तुमच्या आजी-आजोबांना तुम्ही मार हौशीनं फोन घेऊन देता ते बाहेर निघाले की, आठवणीनं फोन त्यांच्या बॅगेत टाकता, पण उशीर झाला आणि तुम्ही फोन केला, तर ते चुकून कधी फोन चटकन उचलत नाहीत. घरातील, तुम्ही सारखा फोन करता, काळजी करता, पण वाजणारा फोन उचलला जात नाही. मोबाइलची रिंग वाजत असेल पण ऐकू आलं नाही असं मग आजी-आजोबा सांगतात. आपण मग नुस्ते वैतागतो, पण करता काहीच येत नाही. पण अशी चिडचिड करण्यापेक्षा एक उपाय करा! अँण्ड्रॉइड जीपीएस ट्रॅकर अॅप तुमच्या मदतीला हजर आहे. हे ट्रॅकर तुम्हाला तुमच्या माणसांचं लोकेशन दाखवेल म्हणजे तुम्ही त्या लोकेशनवर जाऊन शोध घेऊ शकता. तरुण मुलींनाही सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे अँप फार महत्त्वाचे ठरावे. तेव्हा ‘जीपीएस ट्रॅकर प्रो’ (¬ढर ळ१ूं‘्रल्लॅ ढ१) हे अँण्ड्राइड अॅप तुम्हाला मदत करेल.
काय आहे हे अॅप?
* जीपीएस ट्रॅकर प्रो-स्मार्टफोनवर इन्स्टॉल झाल्यानंतर मोबाइलनंबर किंवा ई-मेल आयडी टाकून लॉगीन करावं लागतं. लॉगीन झाल्यावर हे अॅप तुमचं लोकेशन दाखवतं. मात्र यासाठी तुमच्या स्मार्टफोनवर जीपीएस चालू असणं आवश्यक आहे.
त्यानंतर एक फॅमिली सर्कल तयार करता येतं. ज्या लोकांना तुम्हाला ट्रॅक करायचे आहे त्यांना अँड करायचं. मेंबर्स अँड करताना त्यांचा ई-मेल आयडी आणि त्यांचा मोबाइल नंबर टाकायचा. त्यानंतर त्या मेंबर्सला त्यांच्या मोबाइलवर इन्व्हीटेशन जातं.
मेंबर्सच्या इन्व्हीटेशनमध्ये एक लिंक असेल. त्या लिंकमध्ये लाइफ ३६0 चा डाउनलोड पाथ असेल. त्याचा वापर करून तुमच्या फॅमिली मेंबर्सला लाइफ ३६0 हे अँप डाउनलोड करावे लागतं. मग त्यांनी -मेल आयडी पासवर्ड टाकून लॉगीन केलं की झालं काम. त्यांचं लोकेशन लगेच तुमच्या स्मार्टफोनवर दिसायला लागतं. मात्र त्यासाठी सगळ्यांच्या स्मार्टफोनवर जीपीएस चालू ठेवावा लागेल. एवढं केलं की, सगळ्यांना परस्परांचं लोकेशन दिसू शकतं.
अनिल भापकर
anil.bhapkar@lokmat.com
जीपीएस ट्रॅकर प्रो हे गूगल प्लेवर डाउनलोडसाठी मोफत उपलब्ध आहे.
https://play.google.com/store/apps/ या लिंकवर जाऊन GPS Tracking Pro हे अँप सर्च करा.