शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
3
Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा
4
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
5
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
6
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
7
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
8
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
9
बर्थडे दिवशी किंग कोहलीचा खास अंदाज; अनुष्कासोबत या ठिकाणी झाला स्पॉट (VIDEO)
10
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
11
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
12
विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याबाबत सरकारचा नवीन नियम
13
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
14
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
15
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
17
कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
20
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत

हुक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 4:01 PM

मुंबईत कमला मिल पबमधली आग हुक्कयामुळेच लागली हे आता पोलीस तपासांत स्पष्ट झालं आहे. कशी असतात ही हुक्का पार्लर? कोण तरुण-तरुणी जातात तिथं? का जातात? नेमकी ही हुक्कयाची नशा आहे काय? याचा हुक्का पार्लरमधूनच एक खास रिपोर्ट...

शाळकरी मुलांच्या गप्पांत आऊटिंगला जाण्याचा प्लॅन ठरला. मुलामुलांनीच बाहेर जायला घरच्यांचीही ना नव्हतीच. त्यांनीही परवानगी दिली. हॉटेलिंग, आऊटिंग या मुलांसाठी नवीन नव्हतंच. म्हणून मग एकजण म्हणाला काहीतरी खास, कुछ हट के करायचं. याच आयडियातून हुक्का प्यायचं ठरलं. अरे नको, काही झालं तर असं म्हणणाºयांना बाकीच्यांनी दटावलंच. अरे यार काही नाही होत, सेफ आहे, मजा येईल, ट्राय तर मार! मग सगळ्यांनीच ट्राय मारला. शाळकरी वयाची १३-१४ वर्षांची ही मुलं मग नियमित हुक्का पार्लर गाठू लागली. आणि सहज सांगूही लागली, ‘इट्स ओके, चील मार, ‘कश’ का सिर्फ धुवां तो है...’

मुंबईत कमला मिलमधील मोजोस आणि वन अबव्हमधील आग या हुक्क्यामुळेच लागली असं आता पोलीसांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईतल्या अतीश्रीमंत जगातल्या तारुण्याला या हुक्कयाचं कमालीचं वेड लागलेलं दिसतं. ‘स्टेटस सिम्बल’ असल्यासारखं अनेकजण हुक्का पार्लरमध्ये जातात. उत्तररात्र उलटून गेली तरी ‘अभी तो पार्टी शुरु हुई है’ म्हणतात.हुक्का पिण्यात अनेकांना प्रतिष्ठा वाटते. आपलं व्यसनही सामान्यांना परवडणाºया पलिकडचं आणि प्रतिष्ठित आहे असा फीलही आहे. तोच ‘फील’ कायम ठेवत हुक्का पार्लर सजवले गेले. चकाचक हॉटेलच्या आड हे आलिशान हुक्का पार्लर राजरोस सुरु झाले. मुंबईतच कशाला राज्यातील लहानमोठ्या शहरातल्या, हाती पैसा असणाऱ्या तरुणांना हुक्कापार्लंरचे दरवाजा हाका मारु लागले. या पार्लरची सजावट, अनोखी रंगसंगती आणि नवाबी बैठकीसारखी आसनव्यवस्था हे सारं कुणालाही मोहात पाडणारंच आहे. तरुण इथं येतात तशाच तरुणीही. मुलींचीही हजेरी वाढू लागल्यानं या हुक्का पार्लरची चलती वाढली. राज्यातील ४० टक्के मुली हुक्का पार्लरच्या आहारी जात असल्याची धक्कादायक माहिती नशा मुक्ती मंडळाकडे उपलबध आहे.

एकीकडे हुक्का म्हणजे काहीतरी ‘भारी’ असा समज दुसरीकडे आपण कुठल्या फ्लेवरचा हुक्का पितो याबाबतीतही तरुण मुलामुलींत स्पर्धा दिसते. अ‍ॅपल, स्ट्रॉबेरी, मिंट, चॉकेलेट, फायर अ‍ॅण्ड आईस ब्रेन फ्रीजर, नाईट क्वीन यातला कुठला ‘कश’ अधिक चांगला यावरून तरुणांत चर्चा रंगते. उच्चभ्रू वर्गातले तरुण या स्पर्धेत आघाडीवर. पण सामान्य मध्यमवर्गीय तरुणांनाही यासाºयाचा, उच्चभ्रू जगाचा मोह पडूच शकतो कारण अनेक हुक्का फ्लेवर अडिचशे रुपयांपासून मिळतात. अडीचशे रुपये ते २५ हजार रुपये या चढ्या दरात हुक्का पिणारे आहेत. तरुणांच्या जगात व्यसनांचं आकर्षण चटचट पसरतं, परस्परांना ट्राय करुन पाहण्याचे आग्रह तर होतातच. पण आता थेट आॅनलाईनही हुक्क्याची माहिती सहज मिळते. ‘एकट्या मुंबईत दोन हजार हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती’ नशा मुक्ती महामंडळच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास देतात.

मात्र इथंच ही गोष्ट थांबत नाही. हुक्का पार्लर न गाठताही घरच्या घरी हुक्याचे प्रयोग करणारे काही बहाद्दर आहेत आणि त्यांच्या मदतीला इंटरनेटही आहे.अनेकजण ऑनलाईन हुक्का पेन, हुक्का पॉटची खरेदी करतात. इंटरनेटवरची माहिती वाचून स्वत:च इमारतीच्या गच्चीवर अथवा बंद खोलीत हुक्का तयार करून ओढतात. हुक्क्यामुळे काही होत नाही, असा एक गैरसमजही तरुण मुलांमध्ये सर्रास दिसतो. काहीजणांना तर नशेपेक्षाही आपण ‘भन्नाट’ काहीतरी करुन पाहिलं याचीच किक जास्त बसते. आणि मग त्या नादात हे प्रमाण वाढत जातं. नियमित हुक्का ओढणाºया एका तरुणानं नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, हुक्का फक्त एक राजेशाही फिलिंग आणण्यासाठी घेतला जातो. त्यानं काही नशा चढत नाही. मात्र उडणाºया धुरात थोडासा टाईमपास होतो. आपण हरवून जातो त्या धुरांच्या रेषात. सिर्फ कश के धुवे में खो जाने का!’पण इतकं सोपं हे गणित नाही. हुक्का घातक नाही हाच एक मोठा गैरसमज आहे. हुक्क्यामध्ये धातू आणि कार्बन मोनोक्साईडचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे हुक्का हे सिगारेटपेक्षा अधिक घातक मानलं जातं. पण हे तरुणांना कुणी सांगत नाही. आणि ते ही केवळ त्यासाठी सगळ्यांकडेच पैसे नसतात. काहीजण कॉण्ट्री काढतात, त्यातून एकेका कशसाठी हजारो रुपये उडवतात.हा पैसा आणि तरुणांमधली वाढती क्रेझ यातून हुक्का पार्लर सुरुच आहेत. कमला मिलसारख्या घटना घडल्या की तेवढ्यापुरती चर्चा होते. पण साध्या हॉटेलचं रुपांतर थेट हुक्का पार्लरमध्ये होत असताना यंत्रणा त्याकडे डोळेझाक करतात हे एक उघड गुपित आहे.अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर सांगतात, ‘२०१४ साली सुप्रीम कोर्टाने हुक्क्यावरील बंदी उठवली. आणि धंदेवाल्यांचा मार्ग मोकळा केला. हुक्क्याविरोधी कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. सिगारेट अक्ट अंतर्गतच त्याची तरतूद व्हायला हवी. हॉटेल, रेस्टॉरंट, हुक्का पार्लरमध्ये नशेचे सेवन करण्यास नियमावली आहे. स्मोकिंग झोन असल्यानं तो चारही बाजूने बंद हवा. त्याची झळ अन्य ग्राहकांपर्यंत पोहचता कामा नये. ही मंडळी मात्र यासाºयाकडे सर्रास दुर्लक्ष करतात. आणि ते घातक आहे.’

हुक्का पिवून आरोग्याची वाताहात होत होतीच, कमला मिल प्रकरणानं त्यात नवीन प्रश्नही अधोरेखित केले आहेत.हुक्का पितानाचा राजेशाही थाट तरुणांना मोहात पाडतो हे खरंच. त्यापायी लाखो रुपयांची कमाई हुक्कावाल्यांना होते. गरीब घरातील मुलंही श्रीमंताचंच अनुकरण करू पाहतात. रहिवाशी इमारतींच्या बंद खोलीत या पार्ट्या रंगतात. पब, रेस्टारंटमध्ये हुक्का सहजपणे ओढला जातो. अशा ठिकाणी मुलींचे प्रमाणही वाढतेय. त्यामुळे नशेच्या धुंदीत मुलींसोबत लैंगिक छळाचेही प्रकार होतात अशा तक्रारी आहेत.वर्षा विद्या विलास, सरचिटणीस,महाराष्ट्र राज्य नशा मुक्ती

हुक्के दोन प्रकारचे असतात. एक तंबाखूयुक्त आणि विनातंबाखू. तंबाखुयुक्त हुक्क्याच्या अधिक सेवनामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, मूत्राशयाचा कर्करोग, हदयविकार, यकृताचा विकार असे आजार होण्याची भिती असते. घातक केमिकलसहीत, कोळसा, टार, कार्बोमोनाक्साईड आणि हायड्रोकार्बनचं प्रमाण हुक्कयात अधिक असते. त्यातून श्वसनाचे विकारही होतात. जेवणाच्या ठिकाणी हुक्का सेवन करणं तर अधिक घातक आहे.- डॉ. स्वप्नील कुलकर्णी, श्वसन विकार तज्ज्ञ