शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

HOT JOBS- राजकीय पक्षांच्या ‘वॉर रूम्स’च्या आतले आणि बाहेरचे इलेक्शन जॉब्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 2:49 PM

तरुण मतदार म्हणून येत्या निवडणुकीत तुम्ही राजकीय पक्षांना ‘मत’ द्याल, त्याच्या आधी हे पक्ष तुमच्यातल्या अनेकांना ‘नोकरी’ देतील.

ठळक मुद्देनिवडणूक जवळ येते आहे. आता सर्व पक्ष युद्धपातळीवर प्रचाराला लागतील आणि प्रत्येकाच्या ‘वॉर रूम’ धडधडू लागतील. ‘सोशल मीडिया’ने गजबजलेल्या या काळात निवडणुका ही तरुण हातांसाठी उत्तम ‘रोजगार संधी’ आहे. कशी?

योगेश बिडवई

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता निवडणूक जिंकणं म्हणजे एक तंत्र झालं आहे. मुद्दय़ांची मांडणी, जोरदार मार्केटिंग, प्रतिस्पध्र्याच्या उणिवा-अपयश अचूक हेरून त्याविषयी गाजावाजा करणं, आपल्या चांगुलपणाचा जोरदार प्रचार-प्रसार करणं, सतत लोकांच्या नजरेत आपल्या कामाचे तपशील मांडणं हे सारं एका तंत्रशुद्ध व्यवस्थेचा भाग व्हायला लागलं आहे. त्यात सगळ्यात आघाडीवर ठरली समाजमाध्यमे. आपल्यार्पयत व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुकद्वारे येणारा प्रत्येक संदेश या तंत्रशुद्ध प्रचाराचा भाग असेल का, अशी शंकाही आपल्या मनात येत नाही. मात्र निवडणुका लढविण्याच्या आणि जिंकण्याच्या नव्या तंत्रात या सार्‍यांची भूमिका आता जोरकस आणि मूलगामी आहे हे आपल्याला माहीत असलेले बरे. त्यासोबतच निवडणुका लढविताना नवनवीन अभिनव तंत्र राबवणं, सव्रेक्षण करणं, त्याचे निष्कर्ष, त्याचा प्रचारात वापर, आपल्या मतदारांचा टार्गेट ग्रुप म्हणून होणारा विचार आणि त्याच्यार्पयत पोहोचण्यासाठीचे मार्ग अशी एक ना अनेक आयुधं आता प्रचारतंत्रातही वापरली जाऊ लागली आहेत. निवडणूक ही एका मोठय़ा व्यवस्थापनेचा भाग झाली आहे.थोडय़ा फार फरकानं हे सारं आपल्याला आता माहिती आहे. त्या सार्‍याचा वापर करून होणारं ‘राजकारण’ही आपल्याला कळतं आणि त्याच्या नैतिक-अनैतिक वापराबद्दल आपण त्याच सोशल मीडियात तावातावानं चर्चाही करतो. पण कधी असा विचार करतो का, आपल्याला या नव्या प्रचारतंत्रात काही रोजगार संधी असतील का? आपण आपली स्किल्स वापरून त्यातून काही उत्तम अर्थार्जन करू शकू का? पूर्वी सभांना, मोर्चाना कार्यकर्ते रोजंदारीवर आणले जात, दोनवेळच्या जेवणाचीही सोय राजकीय पक्ष करत. आजही ते सारं सुरूच आहे, मात्र त्यापलीकडे आता नव्या तंत्रानं आणि सोशल मीडियानं उत्तम स्किल्स असलेल्या तरुणांना रोजगारही देऊ केले आहेत. तंत्रावर उत्तम कमांड असणार्‍या, उत्तम कम्युनिकेश स्किल्स असलेल्या तरुणांची या ‘मार्केट’लाही गरज आहेच. सार्वत्रिक निवडणूक जवळ येईल तसतशा या संधी वाढतील. सार्वत्रिक निवडणूक पुढच्या वर्षीच आहे हे लक्षात घेतलं तर या नव्या क्षेत्रात आपल्याला काय संधी आहेत, याचाही विचार तरुणांनी केलेला बरा.मत कुणाला द्यायचं, कोण कुठल्या पक्षाचं आणि विचारधारेचं हे प्रश्न व्यक्तिगत झाले, त्याऐवजी नव्या प्रकारचे जॉब, मार्केट उपलब्ध होताना आपल्याला फायद्याचं काय याचीही माहिती असलेली बरी. म्हणून निवडणूक वर्षात तरुणांना मिळू शकणार्‍या संधींचा हा एक धांडोळा.एक उदाहरण सांगतो, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असा सामना बिहारच्या 2015 च्या विधानसभा निवडणुकीत रंगला होता. त्यात नितीन कुमार आणि त्यांच्या आघाडीचा मोठा विजय झाला. वास्तविक निवडणुकीच्या पाच-सहा महिने आधी नितीश कुमार यांची बाजू कच्ची वाटत होती; मात्र निवडणूक व्यवस्थापनतज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्या टीमने आखलेली रणनीती यशस्वी ठरली अन् नितीश कुमारांना जनतेने पुन्हा पसंती दिली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत याच प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम केलं होतं. त्यातही किशोर यांच्या कामाची प्रशंसा झाली होती. मुद्दा काय, निवडणूक आता मार्केटिंग, व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा भाग झाली आहे. निवडणूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी 2477 अर्थात अहोरात्र काम करण्याची तयारी हवी. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यात विविध पक्षांच्या वॉर रूममध्ये काम करण्याची संधी या क्षेत्राची माहिती असणार्‍यांना तसेच पदवीधरांना मिळू शकते. निवडणुकीच्या एक वर्ष ते सहा महिने अगोदर प्रत्येक पक्षाचा सेंट्रल वॉर रूम जोमाने कार्यरत होतो. साधारणपणे तेथे 10 वरिष्ठांची टीम असते. डाटा अ‍ॅनालिस्ट, पॉलिटिकल कम्युनिकेशन्स स्पेशालिस्ट, सिनिअर रिसर्च अनालिस्ट, एआय सायंटिस्ट, मीडिया कॉर्डिनेटर आदींचा त्यात समावेश असतो.  सव्रेक्षण, सोशल मीडिया, माहितीचे संकलन, त्याचा अन्वयार्थ लावणं, प्रचारात त्याचा उपयोग करणं, प्रचाराचं तंत्र विकसित करणं आदी कामांचं नियोजन ही टीम करत असते. प्रत्यक्ष फील्डवर तरुण काम करत असतात. त्यात कॅम्पेन असोसिएट, सव्रेक्षण करणारे असतात. रोजच्या रोज आलेल्या माहितीचं मूल्यमापन केलं जातं. विशेष म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्रपणे हे काम चालतं. सव्रेक्षण करणारे तरुण व कॅम्पेन असोसिएट यांना स्थानिक भागाची चांगली माहिती असणं त्यासाठी आवश्यक असतं. त्यासाठी स्थानिक तरुणांनाच संधी दिली जाते. पक्षाची जनमानसातील प्रतिमा, धोरणं, नेत्यांविषयी लोकांच्या भावना, पक्ष सत्तेत असल्यास सरकारच्या कामगिरीविषयी लोकांची मतं, सरकारी योजनांचा लोकांना झालेला फायदा आदींची सव्रेक्षणाद्वारे माहिती घेतली जाते. त्याचा अर्थ लावला जातो आणि प्रचाराची दिशा ठरविली जाते. सामाजिक व आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रचारात सोशल मीडियाचा अजेंडा, इव्हेण्ट, प्रचाराचं तंत्र ठरवलं जातं. उदा. टि¦टर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप वापरणार्‍या मतदारांची संख्या किती आहे, त्यानुसार त्यांच्यार्पयत पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रचाराचा वापर केला जातो.  प्रत्येक पक्षाच्या सेंट्रल वॉर रूममध्ये मोठी टीम असते. बघा म्हणजे, निवडणूक प्रचार कक्षांनाही आता वॉर रूम म्हणायला लागलेत इतपत युद्धसम परिस्थिती आता निर्माण केली जाते. एखाद्या युद्धाप्रमाणेच मोठी फौज निवडणूक प्रचाराचं काम करायला लागते. पक्षीय वॉर रूम आता निवडणुकीच्या काळात मोठय़ा धामधुमीत दिसतात. दुसरीकडे लोकसभा व विधानसभेची निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराचीही स्वतंत्र टीम असते. त्यात खासगी मदतनीस, सोशल मीडिया, पाहणी आणि विश्लेषण, माध्यमांसाठीच्या माहितीचं नियोजन, सरकारी योजनांचा उपयोग, जाहिरात व्यवस्थापन आदींचा सहभाग असतो. हा सारा पसारा आता वाढत जात असताना त्यात संधीही अनेक आहेत. अर्थात त्यासाठीची स्किल्सही हवीतच. त्या संधी कुठल्या? तपासा.

जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या संधीसगळ्याच संधी काही मुंबई-दिल्लीत नाही. आता नवा नारा आहे, मोअर लोकल-मोअर ग्लोबल. त्यामुळे आपल्याला स्थानिक माहिती खडान्खडा असणं हीच आपली ताकद आहे असं समजा. आणि निवडणूक काळात जिल्हास्तरावरही संधी निर्माण होतील, त्याची माहिती काढत राहा.खासगी मदतनीस (पीए)आमदार किंवा खासदार हे एकप्रकारे सर्वस्वी पीएवर अवलंबून असतात. पीएला सर्व सरकारी खात्यांची माहिती हवी. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून लोकांच्या अडचणी सोडविण्याचं त्याचं काम असतं. त्यासाठी हाताशी लागतो मदतनीस. म्हणून हा खासगी मदतनीस संयमी, शांत असावा. त्याचं काम सकाळी 11 ते संध्याकाळी 5 अशा ठरावीक वेळेपुरतं नसतं. ते चोवीस तास चालतं, अष्टावधानी आणि उत्तम कम्युनिकेशन स्किल असलेला माणूस इथं लागतो.

सोशल मीडिया मॅनेजरराजकारण्यांपासून नगरसेवक, आमदार, खासदार आता सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. सोशल मीडियाचं काम पाहण्यासाठी तेही आता प्रोफेशनल स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती करू लागलेत. तुम्हाला सोशल मीडियात लोकप्रिय व्हायची नस अचूक सापडली असेल तर या टप्प्यावर संधी आहे. इमेज मेकिंग हे मुख्य काम. फेसबुक, टि¦टर, इन्स्टाग्राम यावर नुस्तं पडीक असणं नव्हे तर त्याचा उत्तम वापर करणं ज्याला जमतं, त्याला या कामात संधी आहे.

सव्र्हे करण्याची कंत्राटंमतदारसंघातील पाहणी आणि विश्लेषण यास आता महत्त्व आलं आहे. राजकीय पक्ष, उमेदवार विविध सव्रेक्षण करतात. सव्रेक्षण कंपन्या असतात त्यांना ही कामं दिली जातात. मात्र  स्थानिक पातळीवर, छोटय़ा गटांचं सव्रेक्षण करण्याचं काम स्थानिक पातळीवरही मिळू शकतं.  प्रश्नावली तयार करणं किंवा प्रश्नावल्या भरून घेणं, सॅम्पल साईज आणून देणं अशी कामं सव्रेक्षणातून मिळू शकतात. मतदारांकडून माहिती गोळा करणं हे तंत्र आहे. ती माहिती काढण्याचं कसब मात्र हवं.

सॉफ्टवेअरवर हात आणि विश्लेषण

निवडणुकांसाठी लागणारी माहिती मिळवली पण त्याचा निष्कर्ष काय? अ‍ॅनालिसिस हे मोठं काम असतं. हल्ली ते अ‍ॅनालिसिस करून देणारी सॉफ्टवेअर्सही असतात. मात्र त्यावर काम करू शकतील अशा आयटी तज्ज्ञांचीही गरज पडते. गरजेनुसार सॉफ्टवेअर बनवून देणार्‍यांचीही गरज भासते. याशिवाय जाहिरात, इव्हेण्ट्स, बॅनर, पोस्टर यासाठीचा मजकूर तयार करणं, डिझाइन करणं यासंबंधातही कामं मिळू शकतात. 

व्हीडीओ निर्मिती मिनिटभरापासून दोन ते चार मिनिटांचे व्हीडीओ करुन सोशल मीडीयात सर्रास टाकले जातात. इमेज मेकिंग ते कामाची माहिती ते प्रश्नाची मांडणी असे बहुअंगी स्वरुप असलेल्या या व्हीडीओंचे महत्व मोठे आहे. ते व्हीडीओ तयार करणं, त्यासाठी मजकूर लिहिणं, ते व्हायर करणं ही नवीन कामं आता तयार होत आहे.याशिवाय प्रत्यक्ष फील्डवर जाऊन लाभार्थीच्या मुलाखती घेणं, लोकांच्या प्रश्नावर छोव्हीडीओ बनवणं हे काम सध्या चर्चेत आहे.

शिकायचंय?

निवडणुकीसंबंधीचे व्यवस्थापन, जनसंपर्क यासंदर्भात साधारण एक वर्षाचे अभ्यासक्रमही काही संस्था चालवतात. तिथं शिक्षण घेऊनही या क्षेत्रात प्रवेश करता येईल. अन्यथा पदवीधर तरुण प्रशिक्षणार्थी म्हणून या क्षेत्रात जाऊ शकतात. मुंबई, पुण्यासारख्या शहरात काही खासगी संस्था यावर आठवडय़ाच्या कार्यशाळाही घेतात. याशिवाय राजकीय पक्षही आता इण्टर्न घेतात. तिथंही चौकशी करता येऊ शकते.

आवश्यक स्किल्स कोणते?

*भाषेवर प्रभुत्व आवश्यक आहे. * उत्तम संवाद कौशल्य आवश्यक.* उत्साह आणि थेट संवादाची कला आवश्यक.* सोशल मीडियाचा उत्तम वापर करता यायला हवा.* नेटसॅव्ही हवं. नवीन तंत्रज्ञानावर हुकूमत हवी.* सॉफ्टवेअर, आयटी याविषयातलं कौशल्य हवं.* व्हीडीओनिर्मिती, शूटिंग, एडिटिंग, अनुवाद या तंत्रावर हुकूमत हवी.* नवीन शिकण्याचा उत्साह आणि सृजनशीलता आवश्यक.

काय आहे ‘आय बॉल’?

फेसबुक लाइव्ह करताना एका मिनिटाला साधारण 600च्या पुढे लोक जोडले जात असतील, तर तो विषय ट्रेण्डिंग समजला जातो. 1200 ते 1600 आय बॉल मिळणं म्हणजे विशेष समजलं जातं. फेसबुक लाइव्ह करण्यात हातखंडा असेल तरी नव्या काळात संधी मिळू शकतात.

पुढची निवडणूक इन्स्टाग्रामवर 

फेसबुक, टि¦टरचा वापर सर्वच प्रभावीपणे करतात. मात्र 2019 ची निवडणूक इन्स्टाग्रामवरून लढवली जाईल, असं सध्या चित्र आहे. इन्स्टाग्राम वेगाने लोकप्रिय होत आहे. तरुण मुलांशी फोटोच्या भाषेत कनेक्ट व्हायचा प्रयत्न सारेच करतील.

***

सोशल मीडियाचा वापर करण्यात महाराष्ट्रात सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे स्वतर्‍ फेसबुक व टि¦टरसह इतर सोशल मीडियावर आहेत. राज्य सरकारचे महत्त्वाचे निर्णय, त्याचा लोकांना झालेला फायदा याची माहिती त्यावर दिली जाते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व सर्व मंत्रीसुद्धा सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करतात. पक्षपातळीवर सोशल मीडियाचे जिल्हाप्रमुख, विधानसभा व तालुकाप्रमुख आहेत. त्यांच्यामार्फत सरकारची कामगिरी लोकांर्पयत पोहोचविली जाते. बूथपातळीर्पयत व्हॉट्सअ‍ॅपचे ग्रुप केले आहेत. खोटय़ा बातम्या, खोटय़ा पोस्ट याची तातडीने दखल घेतली जाते.  वृत्तपत्रात एखादी समस्या, प्रश्न यावर बातमी किंवा लेख छापून आल्यास तातडीने सरकारी बाजू सविस्तरपणे त्यांच्याकडे पाठविली जाते. सोशल मीडियाचा वापर करताना कार्यकत्यांचं जाळं तयार केलं आहे.‘टू वे इण्टरॅक्शन’ करण्यावर आमचा भर असतो. भाजपा कार्यकर्ते म्हणजे एकप्रकारे सायबर सैनिकच आहेत. 

- केशव उपाध्ये,प्रवक्ते, भाजपा-----------------------

 

शिवसेनेच्या सोशल मीडियाची भिस्त पगारी लोकांपेक्षा सामान्य शिवसैनिकांवरच आहे. संपूर्ण महाराष्ट्रात युवा सेनेचे जाळे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सेनेचे मंत्री सोशल मीडियाचा वापर करतात. मुंबईत शिवसेना भवनात सोशल मीडियाचा डेस्क आहे. जनसंपर्कप्रमुख, शिवसैनिक, युवा सैनिकांची प्रमुख टीम साधारण 10 जणांची आहे.  ‘पॉझिटिव्ह’ बातम्या लोकांर्पयत पोहोचविण्यासाठी आम्ही सोशल मीडियाचा वापर करतो. - हर्षल प्रधान, जनसंपर्कप्रमुख, शिवसेना

 पक्षाविरोधातील खोटा प्रचार खोडून टाकण्यासाठी आम्हाला सोशल मीडियाची मोठी मदत झाली आहे. सोशल मीडियासाठी पक्षांतर्गत एक रचना आहे. समन्वयक, सोशल मीडिया अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विधानसभा, तालुकाध्यक्ष अशी रचना आहे. बूथपातळीवर नेमणुका सुरू आहेत. सोशल मीडियावर प्रदेश काँग्रेसच्या फॉलोअर्समध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. पदाधिकारी स्वेच्छेने सोशल मीडियाचे काम करतात. ‘पेड सव्र्हिस’ आम्ही घेत नाही.  

- अभिजित सपकाळ, प्रमुख, सोशल मीडिया, काँग्रेस------------

सोशल मीडियात पहिल्या स्थानी कोण आहेत, याबाबत वाद होऊ शकतील, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस निश्चितपणे दुसर्‍या स्थानी आहे. इतर पक्षांप्रमाणे आमची विविध पातळीवर टीम आहे. पक्षाचे पदाधिकारीच त्यासाठी काम करतात. 36 जिल्ह्यांचे फेसबुक पेज आहे. पदाधिकारी, कार्यकत्र्यानी केलेली कामे त्यावर टाकली जातात. टि¦टरवर आमचे सहा लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवरही आम्ही पुढे आहोत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे सोशल मीडियाचा प्रभावी वापर करतात. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे आम्ही फेसबुक लाइव्ह घेत असतो. आमचे नेते त्याद्वारे कार्यकत्र्याशी संपर्क साधतात. 

- अदिती नलावडे, समन्वयक, सोशल मीडिया, राष्ट्रवादी काँग्रेस