- रवींद्र मोरे
सौंदर्यात अधिक भर पाडण्यासाठी तरुणी रंगभूषा, आभूषणे, अलंकार, केशरचना, वेशभूषा आदी गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर करीत असतात. त्यासोबतच फूटवेअरची भूमिकाही महत्त्वाची ठरत असते. हे फूटवेअर केवळ सुंदर असून चालत नाहीत, तर ते घालून चालताना एक वेगळा आत्मविश्वास जाणवला पाहिजे. असाच आत्मविश्वास देण्याचे काम हाय हिल्स सॅण्डल करीत असतात.
तरुणींची फर्स्ट चॉईस
शरीराची उंची वाढवण्यासोबतच चालण्यातली नजाकत अधिक ठळक करणाºया हाय हिल्स चपलांना त्यामुळेच अधिक मागणी असते. अगदी तरुणींपासून ते मध्यमवयील महिलांनाही हाय हिल्सचा मोह टाळता येत नाही. एके काळी हाय हिल्स वापरणे ही केवळ मॉडेल्स आणि उच्चभ्रू घरातील महिलांची मक्तेदारी समजली जात असे. तसेच उंच टाचेच्या चपलांनीशी चालताना करावी लागणारी कसरत नकोशी मानली जायची. मात्र, आता हे चित्र बदलू लागलं आहे. हाय हिल्स चपलांचा टिक टॉक टिक टॉक असा आवाज करत रस्त्यावरून चालणे अनेक मुलींना आवडायला लागले आहे.
किटन हिल्स
उंची जास्त असणाºया स्त्रियांना हिल्स घालण्याचा मोह असेल तर किटन हिल्स हा उत्तम पर्याय आहे. यात कमी उंचीच्या हिल्स उपलब्ध असतात. त्यामुळे उंच महिलांना फॅशनेबल लूक हवा असल्यास या हिल्सचा वापर करता येतो.
पंप्स
दोन ते तीन इंचाच्या या हिल्सच्या समोरचा भाग हा अत्यंत कमी असतो. त्यामुळे पायाचा खूप कमी भाग झाकला जातो. नखांचा काही भाग यामुळे झाकोळला जातो.
स्टेली टोस
या प्रकारच्या हिल्स ह्या सगळ्यात उंच प्रकारच्या गणल्या जातात. याच्या तळाला सुमारे एक ते दीड इंचाचा पृष्ठभाग असतो. त्यामुळे उंच असूनही त्यावर तोल सावरणे शक्य होते.
वेजेस
या प्रकारात बोटांपासून टाचांपर्यंतचा भाग हा एकसंध जोडलेला असतो. बोटांकडील भाग हा खाली असून टाचेकडील भाग हा उंच असतो. वेजेस प्रकारामध्ये सँडल आणि हिल्स अशा दोन्ही प्रकारामध्ये हे उपलब्ध आहेत.
कोन हिल्स
या हिल्सचा पुढील भाग निमुळता असून पाठीमागील हिल्स आयस्क्रीमच्या कोनाप्रमाणे असतो. त्यामुळे याप्रकाराला ‘कोन हिल्स’ म्हटले जाते.
कन्व्हर्टेबल हिल्स
सॅण्डल्ससाठी जास्त खर्च करण्याची तयारी असल्यास कन्व्हर्टेबल हिल्स वापरु शकता. कारण ह्या प्रकारच्या सॅण्डल्स जरा जास्तच महाग असतात. यात उंच टाचा अगदी सहज कमी-जास्त करू शकता. अशा प्रकारच्या सँडल्सना तुम्ही कॅट हिल किंवा पॉइंटेड हिल्स करू शकता. जुन्या हिल्स बाजूला काढून ठेवून तुम्हाला हव्या त्या सोयीची सॅण्डल्सचे हिल्स कमी-जास्त करू शकता. शिवाय त्याचा तुम्ही फ्लॅट सँडल्स म्हणून वापरु शकता.
डिटॅचेबल शूज
वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चपला वापरत असाल तर तो खर्च बजेटच्या बाहेर जाण्याची शक्यता असते. यासाठी तो खर्च वाचविण्यासाठी डिटॅचेबल शूज हा उत्तम पर्याय आहे. डिटॅचेबल शूज म्हणजे तुम्ही या सँडल्सचा वरचा किंवा विशिष्ट भाग हव्या असलेल्या रंगात बदलू शकता. समजा तुमच्याकडे हाय हिल्स आहेत त्याची डिटॅचेबल शूजमध्ये सोबत अटॅचमेंट करून त्याला हवा तो लूक देता येतो. काहींमध्ये सँडल्सचे रंगीबेरंगी बेल्टही उपलब्ध असतात. तुम्ही कपड्याच्या रंगात ते बेल्ट्स बदलू शकता. काहींसोबत वेगवेगळ्या आकारातले आणि रंगातले पॅटर्न असतात. मात्र हे जरा जास्तच खर्चिक आहे हे नक्की.
हाय हिल्स वापरताना हे लक्षात ठेवा..
हाय हिल्स चपला फक्त रोज थोड्या वेळासाठीच वापराव्यात. कारण सतत हाय हिल्स वापरल्या तर मेंदूला रक्त पुरवठा करणाºया वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. उंच टाचेच्या चपला घेताना त्या चपला चांगल्या दर्जाच्या असतील, याची काळजी घ्या. नेहमीच्या वापरात साधारण एक इंच उंच टाचा असणाऱ्या चपला वापरणे शरीरासाठी योग्य असते.