ब्रॅण्डेड श्वान पाळण्याच्या एक फॅडवर एक सवालखूप दिवसांपासून एक गोष्ट खटकत होती, कदाचित लिहून मनातील वेदना १०० ग्रॅम कमी होतील.कुत्रा पाळण्याची श्रीमंतांची जुनी सवय आता मध्यमवर्गीय व इतरांनाही लागली आहे. कुत्रा पाळून आम्ही समस्त पृथ्वीतलावरील प्राणी मात्रांवर भुतदया करत आहोत असा काहींचा समज. कुत्रा पाळण्यात काही गैर नाही हो पण आपली पद्धत चुकीची आहे का, त्यामागचा विचार चुकीचा आहे का हे जरा आपण पहायला हवं.कुत्राच पाळायचाय तर तो ब्रॅण्डेड का? म्हणजे लॅब्राडॉर, जर्मन शेफर्ड, बूलडॉग, वगैरे वगैरे. तो काय फोन, टिव्ही. किंवा बाईक आहे काय? एक जिवंत प्राणी आहे. खरी आधाराची गरज रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लांना आहे. कुत्रीने नुकत्याच जन्माला घातलेल्या ५-६ पिलांमधून घ्याना एक-एक पिल्लू सगळेजण, काय फरक पडेल?काही जणांचा तर इतका राग येतो की संध्याकाळी आपल्या ब्रॅण्डेड कुत्र्याला फिरायला घेऊन जाताना जर चुकून त्याच्याजवळ कुणी रस्त्यावरचा कुत्रा आला तर त्याला इतक्या जोरात हातातील काठी किंवा दगड मारतात की त्याच्या हुंदक्यांचा आवाज ऐकून मान विव्हळतं. यालाच म्हणतात का श्वानप्रेम? चाळीतही कुत्रा पाळण्याचं नवीन ट्रेंड. घरात रूसुन बसलेल्या आपल्या ब्रँडेड कुत्र्याला १ तासापासून खाऊन घे पप्पी, माय बच्चा, काय झालं? असं म्हणणारा दारात शिळ्या भाकरीच्या तुकडयासाठी आलेल्या रस्त्यावरच्या कुत्र्याला इतक्या जोरात चप्पल मारु न ओरडतो की त्याच्या घरात पुन्हा जाण्याची स्वत:ची इच्छा मरते. एरव्ही छटाकभर पाली आणि झुरळांना घाबरणाऱ्या काही नखरेबाज मुली ५-५ फूट उंच आणि अंगावर पोतंभर केस असणाऱ्या आपल्या ‘पपीची पापी’ कोणत्या बहादूरीच्या गोळ्या खाऊन घेतात कळत नाही.मित्रांनो, माझी ही पोस्ट लाईक, शेअर केली नाही तरी चालेल, पण जरा विचार तर करा यावर? - राम पंडित
आपला तो पपी, रस्त्यावरचा तो कुत्रा?
By admin | Published: April 05, 2017 6:14 PM