- डॉ. भूषण केळकर
माझ्या मित्रांना बंगलोरला कामानिमित्त १-२ वर्षांकरता जायचं होतं. मात्र तिथं जाण्याच्या कितीतरी आधीपासूनच त्याला काही एजंटांच्या ई-मेल, फोन यायला लागते. हा मित्र विचारात पडता की या एजंट लोकांना कळलं कसं की हा काही दिवसांतच बंगलोरला रहायला जातोय. उलगडा असा झाला की, आमच्या मित्राने त्याच्या फेसबुक अकाउंटवर तो आता लवकरच पुण्यातून बंगलोरला जाईल वगैरेच्या गप्पा टप्पा केल्या होत्या. ही माहिती वापरून एआय (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) आधारित काम करणाºया रियल इस्टेट एजन्सीने त्याची माहिती हेरली. लगेच त्याच्याशी संपर्क वाढवायला सुरुवात केलीसुद्धा. आमचा मित्र पुण्यात असतानाच तो बंगलोरला येणार हे त्यांना कळलं होतं.मला आठवतं, दहा वर्षांपूर्वी मी असाच पुण्याहून बंगलोरला एक वर्षाकरता शिफ्ट झालो होतो. तेव्हा भाड्याची जागा हवी म्हणून एजंट मिळवण्यासाठीच कोण पायपीट करावी लागली होती!अहो हेच काय, गावात तर आता बातमी अशी आहे की आता भाड्याची जागा तर सोडाच नवीन फ्लॅट/ घर घेणार आहात अशी कुणकुण जरी लागली (म्हणजे सोशल मीडिया किंवा समाजमाध्यमातली इंडस्ट्री ४.० माहिती) तरी फ्लॅट/ घर विकणारे एजंट/ कंपन्या तुमच्याशी संपर्क साधतील आणि ‘यांना कसं कळलं’ अशा आश्चर्याने तुमच्या पायाखालची वाळू सरकेल!तुम्ही क्रेडिट/ डेबिट कार्ड कसे वापरता, कुठे वापरता, तुमचा मोबाइलमधला जीपीएस. तुमचे एफ ६ वरचे स्टेट्स तुम्ही घेतलेल्या वस्तू इत्यादी सर्व माहिती एकत्र करून तुमचं एक प्रोफाइल बनवलं जातं आणि तुमच्याबद्दलचे अनेक अचूक अदमास/ अटकळी मांडल्या जाऊ शकतात. तांत्रिक भाषेत याला बिग डाटा अॅनालिसिस असं म्हणतात. जे या ‘इंडस्ट्री ४.०’चा अविभाज्य घटक आहे.यातील काही भाग तसा जुना आहे. पण त्याचे आता जे रूप उभरते आहे त्यात अत्यांतिक गुंतागुंतीची व क्लिष्ट गणितीय आकडेमोड आहे की ज्यामुळे टेक्स्ट, नंबर्स, चित्रं/फोटो, बायोमेटिक इ. सर्व गोष्टींचा अंतर्भाव करून अत्यंत वेगानं व अचूक भाकितं करता येत आहेत.यातला जो भाग जुना आणि साधा आहे त्याचं एक २० वर्षांपूर्वीचे उदाहरण देतो. २० वर्षांपूर्वी आम्ही आॅस्ट्रेलियामध्ये फिरायला गेलो होतो, तेव्हा जिथे मिळणारे ओपल नावाचे विशिष्ट खडे घेतले त्यांची किंमत जरा जास्त होती व आमच्या नेहमीच्या खरेदीच्या पॅटर्नमध्ये (दूध, फळे, ब्रेड, भाज्या, क्वचित हॉटेल इ.) बसत नव्हती. त्यामुळे ते ट्रान्झॅक्शन होल्ड केलं गेलं. अॅनालिसिसचा वापराची मजल जेव्हा इथपर्यंत होती!आता अॅमेझोनवर तुम्ही एखादी वस्तू घेतलीत तर अन्य काय वस्तू तुम्हाला आवडल्याची शक्यता आहे ते अॅमेझोन तुम्हाला आपणहून सांगते! तुमच्या फेसबुकवरील पोस्ट्स, लाइक्स, तुमच्या खरेदीचा पॅटर्न लक्षात घेऊन तुम्हाला एसएमएसवर किंवा ई-मेलने कुपन्स येऊ शकतात!फ्लिपकार्ट-अमेझॉनवर तुम्ही मागवलेली पुस्तके कुठल्या टाइपची आहेत याचा अंदाज घेऊन तुम्हाला काही मुव्हीस पण सुचवले जाऊ शकतात! तुम्ही स्पर्धा परीक्षांची पुस्तकं वाचता आहात, मागवता आहात किंवा काही आॅनलाइन साइट पाहता आहात म्हणून तुम्हाला संबंधित क्लासेसबद्दलचे एसएमएस येऊ शकतात.तुमचा तुमच्या शहरातील प्रवास जीपीएसमुळे ट्रॅक केला जाऊ शकतो. तुम्ही कोणत्या व कोणत्या प्रकाराच्या रेस्टॉरण्ट्सना भेटीगाठी होतात ते पाहून तुमची ‘कुंडली’ मांडली जाऊ शकते आणि तुम्ही व्हेज आहात की नॉनव्हेज, दारू पिता की नाही, पीत असल्यास अधिक कोणता ब्रण्ड, तुम्हाला जास्त इटालियन आवडते की चायनीज इ. सर्व माहिती आपोआप गोळा होत असते आणि तुमची ‘कुंडली’ सतत अपडेट होत असते. तुमच्याही नकळत!जीपीएस चालू आणि जर का तुम्हाला मेसेज आला की ‘तुमच्या आताच्या जागेपासून १० मिनिटांवर बार असणार, नियमित जेवण मिळणारं, चायनीय हॉटेल आहे, जरुर आस्वाद घ्या’... तर दचकू नका!इंडस्ट्री ४.० चा ‘चित्रगुप्त’ सगळे हिशेब ठेवतोय.
( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)