-माधुरी पेठकर
माणसाचं जगणं सरळ-साधं नसतंच कधी. खूप प्रश्न, थोडी उत्तरं, खूप तगमग, थोडा दिलासा, ढीगभर दुर्ख आणि टीचभर सुख. कमी-अधिक प्रमाणात सगळ्यांचं जगणं असंच. विरोधाभासानं भरलेलं. माणसाला हवं असतं एक पण त्याला मिळतं वेगळंच. करायचं एक असतं आणि होतं काहीतरी भलतंच. आइस्क्रिम खायला आवडतं पण डॉक्टर नेमकं पथ्य म्हणून आइस्क्रिम वज्र्य करून टाकतात. पैसा असतो थोडाच असतो पण गरजा मात्र पाय पसरतात. या विरोधाभासाचं कधी हसू येतं, तर कधी असे विरोधाभास माणसाला निराश, हताश करतात. जगणं नकोसं करतात. स्वतर् सकट अख्ख्या जगावर, व्यवस्थेवर मग माणसं राग काढत राहातात. फुल्या मारत जातात.असं अनेकदा आपलंही होतं. वाटतं आपल्यापेक्षा जास्त भोग कुणाच्या वाटय़ाला नाहीत. पण दुसरा कोणी तरी दुर्खी, प्रश्नांनी भंजाळलेला भेटतो, त्रासलेली अनेक माणसं जेव्हा आजूबाजूला दिसू लागतात तेव्हा थोडं हायसंही वाटायला लागतं.हे हायसंपण अनुभवायचं असेल तर प्रत्यक्ष आवतीभोवती पाहताच येईल, जगी सर्व सुखी असा कोण आहे हे कळेलच; पण त्यासोबत स्वप्निल शेटे लिखित दिग्दर्शित ‘खूप लोकं आहेत’ ही शॉर्ट फिल्मही पाहा. ती आपल्याला एक वेगळाच आरसा दाखवते.ही फिल्म एकटय़ा माणसाचा स्वतर्शी चाललेला ‘जला दो दुनियावाला’ संवाद ऐकवते. शहरात वाढलेल्या आणि ग्रामीण भागातून शहरात स्थायिक झालेल्या तरुणांचं बोलणं, कारमधून पिकनिकला चाललेल्या मुलांच्या गप्पा, आई आणि मुलीमधले बदलेल्या जगण्याविषयीचे विचार, लोकलमध्ये उभ्या उभ्या मित्रांच्या चाललेल्या काही चावट तर काही गंभीर गप्पा, वडील आणि मुलाचा आयुष्यात गमावल्याच्या आणि कमावल्याच्या गोष्टींचा हिशेब आणि नवरा आणि बायकोनं नात्यात केलेली तडजोड हे सारं ही फिल्म दाखवते. आणि तरीही एकाच वेळी एवढय़ा माणसांना भेटवूनही आणखी खूप लोकं असण्याची जाणीव ही फिल्म करून देते. ‘खूप लोक आहेत’ ही फिल्म सात मुद्दे मांडते. या मुद्दय़ांवर स्वतर्शी, एकमेकांशी बोलणारी लोकं या फिल्ममध्ये भेटतात.जगात खूप लोकं असले तरी तुम्ही एकटे असता मरेर्पयत हे जगण्यातलं वास्तव आहे. पण या सत्याचा सामना करणारा ‘तो’ आपल्याला फिल्मच्या सुरुवातीलाच भेटतो. जात, पैसा हे त्याला जगणं बरबाद करणारे, माणसांना एकटे पाडणारे शत्रू वाटतात. पैशाशिवाय माणसं एकमेकांना ओळख दाखवत नाही. किंमत देत नाही. या आयुष्यात आपल्या मनासारखं काहीच होत नाही असं म्हणत तो तडफडत राहातो. आयुष्य इतकं जाचक आहे किमान मरण तरी शांतपणे यावं एवढीच त्याची अपेक्षा असते.या फिल्ममध्ये नंतर दोघेजणं भेटतात. दोघेही मित्र फक्त दोघांची पाश्र्वभूमी वेगळी. एक शहरात वाढलेला, तर दुसरा गावातून येऊन शहरात स्थायिक झालेला. शहरात राहण्याचे प्रश्न वेगळे असतात हे गावातल्यांना कसं समजून सांगावं या विचारानं एकजण कावलेला, तर दुसरा लग्नासाठी शिकलेली आणि नोकरी करू शकणारी मुलगी हवी म्हणून अडून बसलेला. दोघांच्याही जीवनात पैशानं वेगवेगळे प्रश्न निर्माण केलेत. एक लग्नासाठी मुलगी शोधतानाही पैशाचाच विचार डोक्यात ठेवतो, तर एकाला आपल्याकडून पैशाची अपेक्षा करणारी गावाकडंची माणसं नकोशी होतात. उदारीकरणानंतर माणसाच्या जगण्याच्या चौकटी बदलल्या. पैसा सर्व काही बनू लागला. पैशामुळे घर, बंगला, गाडी यासारखी चालून आलेली सुखं मोठी वाटू लागली. हे मिळवणारे स्वतर्ला ग्रेट समजू लागले. हे ज्यांना मिळवता आलं नाही त्या लोकांवर या लोकांनी पराभूततेचा शिक्का मारून टाकला.
ही फिल्म पाहण्यासाठी लिंकhttps://youtu.be/xX3PXIaQYm0