- भूषण केळकरलेखक आयटी तज्ज्ञ आहेत.bhooshankelkar@hotmail.com
‘आई, मला शाळेचा डबा दे!’‘परवाच हॉटेलचं विचारून पक्कं करून टाक फोनवर!’‘सुटीतली आपली ट्रिप- त्याचं बुकिंग करायचंय!’- सर्व दिशांनी केल्या जाणाऱ्या या मागण्यांवर घरोघरच्या आया एक वाक्य (आपल्या भाषेत, आपापल्या देशात) म्हणतात..‘अरे मी एकटीच आहे आणि मला दोनच हात आहेत. एकावेळी मी किती काम करणार?’कॅलिफोर्नियातून मागील आठवड्यात निघालो तेव्हा गुगलची google I/o 2018 ही कॉन्फरन्स होती. सुंदर पिचाईने या आपल्या इंडस्ट्री ४.० वरच्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित नवीन तंत्रज्ञान जाहीर केलं. एकाचं नाव आहे गुगल ड्युप्लेक्स. सुंदर पिचाई हा गुगलचा प्रमुख. त्याला बहुधा लहानपणाची भारतातली अनेक आघाड्यांवर लढणारी त्याची आई आठवत असेल! या ‘गुगल ड्युप्लेक्स’मधे तुम्ही आज्ञा दिलीत की तुमचा फोन आपोआप लावला जाईल. अपॉर्इंटमेंट घेतली जाईल. बुकिंग केले जाईल. अगदी नेहमीच्या फोनसारखं! आहे की नाही भारी? ‘मला दोनच हात आहेत’ म्हणणाºया आईला आता अजून हात मिळाले बघा! जणू दशभुजाच !‘गुगल लेन्स’ या नव्या प्रणालीमध्ये किंवा ‘गुगल मॅप्स’मध्येसुद्धा आता इंडस्ट्री ४.० मधले अजून दोन महत्त्वाचे घटक अंतर्भूत झाले आहेत. आपण आतापर्यंत रोबॉटिक्स व्हीआर/एआर, क्लाऊड, बिग डाटा, बॉट्स, सायबर सिक्युरिटी, थ्रीडी प्रिंटिंग मॅन्युफॅक्चरिंग हे घटक बघितलेत. गेल्या काही लेखांमधे या लेखात आणि पुढील काही लेखात आपण एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स - कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आयओटी म्हणजे इंटरनेट आॅफ थिंग्ज हे इंडस्ट्री ४.० चे उरलेले पण महत्त्वाचे घटक बघू.हे दोन्ही घटक स्वतंत्ररीत्या पण समजावून घेता येतील आणि एकत्रितरीत्यासुद्धा. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा अधिक प्रमाणात सॉफ्टवेअरशी संबंधित तर आयओटी हे अधिक हार्डवेअर/भौतिक गोष्टींकडे झुकलेले आहे. अर्थात या दोन्ही गोष्टी एकमेकांवर आधारित आहेत हे सहज समजण्यासाठी मी उदाहरण देतो.अमेरिकेतल्या एक घराचे उदाहरण घेऊ. अॅनिसोना हे राज्य कमालीचं गरम असतं. कोणी आॅफिसमधून निघालं असेल आणि घरी पोहोचेपर्यंत ए/सी चालू नसेल तर भट्टी होईल एवढं गरम. तर हा घरी जायला निघाल्याचं, गाडी चालू झाल्यानं आणि मोबाइलच्या लोकेशनवरून कळलं, की आयओटीमधील घरचा तपमापक हे मोजेल की घरी भट्टी आहे, गार करणं आवश्यक आहे. आॅफिस ते घर हा नेहमी लागणारा वेळ, आता असणारं ट्रॅफिक यातील ताळमेळ लावून, घरच्या या मालकाला नेहमी किती तपमान आवडतं ही माहिती वापरून, कूलर केव्हा चालू करायचा व किती तपमानाला आणायचा, किती वेळात हे ठरवणार, हा सगळा भाग म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय). अर्थात मधे बिग डाटा, क्लाइड इ. लागेल बरं का. आता ते एकदा एआयनी ठरवलं की प्रत्यक्ष कू लरचं सेटिंग करणं, बटणं चालू होणं हा भाग परत आयओटी आणि त्याच्या मागची संगणक प्रणाली प्रोग्राम, त्यातलं पृथक्करण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. तसं प्रोग्राम/ संगणक प्रणाली हा भाग गेली ६० वर्षे आहे, पण मानवी मेंदूसारखं काम करू शकणारा संगणक म्हणजे एआय.तुमच्यापैकी काही विद्यार्थी, शिक्षक हे संगणकावर प्रोग्राम लिहित असाल. त्यातले यम-नियमांचा तुम्हाला कंटाळासुद्धा येत असेल तर तुमच्यासाठी छान बातमी आहे. स्वर चौधरी या भारतीय माणसाच्या Bayou नावाच्या कंपनीने टेक्सासमधील राईस युनिव्हर्सिटीमध्ये एआय बेस्ड कोडिंगची यंत्रणा काढली आहे. तुम्ही फक्त तुम्हाला काय करून हवंय त्याचे काही सांकेतिक शब्द द्यायचे की तुम्हाला झटक्यात संगणक प्रणाली कम्प्लीट कोड लिहून मिळेल! भारी ना?अजून एक भारतीय- पराग हवालदार. त्याने २०१७ चं आॅस्कर अवॉर्ड फॉर टेक्नॉलॉजी मिळवलं. त्यात त्यांनी एआय व मानवी भावनांवर आधारित हावभाव देणाºया अॅनिमेशनवर सोनी पिक्चरसाठी काम केलं होतं. मी तर वाचलं की गेल्या आॅस्कर अवॉर्डचे विजेते कोण असतील हे एआयनी ९४ टक्के अचूकतेने सांगितलं होतं.काय सांगू राव, हेच एआयवालं सॉफ्टवेअर कर्नाटक निवडणुकीत वापरायचं राहून गेल्याची हळहळ मात्र वाटली!!