शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

गोपीसरांच्या अकॅडमित चँपियन घडतात कसे?

By admin | Published: April 02, 2015 6:12 PM

बॅडमिण्टनच्या जगावर फक्त चीनचं साम्राज्य. चिनी खेळाडूंना मात देणं भल्याभल्यांच्या तों

बॅडमिण्टनच्या जगावर फक्त चीनचं साम्राज्य.
चिनी खेळाडूंना मात देणं भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणतं, आणि भारत, अगदी अलीकडच या काळापर्यंत भारतीय खेळाडू त्या नकाशावर पहिल्या शंभरातही दिसत नसत!
मात्र पुलेला गोपीचंद नावाच्या जादूगारानं जादू करावी तसं हे चित्र बदललं. आणि आज तरी सायना नेहवाल वर्ल्ड नंबरवन आहे. गोपीचंद स्वत: उत्कृष्ट बॅडमिण्टनपटू. 
हैदराबादमध्ये त्यानं बॅडमिण्टन अकॅडमी सुरू केली. सायनाचे आईवडील हरियाणातून मुलीला घेऊन हैदराबादेत स्थायिक झाले ते केवल या अकॅडमीत प्रशिक्षण मिळावं म्हणून. मग सिंधू, पी. कश्यप, श्रीकांत असे एकसे एक गुणी खेळाडू बॅडमिण्टन कोर्टवर झळकू लागले. उत्कृष्ट कामगिरी करू लागले.
मात्र या अकॅडमीत प्रवेश सोपा नसतो, आणि तिथला सरावही. गोपीचंदची आई तिथली व्यवस्था पाहते. जागतिक दर्जाच्या सुविधा, उपकरणं तर आहेतच; पण कठोर प्रशिक्षणही आहे. पहाटे साडेचारला पहिली ट्रेनिंग बॅच सुरू होते. सव्वाचार वाजता स्वत: गोपीसर कोर्टवर हजर असतात. 
अकॅडमीतली मुलं बाहेर हुंदडायला जात नाहीत, व्हॉट्सअँप, फेसबुक सगळं बंद. तिथं इंटरनेट नाही. जेवणाच्या ब्रेकमध्ये फक्त टीव्ही पाहता येतो. तोही थोडाच वेळ!
अकॅडमीत १६ रूम्स, तीन मोठ्ठे हॉल आहेत. सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. शिस्तीला तर काही पर्यायच नाही.  ‘डिसिप्लीन इज मोअर इम्पॉर्टण्ट दॅन एक्स्लन्स!’  हेच तिथलं ब्रीदवाक्य. ‘चालतं- काही होत नाही, बघ, होता है’ असं खेळात नाही चालत, रोज स्वत:ला शिस्तीत ठेवा असं इथं खेळाडूंना शिकवलं जातं! 
आणि म्हणूनच या अकॅडमीत ९९ टक्के चांगलं खेळून, वागून चालत नाही, १00 टक्केच चांगलं परफॉर्म करावं लागतं, सतत. कायम, चोवीस तास!
- चॅम्पियन घडवणार्‍या शिस्तीच्या गुरुला म्हणून तर आज जग सलाम ठोकतं,
त्याचंच नाव, पुलेला गोपीचंद!!