शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

त्यानं पुढच्या स्पर्धकाला फिनिशिंग लाइनच्या पुढे ढकललं, आणि  .. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 5:47 PM

जिंकण्याची एक भलतीच भन्नाट गोष्ट !

- सारिका पूरकर -गुजराथी

तयारी जीत की.म्हणत मुलाला सगळ्याच शर्यतीत पहिलंच यायला शिकवणा:या आईची जाहिरात पाहिली असेलच ना?वाट्टेल ते करून जिंकाच असं जाहिराती, मार्केट, व्यवस्था, समाज, पालकही आपल्या मुलांना सतत सांगत असतात.थ्री इडियट्समधला व्हायरसही मुलांना हेच शिकवत असतो, भागो, लाइफ अ रेस! जो दुसरा आता है, उसे कोई याद नही करता.मात्र गेल्या काही दिवसांत तुमच्याही र्पयत एक फॉरवर्ड आलं असेल, ज्यात पहिल्या आलेल्यापेक्षा दुस:याच्या खिलाडू वृत्तीचं, मोठय़ा मनाचं, दिलदारीचं आणि माणूसकीचं दर्शन होतं आहे.बाकी आमजनतेसह आर. माधवननेही त्याची स्टोरी सोशल मीडियात अकाउण्टवर शेअर केली. दरम्यान केरळमधील अलानाल्लूर या गावातील एका प्राथमिक शाळेतील मुलांनी तर त्याला चक्क पत्रं पाठवलीय, त्याच्यावर निबंधदेखील लिहिले.अर्थात 2020 ची नाही, कोविडपूर्व काळातली डिसेंबर 2012 ची ही गोष्ट आहे.तो स्पेनचा धावपटू इव्हान फर्नांडिज अनाया. स्पेनधील बुर्लाडा येथे धावण्याची क्रॉस कंट्री स्पर्धा झाली होती. केनियाचा चॅम्पियन धावपटू हाबेल किप्रोप मुताई हा या रेसमध्ये अग्रभागी होता. निर्विवादपणो स्पर्धेचा तोच विजेता होणार होता; परंतु मुताईला स्पर्धेच्या फिनिशिंग लाइनचा अंदाज आला नाही व स्पर्धा संपली असे समजून 1क् मीटर अंतर आधीच तो थांबला. त्याच्या किंचित मागे दुस:या क्र मांकावर होता स्पेनचा इव्हान फर्नाडिज अनाया. त्याच्या हे लक्षात आलं, की मुताईला स्पर्धेचा शेवट समजलेला नाहीये. आता खरं तर झटकन पुढे जाऊन स्पर्धा जिंकण्याची, सुवर्णपदक पटकाविण्याची नामी संधी इव्हानकडे चालून आली होती; पण इव्हानने तसं केलं नाही. तो मुताईकडे पाहून जोरजोरात ओरडू लागला, थांबू नकोस, तू धावत राहा, स्पर्धेचा शेवट हा नाहीये, तू जिंकू शकतोस. गंमत अशी होती, की मुताईला स्पॅनिश भाषा समजत नव्हती. त्याला समजतच नव्हते हे काय चालेलय ते? इव्हानच्याही लक्षात आले की, मुताईला त्याची भाषा समजत नाहीये. त्याने अखेर मुताईला फिनिशिंग लाइनच्या पलीकडे अक्षरश: स्वत:हून ढकलून दिले. अशा रीतीने मुताईच सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. घडलं ते अचंबित करणारंच होतं उपस्थितांसाठी. खेळाच्या मैदानात सहसा असं होताना पाहिलं नव्हतं कुणी.ज्याला त्याला विजयी व्हायचं असतं. बक्षीस उंचवायचं असतं. इव्हानला चांगली संधी असतानाही त्याने मात्र ते नाकारलं होतं.स्पर्धेनंतर पत्रकारांनी विचारलेल्या तू असं का केलंस, तू सहज जिंकू शकला असता?या प्रश्नाला इव्हानने उत्तर दिलं होतं, मी जर तसं केलं असतं तर त्या विजयाला काही अर्थ उरला असता का? त्या सुवर्णपदकाचा मान राखला गेला असता का? माङया आईला काय वाटलं असतं माङयाबद्दल? माङया देशाला माझा अभिमान वाटला असता का? तसंही मी त्याला विजयी केलंच नाहीये, तो विजय, ती स्पर्धा त्याचीच होती. एवढय़ावरच इव्हान थांबला नाही, तर तो म्हणाला, माझं तर स्वप्नं आहे की आपण असं काही करू की आपण स्वत:ला बाजूला फेकत इतरांना विजयी करत जाणारे, एकमेकांना सोबत घेऊन जाणारं समाजमन तयार करू.जिंकणं याहून वेगळं काय असतं?विशेष म्हणजे, ज्या काळात स्पर्धा, स्वत:चं अस्तित्व, जिंकणं अधिक महत्त्वाचं त्या काळात अशा गोष्टी, असे प्रसंगच जगण्याची योग्य वाट दाखवतात.

आता येऊ वर्तमानात.केरळच्या शाळेत शिक्षिका सुमिथा के यांनी मुताई यांनी तो जिंकण्याचा फोटो मुलांना दाखवून ही गोष्टही सांगितली.पाठय़पुस्तकात, कोणत्याही अभ्यासक्रमात या फोटोचा, या गोष्टीचा समावेश नव्हता; पण तरीही या मुलांना यातून जगण्याचा आनंदी धडा मिळाला. सुमिथा यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केरळ राज्याचे वरिष्ठ शिक्षण सल्लागार टी.पी. कलाधरन यांनीही त्यांच्या ब्लॉगमध्ये केलं.ुकाळ बदलतो, संदर्भ बदलतात; पण मानवी जगण्यातली ही सच्ची मूल्ये आणि आनंद नव्या काळातही अशी भेटतच राहतात.