स्वानंद खानापूरकर
माणसाला हजारो वर्षापासून स्वतर्विषयी आणि निसर्गाविषयी अनेक गूढ प्रश्न पडतात. मी कोण आहे? मी इथे कसा आलो? हे जग कोणी, कधी आणि कसं निर्माण केलं? जीवन म्हणजे काय? (माझ्या) जीवनाचा हेतू आणि अर्थ काय? इत्यादी. अमावास्येच्या रात्नी सहज म्हणून जेव्हा माणूस तारका-नक्षत्नांनी झगमगणार्या आकाशाकडे बघतो, तेव्हा आजही माणसाच्या मनात कुतुहलापोटी अनेक विचार आणि प्रश्न तयार होतात आणि त्या दृश्यात तो गढून जातो. उपनिषद्कालीन ¬षी असो, रबींद्रनाथ टागोरांसारखा कवी असो, कुमार गंधर्व व किशोरी अमोणकर यांच्या सारखे संगीतज्ञ असो, जे कृष्णमूर्ती यांच्यासारखा तत्त्वज्ञ असो, जेन गूडाल व जेम्स लव्हलॉक यांच्यासारखे पर्यावरणतज्ज्ञ असो, तुकारामांसारखा संत असो, व्हिनसेंट व्हॅन गॉघसारखा चित्नकार असो, की आइनस्टाइनसारखा शास्रज्ञ असो, विश्वाच्या गहन आणि गूढ सौंदर्यानं तो हरखून गेल्याशिवाय राहत नाही.तुम्हालादेखील आयुष्यात कधीतरी अशा प्रकारचे प्रश्न नक्कीच पडले असणार, एकदा आठवून बघा.मागच्या काही वर्षामध्ये आधुनिक विज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे आज आपल्यासमोर युनिव्हर्सचे एक अतिशय विलक्षण आणि थक्क करणारे ‘बिग पिक्चर’ उभे ठाकलेले आहे. काळाच्या आणि अंतरिक्षाच्या अमर्याद आणि विशाल पटलावर माणसाचे किंवा पृथ्वीचे नेमके स्थान काय, याचा अचूक अंदाज आज आपण सांगू शकतो. आपल्या युनिव्हर्सचा जन्म साधारणतर् 14 बिलिअन (14 वर नऊ शून्य) वर्षापूर्वी ‘बिग-बँग’ नावाच्या एका घटनेपासून झाला. त्यानंतर असंख्य तारे (स्टार्स) निर्माण झालेत; ज्यांचे पुढे तारकासमूह (गॅलॅक्सी) निर्माण झालेत. युनिव्हर्सच्या उत्क्रांतीच्या या प्रवासात 4.6 बिलिअन वर्षापूर्वी ‘सूर्य’ नावाचा एक अतिसामान्य तारा जन्माला आला. तो आकाशगंगेच्या (मिल्कीवे गॅलॅक्सीच्या) परिघाजवळ एका अतिसामान्य भागात स्थित आहे. आपले युनिव्हर्स हे सूर्यासारख्या असंख्य तार्यांनी, आकाशगंगेसारख्या असंख्य तारकासमूहांनी आणि नेबुला, कृष्णविवर (ब्लॅक होल) यांसारख्या इतर खूप विलक्षण अशा काही गोष्टींनी व्यापलेले आहे. पृथ्वी आपल्या सूर्यमालेचा एक सामान्य भाग आहे. 3.5 बिलिअन वर्षापूर्वी युनिव्हर्समधील अतिसामान्य बिंदू असलेल्या या पृथ्वीवर मात्न काही विशिष्ट वैज्ञानिक कारणांमुळे एक असामान्य आणि अनोखी अशी ‘प्रक्रि या’ घडली. ही प्रक्रि या म्हणजे ‘जीवन. ही प्रक्रि या तुमच्या आमच्या मार्फत आणि आजूबाजूला दिसणार्या भव्य जीव-सृष्टीच्या मार्फत लाखो वर्षापासून सतत घडते आहे. आपले वैयक्तिक जीवन हे या विशाल प्रक्रि येचा न्यूनतम असा भाग आहे. जीवनाच्या या उत्क्र ांतीच्या प्रवासातच जवळपास 3.5 लक्ष वर्षापूर्वी ‘माणूस’ नावाची प्रजाती जन्माला आली. त्यापुढे मात्न माणसाच्या शरीरामध्ये खूप काही बदल झाले नाहीत. जीव शास्रीय पातळीपेक्षा कितीतरी गतिमान बदल हे माणसाच्या मनो-सामाजिक वर्तुळांमध्ये झालेत. म्हणून माणसाच्या उत्क्र ांतीला आपण संस्कृतीच्या आणि सभ्यतेच्या भाषेत बघू लागलो.मी सैद्धांतिक भौतिकशास्नचा (थेओरेटिकल फिजिक्सचा) विद्यार्थी आहे. पुण्यातील आयआयएसईआरमध्ये माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालं. मी पुढे मुंबईतील टाटा मूलभूत अनुसंधान संस्थेमध्ये एक वर्ष काम केलं आणि आता अमेरिकेतली अॅरिझोना प्रदेश विद्यापीठात याच विषयात पीएच.डी. करत आहे. ‘थेओरेटिकल फिजिक्स’ ही अशी एक आधुनिक ज्ञानशाखा आहे जी अतिविशाल अशा ब्रrांडापासून ते अतिसूक्ष्मा अशा अणु/मूलकणांर्पयत विविध स्तरांवर सृष्टी कशी दिसते, कोणत्या भौतिक नियमांच्या अंतर्गत तिचे चलन होते, याचा अभ्यास करते. आयआयएसईआरमध्ये शिकत असताना या विषयासंबंधी मला अनेक प्रश्न पडायची. या विषयाचे समाजाशी (तंत्नज्ञानाव्यतिरिक्त) काही थेट नाते आहे का? हा विषय समाजोपयोगी आहे का? या विषयात पुढे करिअर करावे का? हा विषय मी केवळ वैयक्तिक कुतूहल म्हणूनच शिकत आहे की अजून काही प्रेरणा आहेत? माणसाच्या उत्क्र ांतीच्या बिग पिक्चरमध्ये या विषयाचं काय स्थान आहे? या विषयाला कोणकोणते सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ आहेत? इत्यादी. या प्रश्नांना घेऊनच मी डिसेंबर 2016 ला निर्माणशी जोडला गेलो. मागच्या दोन वर्षाच्या माझ्या निर्माण-प्रवासात या प्रश्नांवर बर्याच चर्चा आणि विचार झालेत. एका बाजूला माझी फिजिक्स शिकण्याची प्रेरणा आणि दुसर्या बाजूला सामाजिक कामाची प्रेरणा, या दोन्ही प्रेरणांचा मिलाप करण्याचा दृष्टिकोन विकसित झाला. सर्वप्रथम थेओरेटिकल फिजिक्स आणि तत्सम ज्ञानशाखांमधून युनिव्हर्सचे जे ‘बिग पिक्चर’ उदयास येत आहे, ही आज प्रचलित असलेल्या आधुनिक सभ्यतेची देण आहे. कारण आधुनिक विज्ञानाचा सर्वाधिक परिपोष हा आजच्या काळात झाला. या अर्थाने, आजची आपली सभ्यता फार नशीबवान म्हणावी लागेल. जणू काही मानव सभ्यतेच्या वतीने वैज्ञानिकांनी आपणा सर्वाना स्वतर्विषयी आणि निसर्गाविषयी पडणार्या अमूर्त अशा मूलभूत प्रश्नांना ‘आधुनिक विज्ञानाच्या’ रूपात एक अभिव्यक्ती दिलेली आहे.मूलभूत फिजिक्स शिकण्याच्या प्रेरणेमध्ये वैयक्तिक कुतूहल जरी असले, तरी त्या कुतूहलाची बीजे ही मानवी संस्कृतीत दडलेली आहेत. मानवी सभ्यतेच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच आधुनिक विज्ञानाच्या रूपात आपण या मूलभूत आणि गूढ वाटणार्या प्रश्नांची अतिशय वस्तुनिष्ठ; परंतु तितकीच रोमांचक आणि विलक्षण अशी मांडणी करीत आहोत. आधुनिक विज्ञानाची अशा तर्हेनं केलेली मांडणी जनसामान्यांर्पयत पोहोचते का? निदान आधुनिक सभ्यतेचे प्रतीक मानल्या जाणार्या युवा पिढीर्पयत तरी पोहोचते का? निर्माणमध्ये आम्ही असे मानतो की, आधुनिक विज्ञानातून समजलेले सृष्टीविषयीचे हे ज्ञान केवळ काही वैज्ञानिक आणि विज्ञान-संस्थानांर्पयत मर्यादित नसून, ते अख्ख्या मानव समाजाचे ‘संकलित ज्ञान’ (अॅक्युम्यूलेटेड नॉलेज) आहे. अशा संकलित ज्ञानाचे जेव्हा तंत्नज्ञानामध्ये रूपांतर होते, तेव्हा ते काहीअंशी समाजोपयोगी असते. परंतु या ठिकाणी आम्ही ‘तंत्नज्ञाना’विषयी बोलत नाहीये. कारण, तंत्नज्ञान विकसित करण्याच्या प्रेरणा या नेहमीच समग्र आणि सर्वसमावेशक असतील हे सुरुवातीला निश्चित करता येत नाही. इथे या ज्ञानाला आम्ही ‘जगाच्या सत्याविषयीचे ज्ञान’ म्हणून बघत आहोत. त्यातून जी उन्नती होते, त्याच्या स्व-मध्ये, विचारांमध्ये आणि भावनांमध्ये जी उन्नती होते ती केवळ त्या व्यक्तीपुरती मर्यादित न राहता अख्ख्या समाजाची आणि पर्यायाने मानव-सभ्यतेची उन्नती व्हावी असे आम्हाला वाटते. या ज्ञानाचा केवळ माहिती रूपात प्रसार होऊन चालणार नाही (ते तर व्हायलाच पाहिजे); पण या ज्ञानाच्या प्रसारामुळे माणसाला त्याच्या ‘स्व’ला अधिक उन्नत करणारा दृष्टिकोन मिळायला हवा. एकंदर जीवनाविषयी आणि सृष्टीविषयी समजलेल्या आधुनिक ज्ञानाला त्याला स्वतर्च्या जीवनशैली सोबत संमिलीत करता यायला पाहिजे. या दिशेमध्ये स्वतर्च्या जीवनात आणि समाजामध्ये प्रयत्न करत राहाणे, हा जीवन-हेतू मला निर्माणमध्ये मिळाला. ही दृष्टी समोर ठेवून काही विशिष्ट प्रयोग आम्ही ‘निर्माण’च्या प्रक्रि येमध्ये हल्ली सुरू केले आहेत.निर्माणी युवाला जेव्हा ‘बिग पिक्चर’चे आकलन होते, तेव्हा त्याच्या विचारांत/ व्यक्तिमत्त्वात काही बदल होतो का? होतो तर कोणत्या पैलूमध्ये होतो? आणि त्याच्या दृष्टिकोनात झालेल्या या बदलामुळे त्याचा ‘निर्माण-प्रवास’ अधिक अर्थपूर्ण, अधिक व्यापक होतो का? अशा काही प्रश्नांवर आम्ही सध्या अभ्यास करीत आहोत.आजूबाजूच्या अर्थव्यवस्थेमुळे आणि स्पर्धात्मक-संस्कृतीमुळे आज युवा अधिकाधिक एकटा होत चाललेला आहे. आजची युवा पिढी ‘जनरेशन-मी’/‘आत्मकेंद्री पिढी’ या नावानेच संबोधली जाते. बहुतांश युवांची जीवन जगण्याची आणि काम करण्याची प्रेरणा ही आजूबाजूच्या जगाशी असलेल्या स्पर्धेतून उत्पन्न होते. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि आकांक्षांना अवाजवी महत्त्व आल्यामुळे तो जीवन जगण्याच्या ‘मी’च्या पलीकडे असलेल्या विलक्षण शक्यतांना मुकला जातो. स्वतर्च्या जीवनातील हेतू व अर्थाचा शोध आणि अशा अनेक अस्तित्ववादी प्रश्नांचा शोध तो ‘मी’च्या संकुचित चक्र व्यूहामध्ये घेतो आणि शेवटी निराश होतो. अस्तित्ववादी आणि मानसिक गरजांची उत्तरे तो उपभोगाच्या (ूल्ल24ेी1्र2े) अथवा उपयुक्ततेच्या (43्र’्र3ं1्रंल्ल्र2े) संकुचित दृष्टिकोनात घेऊ पाहतो आणि सदा-चिंतित बनतो. आमच्या अनुभवामध्ये बिग पिक्चरच्या आकलनामुळे हा युवा संकुचित ‘मी’च्या पिंजर्यातून काही काळासाठी मुक्त होतो. एका बाजूला जीवन, सृष्टी आणि त्या दोघांमधले नाते किती विशाल, व्यापक आणि सुंदर आहे आणि दुसर्या बाजूला केवळ ‘मी’च्या भोवती फिरणारे जीवन किती मर्यादित, क्षणभंगुर आणि क्षुल्लक आहे, याची त्याला अनुभूती होते. स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी सतत काहीतरी कामगिरी करण्याच्या दबावापासून आणि असुरक्षित मनर्स्थितीपासून तो मुक्त होतो. आजच्या शिक्षणपद्धतीमध्ये युवाला ‘मी’च्या पलीकडे असलेल्या जगाशी नातं जोडायची संधी फारच क्वचित मिळते. आम्हाला असे लक्षात आले की, बिग पिक्चरच्या आकलनामुळे हा युवा अतिशय खोलवर विस्मित होतो (इंग्रजी मध्ये याला ह्यं6ी असे म्हणतात); जणू काही त्याला अर्जुनासारखे विश्वरूपदर्शन होते. ‘मी’च्या पलीकडे जाण्याची शक्यता वाढते. हा युवांसाठी एक आध्यात्मिक अनुभवच ठरतो. जयप्रकाश नारायण म्हणायचे, ‘अध्यात्म ये बुढापे की बुढबस नही है, तरु णाई कि उत्तुंगतम उडान है’ जेपींच्या नुसार तरुण पिढीसमोरचे प्रश्न हे वस्तुतर् आध्यात्मिक असतात. बिग पिक्चरच्या आकलनामुळे होणारा ‘स्व’-चा विस्तार हा कदाचित युवांमधल्या आध्यात्मिक आणि अस्तित्ववादी जाणिवांना जागृत करेल. युवांना अजून काय हवे?
(लेखक थेओरेटिकल फिजिक्स या विषयामध्ये अमेरिकेतली अॅरिझोना प्रदेश विद्यापीठात पीएच.डी. करत आहे.)