शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
2
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
3
बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, देशाच्या या भागात निर्माण होणार पूरस्थिती 
4
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
5
जगातील टॉप ५० कंपन्यांमध्ये भारतातील एकही नाही, कुठपर्यंत झाली Relianceची घसरण?
6
सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली? सलीम खान म्हणाले, "त्याचा काही संबंध..."
7
दोन मुलांच्या मृतदेहांसह कुटुंब करत होतं धार्मिक विधी, शेजाऱ्यांनी बोलावले पोलीस, त्यानंतर...
8
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
9
सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."
10
₹१०००, २०००, ३००० किंवा ५००० टाकल्यास तुमच्या मुलीला किती रक्कम मिळेल; पाहा कॅलक्युलेशन
11
प्रसूतीसाठी डॉक्टर वेळेत न आल्याने मातेच्या पोटातच दगावले बाळ; २४ तास महिलेची तडफड, शस्त्रक्रियेनंतर मातेची सुटका
12
पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत
13
राज्यातील तब्बल ९ खासगी वैद्यकीय महाविद्यालये रडारवर; दोन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त; 8 दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश
14
छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला 
15
बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट 
16
युद्धाचा भडका; सोन्याचा भाव ७७ हजार ९०० रुपयांवर, जीएसटीसह किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या
17
सिद्दिकी हत्याकांड प्रकरण, पाच जणांना अटक
18
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
19
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
20
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना

दिल ये जिद्दी है..

By admin | Published: August 25, 2016 5:17 PM

सिंधू-साक्षी-दीपा-ललिता त्यांचं जिंकणं, फक्त मेडलपुरतं मर्यादित नाही..

 - अमृता कदम 

सिंधू-साक्षी-दीपा-ललितात्यांचं जिंकणं, फक्त मेडलपुरतं मर्यादित नाही..त्यांच्या जिंकण्याइतकंच महत्त्वाचं आहे,त्यांनी ‘ज्यांना’ हरवलं, त्यांचं हरणं!आणि ‘ते’ म्हणजे कुणी विदेशी खेळाडू नव्हेत,ते आपल्याच अवतीभोवती, ‘आपले’ म्हणून वावरत असतात..त्यांना हरवलं या मुलींनी..ते कसं?आल्या कुठून या मुली?सिंधू. पहाटे चारपासून कोर्टवर असते ती गेली कितीतरी वर्षं. सतत सात-सात तास सरावात बुडालेली. नेटपलीकडून येणारं शटल सोडलं तर काही दिसत नाही तिलाआणि तिच्या महत्त्वाकांक्षेखेरीज दुसरं काही नाही तिच्या जगात. आणि साक्षी?ती तर हरियाणाच्या खेड्यातली.मुली जन्मालाच येऊ नयेत म्हणून तिथे नवस बोलतात अजूनहीआणि आलीच चुकून गर्भात तरतिथूनच त्या टिंबावर सुरी फिरते म्हणे, का?तर मुलगी ओझं. वंशाचा दिवा मुलगा ना. पण ही पठ्ठी राहिली अशा हरियाणात पाय रोवून उभी. तक्र ारी करण्यात, रडण्या-ओरडण्यात वेळ नाही वाया घालवायला तिने. तिच्या आईवडिलांनाही फार शिव्या बसल्या म्हणतात.मुलगी कुस्ती खेळते,चड्डी घालून लोकांसमोर जाते... क्या होगा इस छोकरीका?नवरा कसा मिळेल?आणि कान लांब झाले तर?शिवाय ही पोरगी अशी उंडारत फिरणार, तर चुल्हाचौका कोण बघेल?पण ऐकलं नाही तिनं.तिचं नावही नव्हतं कुणाला माहीत.तिरंगा फडकावत आपल्या कोचच्या खांद्यांवर बसून डौलात मिरवली रिओच्या मैदानात तेव्हाच कळलं लोकांना,की अरे ही साक्षी मलिक!ललिता बाबर तर कुठली माणदेशातली मुलगी. तिच्याकडे तर बूट घ्यायलाही पैसे नव्हते म्हणे..आणि ती दीपा कर्माकर, तिचं तर राज्य कुठं तिकडे दूर ईशान्येत,तिच्याकडे कसल्या सुुविधा नी काय?पण जिम्नॅस्टिकमध्ये तिनं जे करून दाखवलं,ते पाहून साऱ्या जगानं बोटं नाही मनगटंच तोंडात घातली!अशा कशा या जिद्दीच्या मशाली,आपल्या समाजात अशा लखलखत उभ्या राहिल्या?$$्रिअलीकडेच कुणा एका मुलीने फेसबुकवर एका पोस्ट लिहिली, या तळपत्या मशालींसंदर्भात.ती फार व्हायरलही झाली, वाचली का तुम्ही?ती पोस्ट लिहिणारी मुलगी म्हणते,त्यांनी काही फक्त तिकडे खेळात प्रतिस्पर्ध्यांना हरवलं नाही,जागतिक दर्जाची उच्च कामगिरी फक्त त्यांच्या खेळापुरती मर्यादित नाही.त्यांनी जन्माआधीच मुलींचे खून करणाऱ्या‘त्या’ अल्ट्रासाउण्ड गर्भलिंग चाचणीलाच हरवलं,जी जाहीर करते की, ही ‘ती’ आहे, ‘तो’ नाही!‘फिंद्रीच’ झाली असं सांगण्याच्या सुरात रडवेली होत,मुलगीच आहे असं सांगणाऱ्या नर्सलाही त्यांनी हरवलं.आणि पोटात नाहीच मारता आलं म्हणून रोज, दररोज‘मुलगी आहेस तू, छातीवरची जळती शेगडी’ असं म्हणत‘तिला’ कमी लेखणाऱ्या, तिचा रागराग करणाऱ्या पालकांनाही त्यांनी हरवलं.शिकून डॉक्टर नाहीतर इंजिनिअरच व्हायचं असतं ही यशाची व्याख्या ठरवणाऱ्याखानदानकी परंपरेलाही त्यांनी मागं सारलं..खेलकुद पोरीबाळींचं काम नाही असं सांगणाऱ्या अनेक पीटी टीचर्सनाही त्यांनी मात दिली.आणि क्रीडाधोरणाचा पुरता खेळखंडोबा करणाऱ्या, खेळाडूंऐवजी साऱ्या सुविधा स्वत:च उडवणाऱ्याबाबूशाहीलाही त्यांनी धूळ चारली..‘इतवीत कपडे घालून कुठं मैदानावर खेळतेस, घरात बस’ असं म्हणणाऱ्या दादा-नाना-आजोबा टाइप्स लोकांनाआणि उन्हातान्हात खेळलीस तर काळी पडशील, असं काळजीने म्हणणाऱ्या आजी-नानींना,‘जरा कमी कर तुझं अ‍ॅग्रेशन’ असा सल्ला देणाऱ्या मित्रमैत्रिणींना,कुठं गावभर हिंडत राहतेस म्हणून तांकझाक करणाऱ्या शेजारच्या काकामावश्यांनाहरवत जिंकली आहेत त्यांनी ही मेडल्स !खेळणाऱ्या तरुण मुलीच्या मैदानावरल्या कौशल्यापेक्षातिच्या उघड्यावाघड्या पायांकडेच पाहणाऱ्या हावरट नजरांना,‘लग्न कधी करणार?’ या सततच्या भोचक उत्सुकतेलाआणि ‘सेटल कधी होणार?’ या राष्ट्रीय प्रश्नालाही माती चारली आहे त्यांनी!त्यामुळे त्यांच्या जिंकण्याला ‘आपलं जिंकणं’ म्हणत मिरवू नका..त्यांच्या कर्तृत्वाचं चिमूटभर यशही ‘हमारी बेटी’ म्हणूनहक्कानं मागू नका...जे काही आहे, ते फक्त त्यांचं आहे,त्यांनी आपल्या सगळ्यांना हरवून मिळवलेलं आहे..****लागला का दिसायला तुम्हाला तुमचाच चेहरा, आपलाच चेहरा?किंवा खेड्यापाड्यात घुसमटलेल्या तुमच्या कुण्या मैत्रिणीचा?तू मुलगी आहेस,हे काम बाईमाणसाचं नव्हे,लग्न कर, ते महत्त्वाचं, बाकी शिकायचं काय ते नंतर..एकट्यादुकट्या मुलीचं हे काम नाही,जरा चारचौघींसारखी वाग..जरा लाव चेहऱ्याला गोरं होण्याचं क्रीम,लग्न कसं जमायचं तुझं..???... असे सारे टोमणे ऐकायला लागलेल्याआणि त्यापायी मनातून हरलेल्या अनेकींची लढाईचतर लढल्या या मुली..त्या जिंकल्या म्हणून त्यांचं कौतुक नाही,तर आपल्या समाजरीती, आपल्या धारणा,बाईपणाचं उगीचचं कौतुक ते काचेचं भांडं असल्याची धास्ती,खानदान की इज्जत ते घरच्यांवरचं ओझंया साऱ्या गोष्टींना त्यांनी हरवलंम्हणून त्यांच्या जिंकण्याचं कौतुक!!!आणि हे जिंकणं फक्त सिंधू किंवा साक्षीपुरतं कुठं उरलंय आता?ते तर आहे आपलं.भारतातल्या प्रत्येक मुलीचं.. तिच्या स्वप्नांचं जिंकणं!!आपल्यातही काहीतरी खास आहे,अशी चिमूटभर आग सिंधू, साक्षी, दीपा आणि ललितानेभेट म्हणून वाटली आहे सगळ्या मुलींना!!तुम्हाला मिळाली का ती आग?