शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

गर्ल इन द सिटी

By admin | Published: March 10, 2017 1:13 PM

वेबसिरीजच्या जगातल्या मिथिला पालकरला भेटा, ती सांगतेय मनोरंजनाची नवी गोष्ट स्मार्टफोन्स, इंटरनेटचा इझी अ‍ॅक्सेस आणि खिशाला परवडणारे नेटपॅकचे दर यामुळे मनोरंजनाचं माध्यम अलमोस्ट बदललं आहे. सासू-सुनांच्या रटाळ, वर्षानुवर्षे चालणाऱ्या रडगाण्यांत तरुण मुलामुलींना का रस वाटावा? तो नाहीच वाटत. उलट आता त्यांचं सारं जग हातातल्या मोबाइलमध्ये एकवटलं आहे,

- शची मराठे 
 
फोन, एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅपवरून खूप चेज केलं तेव्हा कुठं ती भेटली. मराठीतली पहिली यू ट्यूब सेलिब्रिटी.
मिथिला पालकर.
वेबसिरीज पाहण्याचं माझं वेड अफाट आणि त्याविषयी शोधाशोध सुरू केली तर मराठीतलं म्हणून पहिलं नाव मिथिलाचंच आलं डोळ्यांसमोर.
हसरी, प्रसन्न, चिअरफूल मुलगी. 
तिच्या कप सॉँगचे तरी दीवाने कितीतरी!
वेबसिरीज नावाच्या जगात जायचं, हे जग नेमकं काय आहे नि चालतंय कसं हे समजून घ्यायचं म्हणून ठरवलं आणि मिथिलाला भेटू.
गप्पांची सुरुवातच झाली ती तिच्या अत्यंत पॉप्युलर अशा कप साँगवरून!
कप सॉँग? ही काय भानगड?
जे वेबसिरीजच्या जगात फारसे जात नाहीत किंवा गेलेलेच नाही त्यांच्या माहितीस्तव सांगते की ‘ही चाल तुरु तुरु ’ नावाचं हे मिथिलाचं कप साँग. या गाण्याला जगभरातून ५ लाख ६९ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळालेत. म्हणजे एवढ्या लोकांनी ते पाहिलंय यू ट्यूबवर! स्वानंद किरकिरे, इम्तियाज अली, परेश रावल यांच्यासारख्या चिकित्सक आणि भन्नाट लोकांनी तिचं या गाण्यासाठी कौतुक केलं आहे.
हे सारं काय आहे तर ही आहे इंटरनेटची ताकद.
आणि ती ताकद नेमकी काय आहे याचं हे कप साँग म्हणजे एक बेस्ट उदाहरण आहे. 
मिथिलाला म्हटलं की तूच सांग, या तुझ्या गाण्याविषयी तर ती म्हणाली, ‘एका सुटीत इंटरनेटवर अ‍ॅना केन्ड्रीकचं कप सॉँग मी पाहिलं. आणि वाटलं आपणही असचं काहीतरी करुया! आणि म्हणून मग मी या कप सॉँगचा ऱ्हिदम शिकून घेतला. मग एका इंग्लिश गाण्याचा व्हिडीओ बनवला. त्यावर कोणीतरी कमेण्ट केली की मराठी गाणं करा की. आणि मग त्याला उत्तर म्हणून ‘ही चाल तुरु तुरु ’ केलं! आणि मग पुढचं तर तुला माहितीचं आहे...’
मिथिला हसत हसत सांगते, तेव्हा ती फक्त तिच्या गाण्याची नाही तर इंटरनेट, यू ट्यूब या नव्या माध्यमांची ताकद सांगत असते. कारण तसं नसतं तर आपण मिथिलालाही यू ट्यूब सेलिब्रिटी म्हणून ओळखलं नसतं. अमुकतमुक सिनेमात तुला पाहिलं होतं असं सांगितलं असतं. 
कट्टीबट्टी (कंगना रनोट-इम्रान खान) या सिनेमात अलीकडेच मिथिलानं काम केलं होतं. पण ते पाहिलंय असं सांगणारे तरुण-तरुणी कमी भेटतील. पण यू ट्यूबवरच्या कप साँगमधल्या मिथिलाला आम्ही ओळखतो असं सांगणारे अनेकजण भेटतील.
याचं कारण काय तर हल्ली तरुणांमध्ये वाढत चाललेली वेबसिरीज ची दीवानगी. स्मार्टफोन्स, इंटरनेटचा इझी अ‍ॅक्सेस आणि खिशाला परवडणारे त्याचे नेटपॅकचे दर यामुळे मनोरंजनाचं माध्यम अलमोस्ट बदललं आहे. शिवाय सासू-सुनांच्या रटाळ, वर्षानुवर्षे चालणाऱ्या रडगाण्यांत तरुण मुलामुलींना का रस वाटावा?
तो नाहीच वाटत. उलट त्यांचं सारं जग हातातल्या मोबाइलमध्ये एकवटलं आहे, म्हणून तर त्यांचं मनोरंजनही त्यांच्या हातात येतं आहे. पर्सनल होतं आहे. 
मालिकांमध्ये दिसणारे नायक-नायिका आणि त्यांच्या प्रेमाची गोष्ट ही टीव्हीपुरतीच असते. नायक-नायिका एकमेकांना भेटतात. ते पुढचे एक महिना म्हणजे साधारणत: २४ एपिसोड्स भेटतच-बघतच राहतात. मग लग्नासाठी विचारतात (४८ एपिसोड्स). लाजतात (७ एपिसोड्स), समज-गैरसमज, भलीमोठी कुटुंबं, आठवडाभर चालणारे सणवार. या सगळ्यात लग्न की लिव्ह इन, नोकरीचा सेफ पर्याय की स्वत:चं पॅशन हे तरु णाईचे खरे प्रश्न टीव्हीला पडतच नाहीत. 
आणि त्यामुळे नेमक्या याच विषयांवर भाष्य करणाऱ्या वेब मालिकांना मात्र प्रचंड लाइक्स आणि व्ह्यूज मिळतात. रिअ‍ॅलिटी आणि दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेल्या वेब मालिकांचं स्वागतच नाही तर त्याची एक नवी क्रेझ म्हणूनच तरुणांच्या जगात दिसते. या वेबसिरीज सबटायटल्ससह असल्यानं त्या पाहताना भाषेचा अडसर येत नाही. 
म्हणूनच फॅशन इंडस्ट्रीत करिअर करायला मुंबईत आलेली मीरा सेहगल (जी भूमिका मिथिला पालकर तिच्या वेबसिरीज मध्ये साकारते आहे) आजच्या युथला आपली वाटते. मुंबईत दोन रूममेट्सबरोबर (ज्यातला एक मुलगा आहे) राहणं, त्यातल्या एका मैत्रिणीला शॉपिंगचं व्यसन असणं, इंटनशिप करत असलेल्या कंपनीतल्या बॉसचं रॅगिंग आणि या सगळ्याशी स्ट्रगल करणारी ही मीरा अनेकांना, लोकांना त्यांच्यातलीचं एक वाटते. 
‘गर्ल इन द सिटी’ ही ती वेबसीरिज.
ही सीरिज इंटरनेटबरोबरच यू टीव्ही बिनधास्त चॅनलवरही दाखविण्यात आली होती. 
एकतर हा सारा मामला तरुण. त्यात कोणतीही सेन्सॉरशीप नाही हा या माध्यमाचा यूएसपी आहे. यू ट्यूबला कोणत्याही विषयाचं वावडं नाही. लेखक-दिग्दर्शक त्यांना हव्या त्या विषयावर, हव्या त्या भाषेत, हव्या त्या फॉर्ममध्ये व्यक्त होऊ शकतात. त्यांनी बनवलेला कण्टेण्ट बघणारा जगात कोणीतरी, कुठेतरी असणारचं. म्हणूनच कोकणातल्या सांदण रेसिपी व्हिडीओला इटलीमधून लाइक्स मिळू शकतात किंवा काश्मीरची पश्मिना शाल विणण्याची प्रोसेस या व्हिडीओवर कोणा अफ्रिकेतल्या माणसाची कमेण्ट येऊ शकते. फक्त नग्नता आणि हिंसाचार या दोन विषयांवरच्या व्हिडीओंसाठी यू ट्यूबच्या काही गाइडलाइन्स आहेत. तेवढं पथ्य पाळून कोणीही क्रिएटिव्हिटीच्या भराऱ्या घेऊ शकतो. 
म्हणून की काय, यू ट्यूबवरच्या स्वातंत्र्याचं वारं प्यायलेल्या मिथिला पालकरला इंटरनेटवरचं काम म्हणजे संधींची खाण वाटते. सध्या मिथिला गुंतलीय ती गर्ल इन द सिटीच्या दुसऱ्या सीजनच्या तयारीत. 
तिच्याशी बोलून या प्रवासाची सुरुवात होते आहे, आता आपण या वेबसीरिजच्या जगात जाऊ आणि हे जग नक्की चालतं कसं? चालवतं कोण? त्यातली दीवानगी काय आणि पॅशन काय, हे समजून घेऊ...
नव्या काळातलं हे मनोरंजन, त्याचं जग नको समजून घ्यायला?
 
टार्गेट कोण?
वेबसीरिजना कोणताही ‘टार्गेट’ आॅडियन्स नाही. नसतो. शिवाय अर्धा तास टीव्हीसमोर बसण्याचं बंधनही नसतं. एक-दोन मिनिटांपासून आठ-दहा मिनिटांचे छोटे छोटे एपिसोड. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझ करण्याची आणि वाटलं तर कधीही आणि कितीही वेळा एपिसोड रिपीट पाहण्याची मुभा. कोणीही यावं, हे वेब एपिसोड पहावेत, आवडले तर लाइक, कमेण्ट आणि शेअर करावेत. नाही आवडले तर काय नाही आवडलं तेही जरूर नोंदवावं. नेहमीच्या मनोरंजनातून थोडा ब्रेक म्हणून, निदान ब्रेकमध्ये तरी एखादी वेबसीरिज पहायला काय हरकत नाही. वेगळा अनुभव असतो हा!
 
( वेबसिरीज ची मोठ्ठी फॅन असलेली शची मुक्त पत्रकार आहे.)