुष्टात येईल. यामध्ये प्रशासन आणि कार्यालयीन नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम दिसून येणार आहे. परंतु, यामध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे २० लाख नवीन प्रकारचे रोजगारदेखील निर्माण होतील.

काही भन्नाट फ्युचर जॉब्ज

१. बॉट लॉबिस्टएखाद्या उत्पादनाची किंवा सेवा पुरवठादाराची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचे काम बॉट लॉबिस्ट करेल. त्यासाठी बॉटच्या माधम्यातून खोटे सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यासारखं काम आलं.

२. डिजिटल करन्सी स्पेक्युलेटरव्हर्च्युअल जगात पैसा अधिकाधिक डिजिटल होत चालला आहे. इंटरनेटवर रोकड पैशाऐवजी व्हर्च्युअल पैशाची (बिटकॉइन्स) देवाणघेवाण सुरू आहे. भविष्यात याविषयी ज्ञान असणाºया व्यक्तीला खूप स्कोप आहे.

३. उत्पादन सल्लागारएखाद्या कारखान्यातील किं वा व्यवसायातील कर्मचाºयांच्या वेळ व्यवस्थापनापासून ते आरोग्यापर्यंत सल्ला देऊन त्यांची उत्पादन क्षमता वाढविण्याचे काम हा सल्लागार करेल. लोकांना प्रेरित करण्याचे काम तो करेल.

४. बिग डेटा डॉक्टरसोशल मीडिया आणि इंटरनेटवरील वावरामुळे जमा झालेल्या माहितीचे (डेटा) विश्लेषण करून कंपनीच्या स्ट्रॅटेजी ठरविणे आदी कामे करण्यासाठी विश्लेषकाची गरज आहे. त्यालाच ‘बिग डेटा डॉक्टर’ म्हणतात.

५. क्राउडफंडिंग स्पेशालिस्टनवनवीन आविष्कारी कल्पनांना उद्योग-व्यवसायाचे स्वरूप मिळवून देण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ मिळणे खूप गरजेचे असते. अशा भन्नाट संकल्पनांसाठी आर्थिक गुंतवणूक मिळवून देण्याचे काम करणाºयांना ‘क्राउडफंडिंग स्पेशालिस्ट’ म्हणतात.

(मयूर लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत उपसंपादक आहे)