शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आता गरबा थेट घरात ...तो कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 2:18 PM

कोरोनाकाळात शारीरिक दूरीच्या नियमात गरबा, दांडिया तर काही दरवर्षीप्रमाणे  रंगणार नाहीत; पण म्हणून उत्साही तारुण्य थोडंच गप्प बसणार? ऑनलाइन गरबा क्लासेस लावून येत्या नऊ दिवसात ऑनलाइनच ग्रुप गरबा खेळायची तयारीही झाली. त्या नव्या गरब्याची गोष्ट.

- स्नेहा मोरे

कुणी घरात एकटंच गिरक्या घेतंय, ताल धरतंय, मस्त आपल्याच धुंदीत गरबा करतंय, असं दिसलं तर दचकू नका.भाई, जमाना ऑनलाइन का है! कोरोनाकाळात जर शिक्षणापासून कामार्पयत अनेक गोष्टी ऑनलाइन गेल्या तर मग सण-उत्सवांनीच का म्हणून मागे राहावं. त्यात नवरात्र म्हटलं की गरबा-दांडिया आलंच.एरव्ही तर कार्पोरेट टीम बिल्डिंगचे एफर्ट म्हणूनही गरबा क्लासेसला अनेकजण जायचे. स्ट्रेस बस्टर वगैरे लेबल लावून बाकायदा गरबा शिकायला तरुण कर्मचारी जायचे. काही तर हौशीने ठरवून गरबा शिकायचे.पण यंदा काय? यंदा तर सारं ठप्प.पण म्हटलं ना जमाना ऑनलाइनचा आहे.  विपरीत परिस्थितीवर मात करत  दांडिया, गरब्याचेही ऑनलाइन क्लासेस दणक्यात सुरूआहेत. ज्यांना गरबा शिकायचा ते शिकणार, ऑनलाइन एकत्र येऊन नवरात्रत गरबा करणारही. या नव्या ट्रेण्डचंच तर नाव आहे, गरबा  होम.यंदा गुगल मीटपासून ते अगदी झूम कॉलवरही गरबा क्लासेस भरूलागलेत.अगदी लहान मुलांपासून ते तरुण-तरुणी ते काही उत्साही आजी-आजोबाही घरबसल्या गरबा शिकत आहेत.खास पारंपरिक दांडिया आणि गरबा शिकवणा-या क्लासेसला बंदची पाटी लावायची वेळ निदान मोठय़ा शहरांत तरी आलेली नाही.नवरात्रोत्सवापूर्वी 15 दिवस हे गराबा क्लास सुरूहोतात. त्यांच्या बॅच असतात. यामध्ये दोन ते तीन दिवसांचा बेसिक कोर्स, त्यानंतर पाच दिवसांचा अँडव्हान्स कोर्स, वीकेंड बॅच यासारखे प्रकारही असतात. खासकरून आयटीतील तरु ण-तरु णींची वीकेंड बॅचला गर्दी होते, असे  ‘अभिव्यक्ती गरबा ग्रुप’च्या रेखा भानुशाली यांनी सांगितले.  

यंदा गरबा क्लास ऑनलाइन घेणा-या  रेखा भानुशाली सांगतात,  काही वर्षापूर्वी मैत्रिणींना गरबा शिकविण्याच्या हेतूने मी क्लास सुरूकेले होते; पण नंतर गरब्याची आवड असणा-यां ची संख्या इतकी वाढली, की नवरात्र जवळ आली की पुणोकर चौकशीसाठी आपोआप येतात. यंदा मात्र काही बॅचेस मी ऑनलाइनच घेते आहे.’ दरवर्षी मोठय़ा मैदानात दांडिया शिकवणा-या अदिती फदाले सांगतात, ‘माझ्या क्लासमध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त जण सहभागी व्हायचे, त्यात ग्रुपपासून ते अगदी सोलोर्पयत गरबा, दांडिया शिकविण्याची मजा वेगळीच होती, यंदा मात्र अगदी कॅमे-याच्या चौकटीत हे सगळं बसवायला लागतंय; पण गरबा, दांडियाची नशा काही कमी झालेली नाहीये. यंदा क्लासच्या वतीनेच नवरात्नात वेगवेगळ्या थीम्सवर गरबा आयोजित केला आहे. प्रत्येकाने आपापल्या घरीच तयार होऊन यात धम्माल नृत्याची मजा लुटायचीय. सध्या गरब्याचा सराव केल्याने दांडिया  कार्यक्रमात इतरांबरोबर परफॉर्मन्स करण्याचा आत्मविश्वासही अनेकजण पहिल्यांदाच अनुभवत असतात.’

गणोशोत्सवाप्रमाणेच गरब्याची क्रेझ परदेशी नागरिकांमध्येही दिसून येते. मुंबईत एक वर्षासाठी कामानिमित्ताने आलेल्या फ्रिडोलीन या जर्मन तरुणालाही गरबा शिकावासा वाटला. तो सध्या ‘अभिव्यक्ती’ ग्रुपमध्ये गरबा शिकत आहे. मुंबईच्या बोरिवली कोराकेंद्र येथे होणा-या गरबा नाइटमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती; परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे हे शक्य नसल्याने काहीतरी हटके करायचा प्लान आहे असं तो सांगतो.गरबा, दांडिया, रोषणाई, डीजे हे सारं नेहमीचं यंदा नसेल; पण तरीही अनेकांनी घरीच मस्त नटूनथटून ग्रुपने ऑनलाइन गरबा नृत्यात सहभाग घेतला आहेच.या मंद काळातही अनेकांच्या आयुष्यात गरबा असा उत्साही ऑनलाइन ताल धरणार आहेच. ए हालो. अशी हाक देत उत्साहाची गिरकी घरातही घ्यावीशी वाटणं, या उमेदीची तर या काळातही गरज आहे.

( स्नेहा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वार्ताहर आहे.)

moresneha305@gmail.com