सिनेमातल्या नायकांच्या
शरीरावरचे शर्ट गायब झाले.
छातीवरचे केस उडाले,
एकदम क्लिन, चकचकीत,
सिल्की छात्या दिसायला लागल्या,
मग आले सिक्स पॅक अॅब्ज
आणि नंतर एट पॅक्स!
नायकांच्या अंगावर
लो वेस्ट जिन्स दिसू लागल्या,
आणि त्यातून
त्यांच्या अण्डरवेअरची पट्टी दिसू लागली.
आता तर समूद्रात आंघोळ करुन
‘नमकिन’ होऊन हिरो बाहेर पडू लागले,
त्यांच्या हॉट-न्यूड सीनच्या चर्चा होऊ लागल्या.
हे सारं कुणामुळे?
कशामुळे?
फीमेल गेझ
बायकी नजरांसाठी
पुरुषांच्या देहाचं
सादरीकरण करण्याचा
एक नवीन ट्रेण्ड!