-कलीम अजीम
तुलसी गबार्ड, कमला हॅरिस, प्रमिला जयपाल, निमरत रंधावा ऊर्फ निकी हेली यांच्यानंतर अजून एक भारतीय वंशीय महिला अमेरिकेत खासदार झाली आहे. गझाला हाशमी. वर्जीनिया राज्यात सध्याच्या रिपब्लिकन सिनेटर ग्लेन स्ट्रेटवेंट यांचा त्यांनी पराभव केला. सध्या अमेरिकन संसदेत एकूण नऊ भारतीय वंशाचे खासदार आहेत.नवनियुक्त सिनेटर गझाला हाशमी यांचा जन्म हैदराबादचा. त्या पाच वर्षाच्या असताना त्यांचे वडील जिया हाशमी अमेरिकेत स्थानिक झाले. जिया हाशमी व्यवसायाने डॉक्टर. गझाला यांनी जॉर्जिया साउर्थन विद्यापीठातून बी.ए. केलं. इमोजी युनिव्हर्सिटीतून साहित्यशास्नत पीएच.डी. केली. त्यांचे पती अझहर रफिक शिक्षणतज्ज्ञ आहेत. या दांपत्याला दोन मुली आहेत.गझाला वर्जीनिया राज्यातील रिचमंड शहरातल्या सारजेंट रेनॉल्डस कम्युनिटी कॉलेजमध्ये शिकवत होत्या. आता त्यांनी त्याचा राजीनामा दिला.गल्फ न्यूजच्या मते 5 नोव्हेंबर रोजी वर्जीनिया राज्यात झालेल्या निवडणुकीत त्यांनी अमेरिकेच्या बंदूक संस्कृतीविरोधात ठोस भूमिका घेतली. अमेरिकेत फोफावणारे बंदूक कल्चर सर्वाधिक धोकादायक मानले जाते. त्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा होता. त्यात सीबीएस न्यूजनेही या विजयाला अनोखा व ऐतिहासिक इतिहास म्हटलं आहे. इथे दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये गझाला म्हणतात, ‘‘मुस्लिमावर विविध प्रकारची बंदी घालणार्या ट्रम्प प्रशासनासाठी माझा विजय धक्कादायक असावा. मात्र अमेरिकेत राहणार्या अनेकांसाठी माझा विजय त्यांच्यासाठी आश्वासक आहे. भविष्यात हजारो स्थलांतरित लोकांसाठी माझा लढा असेल.’’गल्फ न्यूजच्या मते गझाला हाशमी ट्रम्पच्या निर्वासित धोरण कायद्याला बळी पडल्या होत्या. त्यांना अमेरिकेतून निघून जाण्यास सांगण्यात आलं होतं. त्यावेळी गझाला हवालदिल झालेल्या होत्या. त्यामुळे ट्रम्प सरकारचे निर्वासित धोरण हादेखील गझाला हाशमी यांच्या निवडणूक प्रचाराचा एक महत्त्वाचा मुद्दा होता.गझाला या जनतेतून निवडून जाणार्या पहिल्या मुस्लीम महिला सिनेटर आहेत.गझाला हाशमी यांच्यासह या निवडणुकीत अजून तीन भारतवंशीय व्यक्तीचा या निवडणुकीत विजय झालेला आहे. सुहास सुब्रमण्यम त्यातलेच एक. मूळ बंगळुरूचे असलेले सुहास ओबामा सरकारमध्ये व्हाइट हाऊसच्या तंत्नज्ञान धोरणाचे सल्लागार होते. गझाला हाशमी आणि सुहास सुब्रमण्यम या सदस्यांसह अमेरिकेतील भारतवंशीय खासदारांची संख्या आता आठवर गेली आहे.